Just for Sale...फक्त विकण्यासाठी ….

Submitted by स्वप्ननिल on 25 April, 2013 - 01:13

जगाचा लागलाय "सेल" ,साला करूया सगळ बाय,
तुम्ही भाजी कसली विकताय राव ,त्याने विकायला काढलीय माय.

तो भैय्या विकायचा पण अन तो मद्रशाचा डोसा,
या मल्टी -नेशनल मॉल मध्ये चायनीज कृमि नवर पोट पोसा ,
पाश्यराईजड दुधावरती कधी निघत नसते साय ……
तुम्ही भाजी कसली विकताय राव ,त्याने विकायला काढलीय माय.

पिझ्झा -बर्गर सोबत विकत केलेस्टोल चे दुखणे ,
सारखं छातीत दुखतंय ना ? "Fat Free" मग वर जगणे

विका आणि विकत घ्या ,मंत्र ग्लोबल जगण्याचा ,
सत्व सारी सोडून टाईम दुकान मांडण्याचा,

विकून सारं संपल कि विकल जाईल स्वतःला
"Exchange" मध्ये देवून आत्मा ,समाधान मिळेल हाताला ?

धर्म अफूची गोळी नेहमीच विकली जाते
दंगली आणि उद्रेक संस्कृती जपली जाते
राम रहिम तर विकून झाले आता बुद्ध विकायचा हाय ……
तुम्ही भाजी कसली विकताय राव ,त्याने विकायला काढलीय माय.

Group content visibility: 
Public - accessible to all site users