हरेक गोष्टीमधे जरासा समास ठेवा!

Submitted by कर्दनकाळ on 23 April, 2013 - 06:50

हरेक गोष्टीमधे जरासा समास ठेवा!
जगा, जगू द्या, जिण्यात थोडी मिठास ठेवा!!

बनू नये मांडलीक कोणी कधी कुणाचे!
विचार, आचार, यांत माफक मिजास ठेवा!!

गमावलेली असोत स्वप्ने, हवी सबूरी.....
खुबीखुबीने अखंड चालू तपास ठेवा!

खुशाल संसारही जगाचा कुणी करावा!
बरोबरीने स्वत:स राखीव श्वास ठेवा!!

असो कितीही बिकट जरी वाट नागमोडी;
जरा विसावून, रोज जारी प्रवास ठेवा!

अनेक यात्रेकरू पुढे जायचे उद्याला......
पुढे जरी पोचलात, मागे सुवास ठेवा!

भले किती पायपीट आहे करावयाची;
अवश्य दिवसा करा, निशेला निवास ठेवा!

पडो कितीही घरे जरी काळजास तुमच्या;
जगात मिरवावयास मुखडा झकास ठेवा!

जगात कोणी कधी न राहो कुठे उपाशी!
भुकेजल्यांस्तव हशीखुशीने उपास ठेवा!

चुकून रस्ता तुम्हा घराचा न याद आला!
तुम्हा स्मरायास, उंबराही घरास ठेवा!!

*****************कर्दनकाळ

Group content visibility: 
Public - accessible to all site users

या शब्दकोश कर्त्याचे व आपले माझ्यावर अनंतकोटी उपकार आहेत समीरजी !!

_______________/\_________________

नाहीतर परमपूज्य परमादरणीय शब्द्प्रभू प्रा. देवपूरकर मला देहांतप्रायश्चित्त घडवायला लावायच्या आविर्भावात वावरत होते

पहा देवसर डोळे फाडून पहा मी म्हणालो होतो ना की हा शब्द मराठी भाषेत आहे ते
आता मान्य करा की नुसते असे दोन चार शब्दकोश पाठ करून आपल्याला मराठी भाषा येते असा गैरसमज करून घेवू नये म्हणून

अहो आधी शब्द बनतात मग शब्दकोश ........

आता वाचा माझा शेर अन पहा अर्थ समजतो का ते .........

काहून विठ्ठला बोलू मी अनुतापाची भाषा
मीहून मनाला येथे आणून सोडले आहे

समीरजी पुनश्च आभार
माझ्यासाठी म्हणून नाही तर या शब्दासाठी जी तसदी घेतलीत त्यासाठी या शब्दातर्फे हे आभार आहेत

तिलकधारी आला आहे.

बनू नये मांडलीक कोणी कधी कुणाचे!
विचार, आचार, यांत माफक मिजास ठेवा!!

गमावलेली असोत स्वप्ने, हवी सबूरी.....
खुबीखुबीने अखंड चालू तपास ठेवा!

खुशाल संसारही जगाचा कुणी करावा!
बरोबरीने स्वत:स राखीव श्वास ठेवा!!

असो कितीही बिकट जरी वाट नागमोडी;
जरा विसावून, रोज जारी प्रवास ठेवा!

पडो कितीही घरे जरी काळजास तुमच्या;
जगात मिरवावयास मुखडा झकास ठेवा!

शेर गझलेच्या भावास साजेसे झाले आहेत. तिलकधारी हर्षित झाला आहे. उर्दू शैलीची मांडणीही अंधुकपणे जाणवली. यात अनुकरणाचा आरोप नसून स्तुतीच आहे.

तिलकधारी निघत आहे.

शब्दकोषातील शब्द पाहिला!
पण आम्हास तो प्रचलित शब्द न वाटल्याने व कानास कसे तरीच वाटल्याने रुचला नाही! न रुचण्याचा अधिकार प्रत्येकाला असतो!

आता मान्य करा की नुसते असे दोन चार शब्दकोश पाठ करून आपल्याला मराठी भाषा येते असा गैरसमज करून घेवू नये म्हणून <<<<<<<<<

आम्हाला मराठी भाषा येते हा गैरसमज तुला कधीपासून झाला?

माझ्या या खालच्या शेराने तुम्हाला कावीळ का झालेली होती?

>>>साहसे खरे लिहायची इथेच आटली
कागदात आखला समास एक आपला<<<

या इथे आपण लिहिलेले प्रबंध आपल्यातील 'वकूब नसूनही जोपासलेला अहं' दाखवत आहेत.

साहसे खरे लिहायची इथेच आटली
कागदात आखला समास एक आपला<<<<<<भूषण कटककर

राहते चिमूट लेखनात कोणती तरी;
कागदात आखतो समास एक आपला!<<<<<<<<<<<<प्रा.सतीश देवपूरकर

अजूनही आमचा हाच दावा आहे की वरील दोन शेरात प्रा.सतीश देवपूरकरांनी लिहिलेला शेर व त्यात राबवलेली समास ही प्रतिमा थेट व हृदयंगम आहे!

कोणत्याही nonmayboleekrar सहृदयी रसिकाला वरील दोन्ही शेर म्हणून दाखवा, कोणता शेर थेट व सरस आहे हे उत्तर आपणास मिळेल!

आम्ही लिहिलेले प्रबंधही वाचून दाखवा, लिहिणा-याच्या वकुबाविषयीही अचूक उत्तर मिळेल!
फक्त स्वीकारायची मानसिक तयारी ठेवा म्हणजे झाले!

कोणत्याही nonmayboleekrar सहृदयी रसिकाला वरील दोन्ही शेर म्हणून दाखवा, कोणता शेर थेट व सरस आहे हे उत्तर आपणास मिळेल!<<<<<<

हम्म्म्म्म् !!!!!

काय् वदायचे ....वदणेच संपले !!!
करण आम्ही पडलो मायबोलीकर ना !! आम्हाला सरळ्सरळ "नो एंट्री" ची पाटी दाखवली आहे
Sad

व्य़क्तिविद्वेष आड येऊ नये म्हणून nonmayboleekrar सहृदयी रसिकाला असे म्हटले आहे!
कारण मायबोलीवर गझलकार कोण हे आधी पाहिले जाते, मग कोणता सूर आळवायचा हे ठरवले जाते!
गझलेपेक्षा गझलकाराकडे पाहून दिलेले प्रतिसाद हे किती प्रामाणिक असतात हे त्या त्या प्रतिसाद देणा-यांना व परमेश्वरालाच ठाऊक!

टीप: प्रा.सतीश देवपूरकर/गझलवेडा/गझलप्रेमी/कर्दनकाळ.................यांच्या कोणत्याही गझलेवरील प्रतिसाद पहावेत, म्हणजे उत्तर आपोआप मिळेल!

Pages