Submitted by आर.ए.के. on 25 April, 2013 - 01:35
शोधशील ना रे मला?
जेंव्हा मी हरवेन या अस्ताव्यस्त पसार्यात,
जेंव्हा झाकोळून जाईन मी अपयशाच्या काळोखात,
जेंव्हा कोसळून जाईन जबाबदारीच्या ओझ्याने,
जेंव्हा गमवून बसेन स्वतःवरचा विश्वास,
जेंव्हा उन्मळून पडेन दु:खाच्या वाराने,
जेंव्हा होईन मी अगतिक परिस्थितीच्या चालीने,
जेंव्हा विव्हळेन मी काळाच्या जखमेने,
जेंव्हा जाईन मी दमून चालताना वाटेने,
जेंव्हा विसरुन जाईन मी स्वतःचचं अस्तित्व,
जेंव्हा होईन मुकी या जगाच्या कोलाहलात,
जेंव्हा होईन पांगळी, शक्ति असून पायात,
जेंव्हा होईन बंदिस्त स्वतःच्याच बंदिवासात,
जेंव्हा घेईन लपवून मी स्वतःला एका कोषात,
शोधशील ना रे मला?
सापडेन ना मी तुला?
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
Hi R K ? Apologies be
Hi R K ?
Apologies be accepted please ! My Language toggle does not work some times,
your poem above, is extra-ordinary, only a soul will understand a soul's feelings . . . .
not to exaggerate here, but some how as I finished reading it, very suddenly felt saying. . . .
if I was there, wouldn't have lost the one ever, in stead brought the whole World at her feet
for happiness & still ask. . . . is there anything else I can assist you with ?
be happy, God Bless . . . . you write things in a way you can enter into a human heart
straight . . . . keep it up.
परब्रह्मापुढे आम्हा पामरांनी
परब्रह्मापुढे आम्हा पामरांनी काय बोलावं ? आत्माच व्हावं लागेल.
परब्रम्ह, Kiran...
परब्रम्ह, Kiran... प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद!
Hi Kiran ! R.K. ! True, we
Hi Kiran ! R.K. !
True, we all are Atmas, mostly so occupied in life's routine that we actually forget who we are, some souls, like R.K. at times appears, with such expressions & shakes the whole existence of a human, who then wakes up & realizes, that mistakes done un-knowingly in past could have been avoided & this feeling my Friend.....................makes you very very restless. . . . as if given another chance you would love to correct the mistakes . . . .
Any ways . . . . been through all this, that's how I . . . .
..
..
पुढे लिहीण्यासाठी शब्द नाहीत,
पुढे लिहीण्यासाठी शब्द नाहीत, पण मार्ग सापडतील का, हा प्रश्न आहे . .
अथ पासून तर येथ पर्यंत सार्या
अथ पासून तर येथ पर्यंत सार्या क्रिया करुन बघाव्या लागतील.
ओ परब्रम्ह जी प्लीज प्रतिसाद
ओ परब्रम्ह जी
प्लीज प्रतिसाद मराठीत टाइपा की
आम्हालाही कळूदेत काय म्हणताय ते
वैभव, टाईपलं आहेना ! लाईट
वैभव,
टाईपलं आहेना !
लाईट गेल्यावर अंधारात एकच ओळ लिहावी तसं ! !