दुष्काळ
मालतीबाईना आता स्वर्ग दोन बोटेच उरला होता. त्यांचा आनंद गगनात मावत नव्हता. त्यांच्या दोन्ही मुलांना श्याम नि विकास यांना अमेरिकेत जॉब लागला होता.
पती निधना नंतर अत्यंत कष्टाने त्यांनी दोन्ही मुलांना सांभाळले होते.पैशाचा प्रश्न नव्हता, पण त्यांना नातेवाईकांचा आधार नव्हता. दोन्ही मुलांवर त्यांनी चांगले संस्कार केले होते.दोन्ही मुले गुणी निघाली. त्यांचे पांग फेडले.अमेरिकेत नोकरीला जायला अजून तीन महिन्यांचा अवकाश होता.
मालतीबाईही त्यांच्याबरोबर अमेरिकाला जाणार होत्या.आता ह्या उरलेल्या तीन महिन्यांमध्ये ह्या दोन्ही भावांनी महाराष्ट्र फिरायचे ठरवले.त्यानुसार ते आपल्या येथील सर्व प्रसिद्ध मंदिरे, स्थळे यांची भटकंती करू लागले.
त्यांची एक मावशी मराठवाड्यात राहत होती. तिला भेटण्यासाठी दोघेही भाऊ मराठवाड्याकडे निघाले. महाराष्ट्रात भयानक दुष्काळ पडला होता. त्याची तीव्रता जरी शहराकडे जास्त नव्हती ,पण आता ग्रामीण भागाकडे जाताना त्यांना ती जाणवू लागली होती.
रेल्वेतून जाताना बाहेर दिसणारा रखरखीत प्रदेश डोक्यावर हंडे घेऊन जाणाऱ्या बायका, पाठीला पोट लागेली जनावरे, पाहून श्यामचे मन द्रवले.सर्वत्र दिसणारे नद्यांचे कोरडे पात्र, त्याच्या शेजारी वाळूत खड्डे करून पाणी शोधणारी मुले, सर्वत्र दिसत होती.ज्या गावी जायचे ते स्टेशन आले. दोघेही भाऊ उतरण्यासाठी आपले सामान घेऊन दारात उभे राहिले.
परंतु जशी गाडी स्टेशनवर आली तसा गावकऱ्याचा एक लोंढा गाडीत शिरला व ते गाडी मधले जे शौचकूप असते त्याच्या नळाचे पाणी आपापल्या हंडे, कळश्या, प्लास्टिकचे डब्बे यात भरून घेऊ लागले. श्यामने एका जर्जर झालेल्या म्हातारीला विचारले, "मावशी, हे पाणी तुमी कशाला घेता?" त्यावर म्हातारी म्हणाली "प्यायला". हे उत्तर एकूण दोघेही भाऊ आंतर्बाह्य हादरले.विकास हा सरकारला शिव्या घालत होता. श्याम मात्र अंतर्मुख झाला होता.
स्टेशन पासून मावशीचे घर दोन मैलावर होते. दोघेही भाऊ चालत निघाले. उन्हाने अंगाची काहिली होत होती. हिरवळ नावाला कुठे दिसत नव्हती. ठिकठिकाणी पोट खपाटीला गेलेले दुष्काळग्रस्त दिसत होते. सात आठ वर्षाची मुले हंडे, कळश्या घेऊन वणवण करत भटकत होती. स्वतालाच खायला नसल्याने जनावेरी कशी पोसायची याचा विचार शेतकऱ्याना पडला होता. अनेकांनी जनावर सोडून दिली होती. बऱ्याच ठिकाणी मेलेली जनावरे दिसत होती. कावळे, गिधाडे त्यांच्यावर तुटून पडली होती.
मावशीच्या घरी आल्यावर त्यांना बघून मावशीला आनंद झाला मावशीचे यजमान हे बागायतदार होते. त्यांच्या स्वताच्या चार विहीरी होत्या पण त्याही तळाला लागल्या होत्या. पावसापर्यंत ह्या कुटुंबाची सोय होणार होती. त्यामुळे त्यांना तशी चिंता नव्हती. मात्र गरिबाचे हाल कुत्रा खात नव्हता. मावशीने त्यांना गावच्या दुष्काळाची परिस्तिथी सांगितली. बरीच माणसे गाव सोडून परागंदा झाली होती व पोटाची खळगी भरण्यासाठी शहरात जात होती. श्याम नि विकास हे दोघेही हि परिस्तिथी पाहून दुखी झाले.सरकारने ह्या लोकांसाठी काहीतरी केले पाहिजे हे विकासचे मत होते.
बाहेर ओसरीवर बसून गप्पा मारत असतानाच पाण्याचा ट्यान्कर आला लोक ट्यान्करवर तुटून पडले.पाण्यासाठी माणसाची झोंबी चालू झाली. हे विलक्षण दृश पाहून काय बोलावे हेच दोघा भावांना सुचेना.मराठवाड्यात पंधरा दिवस राहण्याचा त्यांचा विचार होता पण हा भयानक दुष्काळ बघून विकासने श्यामला तिसऱ्याच दिवशी निघायचे असे सांगितले.त्यानुसार दोघे भाऊ परत आपल्या घरी निघाले.
मराठवाड्यातून आल्यापासून श्याम हा गप्प गप्प राहत होता त्याची हि अस्वस्तथा मालतीबाईनच्या लक्षात आली होती. त्यांनी त्याबाबत विकासला पण विचारले पण त्याला काहीही माहित नव्हते. अखेर विकासने श्यामला विचारले, "श्याम, काय झाले?सध्या तू फार उदास असतोस." यावर श्यामने सांगितले, "दादा, मला अमेरिकाला जायचे नाही." हे एकूण घरात जसा धरणीकंप झाला मालतीबाईनच्या हातातला चहाचा कप गळून पडला.
विकासला यावर काय प्रतिक्रिया द्यावी हेच सुचेना. शेवटी तो रागाने श्यामला म्हणाला, "श्याम, हा काय मूर्खपणा लावलास. लोक अमेरिकेत जायला काहीही करायला तयार होतात. आणि तू हातात आलेली संधी सोडतोयस. तुला वेड तर लागले नाही ना? मला तर वाटते तुला भिकेचे डोहाळे लागलेय." "दादा, तुला जे समजायचे ते समज. जे बोलायचे ते बोल.पण मी अमेरिकाला जाणार नाही. हा माझा ठाम निश्चय आहे"."मग तू इथे राहून करणार तरी काय?" विकास ओरडला.
"दादा आपल्या महाराष्ट्रातला दुष्काळ बघितल्यापासून माझे चित्त थाऱ्यावर नाही. माणसाची अशी अवस्था मी नाही बघू शकत. मी माझ्यापरीने जेवढे होईल तेव्हढे ह्या दुष्काळग्रस्तांसाठी करणार. समविचारी तरुणांची संघटना स्थापन करणार. पाण्याचे योग्य नियोजन कसे करायचे, याचा तज्ञांकडून सल्ला घेऊन गावोगावी फिरून त्यांना मार्गदर्शन करणार.दुष्काळ निवारण व्हावे यासाठी सरकारला जाब विचारणार दुष्काळग्रस्तांसाठी काम करणे हि सरकारची जबाबदारी आहे. त्यांना ह्या जबाबदारीचे पालन करणे भाग पडावे ह्यासाठी मी संघटना स्थापन करणार आहे.
"अरे, श्याम संघटना बांधणे हे खायचे काम वाटले का तुला. ते कितीतरी कठीण काम असते." "दादा, मी ते काम करून दाखवणार याचा मला विश्वास आहे. माझ्या प्रयत्नांमुळे चार दुष्काळग्रस्तांचे प्राण जरी वाचले तरी हा जन्म सार्थकी लागला असे मी समजेन.दादा तू जा अमेरिकाला पण माझे मन तिथे रमणार नाही. माझा देशबांधव उपाशी असताना दुसऱ्या देशात जाऊन मजा मारणे मला तरी जमणार नाही दादा.दुसऱ्याच्या घरी एकादशी असताना त्यांच्या घरी जाऊन पुरणपोळी मागणे हि आपली संस्कृती नाही आहे दादा, मग आज दुष्काळामुळे माझ्या अनेक देश बांधवांना सक्तीची एकादशी घडत असताना मी दुसऱ्या देशात जाऊन पुरणपोळी कशी काय खाऊ शकतो. दादा ते मला जमणार नाही. मला माहिती आहे माझा मार्ग सोपा नाहीये. पण सोप्या गोष्टी सारेच करतात कठीण गोष्टी करायला जे धैर्य लागते ते माझ्यात आहे दादा.दादा, तू जा अमेरिकाला सेटल हो मला मात्र माझ्या देशबांधवांसाठी इथेच राहावे लागेल".
अखेर विकास हा अमेरिकाला गेला. पण श्यामला पाठिंबा देण्यासाठी मालतीबाई मात्र श्याम बरोबरच राहिल्या.
फारच बाळबोध.. पण भावना
फारच बाळबोध.. पण भावना पोचल्या
really touchy
really touchy
खूप छान कथा... असे भरपूर
खूप छान कथा... असे भरपूर महाभाग अमेरिकेत असतात आणि भारत सुधारला पाहिजे म्हणून शिव्या घालतात.
स्वदेस ची आठवण झाली लेख वाचताना.
छान छान गोष्ट
छान छान गोष्ट