मळलेले गाउन माझे..! (इन्स्टन्ट विडंबन)

Submitted by A M I T on 26 April, 2013 - 05:57

मळलेले गाउन माझे साबणाने तू धुवावे
मोकळ्या गच्चीत नेऊनी तयाला वाळवावे

जाऊनी पुढल्या सुट्टीत खरेदी इतकी करू की,
राजसा, घेऊनी पिशव्या माझिया मागे फिरावे

लाडक्या मालिका माझ्या, पाहू दे मजला सुखाने
यायला घरी तुजला ऑफीसातूनी लेट व्हावे

रे ! तुला भल्या पहाटे गजराने जाग यावी
तू मला चहा करावा अन् पाणी तापवावे

* * *
मुळ गीत : मल्मली तारूण्य माझे..

http://kolaantudya.blogspot.in/

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खी ....खी.......खी.........!!!

भारी!!!

Rofl आमट्या... आज परत आठवणी जाग्या झाल्या तुझ्या आभासी बायकोच्या!
खरीखुरी बायको आल्यावर मात्र तुझी बोलतीच (पक्षी लेखणीच) बंद झाली.

मला पटकन गाऊन घातलेली लग्न मानवलेली सुदृढ नवी नवरी दिसली...
Hahaha....
हल्ली लग्न झालेल्या बायका शॉर्टस ही घालू लागल्यात त्यावर ही लिहावे काही