प्राचीन हिंदु साम्राज्य सत्ता

Submitted by रमेश भिडे on 22 April, 2013 - 09:46

"नगर चंपा"
हया नावाचे हिंदु साम्राज्य सध्याच्या दक्षीण व्हिएट्नाममध्ये होते हे साधारण आपल्या
देशातल्या फ़ार फार कमी लोकांना माहीती असते,ते कुठे होते हे माहीत असणे दूरची गोष्ट.
हे राज्य अथवा हा राज्यसमूह हा हिंदु साम्राज्याचे पूर्वेचे जवळ जवळ टोक होते.जिज्ञासूसाठी मी या राज्याच्या
नकाशाची लिंक खाली देत आहे.

http://en.wikipedia.org/wiki/File:VietnamChampa1.gif

या राज्याचे
नाव इतीहासात चिनी कागदपत्रात [भारतात आम्ही इतीहास हा कागदपत्रांवर
नाही भ्रामक आणि खूळचट समजुतींवर आधारतो.] साधारण इ.स. १९२ च्या आसपास येते. इसवी सनाच्या
पहिल्या शतकात खू लिएन नावाच्या एका स्थानीक राजाने चीनी सम्राटांविरुध्द बंड करुन हिंदु धर्म
स्विकारला आणि चंपा राजवटीची घोषणा केली.
उत्तर
व्हिएट्नाम हा चीनच्या अधीपत्याखाली होता त्यामुळे या राज्याच्या चीनी सम्राटांशी सतत
लढाया चालू होत्या. दूसरया ते सातव्या शतकात या राज्याबद्दल फार माहिती नाही. यांची
राजधानी सुरवातीला सिंहपुर येथे होती.या राजवटीच्या ४ थ्या शतकापर्यंत च्या राजांची
संस्कृत नावे इतिहासाला माहित नाहीत चिनी नावे आहेत.
या काळात
यांनी बरेच बांधकाम केले आणि विष्णूची मंदीरे बांधली.हे लोक मलाई-पालिनेशियन वंशसमुहाचे
होते.यांना "चाम,चम अथवा त्सयाम " वंशसमूह म्हणत आणि त्यांची भाषाही
चम भाषा होती.
इ.स.चवथ्या
शतकातल्या चम भाषेतल्या शिलालेखात लिहीले आहे की महर्षी भृगुच्या कूळातल्या ब्राह्मणांनी
समुद्र मार्गाने येउन या लोकांना वेदिक धर्माची दिक्षा दिली.

चिनी दरबारातल्या कागदपत्रात हे राज्य आपल्या सीमा
सतत वाढवत असल्याचा उल्लेख आहे.हा गणराज्यांचा समुह होता आणि यातली नावारुपाला आलेली
शहरे होती १] इंद्रपुरी २] अमरावती ३] विजया ४] कुठार ५] अतीशय आश्चर्यजनक नाव म्हणजे
" पांडूरंग " .या पांडूरंग गावाचे आजचे व्हिएट्नामी भाषेतले नाव आहे
"पान रंग ".

इ.स. ३/४ शतकात वैष्णव पंथाचा त्याग करुन हे लोक शैवपंथी झाले.इ.स. ४ थ्या शतकात
यांचा प्रसिध्द राजा भद्रवर्मन होउन गेला.याच्या कारकीर्दीतले बरेच चम शिलालेख आहेत.शिव-ऊमा
यांची उपासना होती. लोक विटांच्या घरात रहात ,कान टोचत, राजे लोक हत्तीवर जात आणि त्यांच्या
डोक्यावर छ्त्र असे. लग्न हे दर महिन्याच्या अष्टमीला होत असे.मनुष्य मेल्यावर त्याचे
दहन आणि अस्थीविसर्जन होते असे. जातिभेदाचा उल्लेख नाही.
हे चम
लोक फार चांगले नौका बांधणी कारीगर होते.या राज्यात बांधलेल्या नौका या चीन, दक्षीण
भारत,लन्का, बर्मा, थायलंड, इंडोनेशिया इ. ठिकाणी निर्यात होत.

इ.स.४ थ्या शतकात संस्कृत शिलालेखही आढळायला सुरवात होते.भगदत्त नावाच्या राजाचा
उल्लेख इ.स.५१६ मध्ये आहे.या राजाची राजधानी इंद्रपुरी होती,आणि त्याच्या दरबारी भारतातून
आलेले असंख्य ब्राह्मण होते असा उल्लेख आहे.
इ.स. ८७५ मध्ये इंद्रवर्मन २ या राजाने हिंदु धर्माचा त्याग करुन बौध्द धर्म स्विकारला.
इ.सनाच्या
९/१० शतकात ही राज्ये वैभवाच्या शिखराला होती. व्हिएटनाम मधल्या माई सोन या गावापाशी
या राजवटीने बांधलेला देउळ समुह आहे हा कंबोडियातल्या अंगकोर वाट पेक्षा लहान आहे पण
शिल्पकलेचा अतिशय उत्कृष्ट नमुना आहे. इंटरनेट्वर याचे फोटो बघा,फार सुंदर आहेत.

इ.स. ९७५ मध्ये उत्तर व्हिएट्नामशी झालेल्या अनेक
युध्दात पराभव झाल्यावर या राजांनी इंद्रपुरी सोडून आपली राजधानी दक्षीणेला विजया इथे
हलविली. १०२१,१०२६ आणि १०४४ मध्ये उत्तरेशी युध्दे झाली त्यात पराभव झाल्याने हे राज्य
अजुन संकोच पावले आणि यानी आपली राजधानी "पांडूरंग" इथे हलविली.या काळात
राजा रुद्रवर्मन होता. या सर्व कालखंडात आपल्या रीतीप्रमाणे हे राज्य शेजारच्या हिंदु कंबोडियाशी लढण्यात धन्यता मानत होते.
इ.स.च्या १० शतकात शैव पंथ पुन्हा या राज्याचा धर्म झाला. यांचा भारताशी संबध आणि
संपर्क साधारण ७ व्या शतकातच तूट्ला होता
१३०७
मध्ये जय सिंहवर्मन राजाने आणखी मुलुख गमावला. १४०६ मध्ये चंपाधिराय या राजाचा व्हिएट्नामने
पराभव करुन ३ प्रांत जिंकून घेतले.
चंपा
राज्याचा शेवटचा मोठा राजा हा " चे बुंगा" होता .आपला संपर्क तूटल्याने याचे
खरे नाव इतिहासाला अज्ञात आहे. याने चंपा आपल्या अधिअपत्याखाली इ.स. १३६० ते १३९० मध्ये
एकत्र केला आणि व्हिएट्नामचा पराभव करत थेट सध्याच्या हनोई पर्यंत धडक मारली.

१४४६ पासुन व्हिएट्नामच्या फौजांनी या राज्याला पराभुत करायला सुरुवात केली.१४७० मध्ये उत्तर व्हिएट्नामशी झालेल्या युध्दात या राज्याचा पूर्ण पराभव झाला.विजयानगरी
नष्ट झाली आणि व्हिएटनामी लोकांनी ६०,००० चम लोकांची कत्तल केली. यानतंर रडत खडत व्हिएट्नामच्या ताब्यातले एक संस्थान म्हणून हे राज्य "पांडूरंग"
या गावी इ.स. १८३२ पर्यंत अस्तित्वात होते.

इ.स. च्या १५ व्या शतकात या राज्यातले बहुसंख्य लोक शातंतापूर्वक मुस्लिम झाले.
या मुस्लिम झालेल्या राजांची पदवी तरीही " शक्तीराय
" होती. मला नाही वाट्त या १८३२ पर्यंत अस्तीत्वात असलेल्या राज्याशी कोणी भारतियांनी
संपर्क साधला असेल.

अर्थात जो समाज अमाप कर्तुत्वाच्या पहिल्या बाजीरावासारख्या
पुरुषाचा मस्तानीपासुन झालेल्या समशेर बहाद्दरचे उपनयन करायला नकार देउन त्या वंशाला
बांद्याचे नवाब बनवतो आणि एका कर्तुत्ववान पुरुषाचा वंश परधर्मात जाउ देतो त्या समाजाकडून
काय अपेक्षा ठेवणार.

आश्चर्याची
गोष्ट म्हणजे अजुनही या चम लोकांमध्ये थोडे हिंदु लोक आहेत. विश्व हिंदु परीषदेच्या विश्वपणामध्ये हे हरवलेले आणि उरलेले
थोडे काही हिंदु बांधव येतात का नाही हे मला जर कोणी सांगितले तर बरे होईल.

मला राहुन राहुन एका गोष्टीचे आश्चर्य वाटते की हा असा वैभवशाली इतिहास अभ्यासायचे
सोडून आपला समाज स्वामींच्या चरीत्राची पारायणे करण्यात धन्यता का मानतो.
आमच्या समाजाला स्वतःचा नाश होतांना दिसत नाही का? का आमची बुध्दी,आमची प्रज्ञा,आमचे
भविष्याचे ज्ञान या सगळ्याला धर्म आणि देश संरक्षण यासाठी विज्ञाननिष्ठ तल्लख बुध्दी
लागते हे का दिसत नाही अथवा ती बुध्दी सध्याच्या काळात आर्थीक तलवार असते हे सत्य का
दिसत नाही!!

रस्ते स्वच्छ ठेवा,जागोजागी थुंकु नका,झाडे लावा, वाह्तुकीचे नियम पाळा या साध्यासाध्या
गोष्टींऎवजी शनीवारी मारुतीला तेल कुठल्या पळीने वाहावे, सिध्दीविनायकाच्या उंदराच्या
कानात नवस का बोलावा इ. गोष्टी या समाजाला चर्चा करायला कशा आवडतात हे माझ्या अल्पमतीला
खरोखरच कळत नाही.

समुद्र ओलांडायचा नाही, इतर धर्मियांना हिंदू धर्मात घेणे नाही ह्या धर्माज्ञा इ.स. ७/८ व्या शतकातल्या आहेत. तेंव्हा तेथे जाउन वैदिक धर्माची दीक्षा देणे ही क्रांती नसून तो आपल्या समाजाचा नित्य व्यवहार होता जो मूर्ख ब्राह्मणानी शतमूर्खपणाने बंद पाडला.ही कुपमंडूक वृत्ती आपल्या समाजात का ,कशी आणि केंव्हा आली या प्रश्नाचे उत्तर मला अजूनही मिळाले नाही.

मला स्वतः ला यात कुठेतरी आदी शंकराचार्य [इ.स ७८८ ते इ.स. ८२० ] याला जबाबदार होते असे वाटते.
हिंदू धर्मात शंकराचार्यांच्या काळापर्यंत ९ दर्शने [९ वेगवेगळी तत्वज्ञाने] होती जी सगळीच वंदनीय होती. यात कशालाही न मानणारे पूर्ण नास्तिक चार्वाक होते ,बौध्द होते ,जैन होते.या सगळ्यांचे आपापसात वादविवाद चालत .पण सगळे मान्य होते आणि हिंदू धर्मात इतरांना घेण्यास व्रात्यस्तोम विधी होता.आदी शंकराचार्यांनी बौध्द धर्माचा परभाव/नाश केला ही चुकीची कल्पना आपल्या समाजात रूढ आहे .बौध धर्म भारतात बरेच मठ सोडले तर इ.स २ ऱ्या शतकापासून उतरणीला .लागला होता,

आचार्य अतिशय बुद्धिमान होते,वादपटू होते आणि हेकट होते. आचार्यांनी अव्दैत धरम[दर्शन ] हे इतर सर्वांवर विजय मिळवून प्रस्थापित तर केले पण त्यासोबत हिंदू धर्माला बरेच बंदिस्त केले [Rigid ] . आणि एकदा धर्म rigid झाला की मग धर्मगुरूंचे फावते आणि हवे तसे फतवे जारी केले जातात. मग तालेबान आणि वहाबीप्रमाणे तो धर्म जास्त जास्त कठोर ,दुष्ट असा होत जातो.

आश्चर्य वाटते की आचार्य इतके तर्ककठोर आणि बुद्धिमान असून त्यांनी ही फलश्रुती कशी भविष्यकाळात तर्काची नजर टाकून विचारात घेतली नाही नाही...

पूर्ण अध्यात्म नाश पावून अथवा फक्त अध्यात्म करून जर हा देश पुन्हा महान होणार असेल तर मला चालेल.

खर्‍या हिंदु धर्माने आपल्या प्रज्वलित बुध्दीच्या उजेडाने शेकडो वर्षे हा भारत
देश आणि आजुबाजुच्या देशांचा आसमंत उजळून टाकला होता हे चिरतंन सत्य कधी आपण ओळखणार
आहोत.

Based on post by Mr. Ajit Pimpalkhare

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भिडे
माहितीबद्दल आभार. व्हिएटनाममधल्या मंदिरांबद्दल डिस्कव्हरीवर फिल्म दाखवली होती ना ?

खरच आपल्या प्राचीन संस्कॄत ग्रंथांमधे असंख्य असे वैज्ञानिक पुरावेसुद्धा सापडतात. हल्लीच पाहीलेली ही लि़ंक बरच काही सुचवते. https://www.youtube.com/watch?v=1FOR1PwTbg4
अस असुनही बहुतेकजण युरोप, अमेरीके मध्ये कसे नवीन शोध लागतात, भारत कसा पाश्चात्यांच्या संशोधनाचा नुसता उपयोग करतो, ईंग्रजांच भारतावर राज्य नसत तर आपण कसे मागे असतो अस काही बाही लिहीत असतात.
खरतर भारतातल्या पौराणिक संस्कॄत ग्रंथांमधुन सखोल संशोधन झाल पाहिजे.

असो छोटासा पण छान लेख आहे.

सुंदर लेख. खरे तर हिँदू धर्माचा र्हास कोणी केला असेल काही हेकट ब्राम्हणांनी ! अहो , आज जो काश्मिर आहे तो आगोदर पुर्ण हिँदू होता. पण मुस्लिम राजवट आल्यावर जबरदस्तीने त्यांना मुस्लिम केले गेले . जेव्हा हिँदू राजा हरीचे राज्य आले तेव्हा त्या धर्माँतरीत लोकांनी राजाला विनंती केली की आम्हाला मुळ धर्मात यायचे आहे , राजाने याला हिरवा कंदिल दाखवला व मोठ्या सामुहिक धर्म प्रवेश कार्यक्रम ठेवला तेव्हा आपल्या धर्माचे कट्टर अनुयायी, धर्मरक्षक काही ब्राम्हणांनी याला विरोध केला व सांगितले की ह्या लोकांना जर हिँदू धर्मात घेतले तर आम्ही 100 ब्राम्हण आत्मदहन करू झाले तो कार्यक्रम राजाला रद्द करावा लागला . ते लोक मुस्लिम राहिले व त्यांनीच काश्मिरी पंडितांना पळता भुई थोडी केली. ह्या सर्व गोष्टीँमुळे खुप वाईट वाटते .

अभ्यासपूर्ण लिहिता अपण मला वाचायला आवडते

पण या बाबींचा आता काय उपयोग
आता या देताय तुम्ही पण याची सामजिक गरज काय हेही सांगा
फक्त माहीती नको तात्पर्ये द्या

रमेश, हेलबॉय, विस्मया, बंडुपंत, धनंजय, वैभव...... नमस्कार,

विषय ऊत्क्रुष्ट आहे, माहिति अगदी बरोबर आहे, चर्चा चालु राहु द्यावी. . . .

खरंतर आपण कितपत मागे वळुन पहातो आहोत हे खूप महत्वाचं आहे. सांगायच झालं तर आपण एक महत्वाची गोष्ट लक्षात घेत नाहि, सम्राट चंद्रगुप्त च्या वेळी भारता च्या सीमा खूपच मोठ्या होत्या. पुर्वेकडे चीन पर्यन्त, उत्तरेला पूर्ण हिमालय ( मानस्-सरोवरा सह ), दक्षिणेस पूर्ण, पश्चिमेला आत्ताच्या अफगाणिस्तानच्याही पश्चिमे पर्यन्त, ह्यात आजचे बाकिचे सर्व देश आले. आणी तुम्हि म्हणता तसे समुद्र ओलांडुन आणखीन पुढे. . . . हे सगळं सत्य आहे, पण पूर्ण नाहि.

मित्रहो ! ! ! ! पूर्ण सत्य हे आहे कि आपले वर्चस्व एकेकाळी पूर्ण पृथ्वीवर होते . . . . त्याच्याहि खूप्-खूप मागे पहाल तर सुह्रुदयांन्नो. . . . संपूर्ण ब्रम्हांडावर ह्या धर्माचे अधिपत्य होते.

असे. . . . प्रत्येक युगात, प्रत्येक सहस्त्रानंतर जर आपण कुठेहि मध्ये उभे राहुन मागचे अवलोकन केले तर आत्ता जे आपण अनुभवतो आहोत, तोच अनुभव भूतकाळात ही आला आहे सर्वांना.

मी जर आज असं म्हणालो कि, प्रत्येक युगात धर्माचे संक्रमण होत असते, आणी जेव्हा पाणी डोक्यावरुन वहायला लागतं तेव्हा धर्माचे ऊत्थापन करण्यासाठी देव आपल्या सर्व गुणांबरोबर अवतरित होतो आणी पुनःस्थापना करतो, तर लोकांना वाटते कि काय वाटेल ते बोल तो . . . .! का ? कारण जर नीटपणे अभ्यास नाही केला , आणी कुठेतरी मध्येच धागा धरुन पुढे गेलं कि असंच होणार ! हा धागा कुठुन आला, ह्याची सुरुवात कुठे झाली ह्याचे अवलोकन करणे फार महत्वाचे आहे.
दक्षिण भारतातुन लंके पर्यंत जाण्यासाठी बांधलेला रामसेतु अजुनहि आपण पाहु शकतो....महाभारताच्या महायुद्धानंतर भगवान बलरामाने रौद्र रूप धारण करुन आपल्या नांगराने द्वारका उखडली आणी ओढत समुद्रात बुडविण्यासाठी घेऊन जाऊ लागला तेव्हा काही ऋषिंच्या विनंतीमुळे त्याने आपला विचार बदलला आणी द्वारका ओढत आणली होति तिथेच सोडुन दिली....... ती अर्धी समुद्रात बुडालेलि द्वारका आजही पहायला मिळते. ते समुद्रात मिळालेले प्राचीन शिल्प कलेचे नमुने आजच्या तारखेला जगातील सर्वात प्राचीन संस्कृती मानली गेली आहे.

अहो एव्हढेच काय ! त्या अतिप्राचीन युगात, त्या समुद्र मंथनामुळे जी त्या चमत्कारिक प्रकारच्या गतिने जे काहि चुंबकीय क्षेत्र निर्माण केलं त्याची प्रचिती आजही त्या समुद्री प्रदेशात येते ज्याला आता बर्म्युडा ट्रायंगल म्हणतात . . . .

मित्रहो ! ! ! ! भगवान श्रीकृष्णाच्या अवतरणाची ( जन्माची ) वेळ आणी त्यावेळी जी ग्रहांची स्थिती होति, त्या स्थितीपर्यन्त पोहोचण्यासाठी जर उलट भूत काळात गणना केली तर आपण जवळ जवळ येशू-ख्रिस्ताच्या ही मागे ३५०० वर्षे पोहोचतो, ह्याचा अर्थ श्रीकृष्णाचे अवतरण ह्याच पृथ्वीवर ५५०० वर्षांपुर्वि झाले आहे........ह्याच श्रीकृष्णाच्या श्याम नावापासुन "सयाम" हे एका प्रदेशाचे नांव पडले होते . . . .हे अगदीच छोटे उदाहरण झाले. . . .

शास्त्रांमध्ये प्राचीन काळी ह्या पृथ्वीचे नऊ खंड पडले होते, त्यांतिल भरतवर्श म्हणजे आपला भारत. . . .

आणी हे सगळे ईथे सांगण्याचे तात्पर्य हे, कि धैर्य न सोडता हे लक्षात ठेवावे कि आता जो जगप्रलय सांगीतला गेला आहे तो, अग्नी-प्रलय होणार आहे, आणी आपण बहुतेक कलियुगाच्या अंताजवळपास आहोत.
ग्लोबल वार्मींग सुरु झालेलं आहे . . . . आणी पुन्हा एकदा, आपल्या भारतातच, कुठेतरी " शंभलग्राम", नांवाच्या ( हे नांव पुराण शास्त्रात आहे ) गांवी ( ते नांव आता काय असावं ? ) तो भगवान कल्कि म्हणुन अवतरणार आहे . . . . पुढचे सर्वांना माहितिच असेल ?

परिवर्तन हा ह्या सृष्टिचा नियम आहे, तेव्हा चांगली गोष्ट हळुहळु बदल घडुन वाईट होते आणी शेवटी हे वाईट ही नाशवंत आहे......... फरक फक्त हाच कि ह्या संपुर्ण प्रवासात आपण कुठे आवतरलो ? कुठे उभे आहोत ?

Do we want to go through every thing & every moment of the time ?
Or ?
Let the every moment & every thing go through us in time ?

Which one should be stable & un-disturbed ?

आता हे लेखन थांबवतो, आज काहि जास्तिच लिहुन काढलं मी बहुतेक . . . .

>>>>> समुद्र ओलांडायचा नाही, इतर धर्मियांना हिंदू धर्मात घेणे नाही ह्या धर्माज्ञा इ.स. ७/८ व्या शतकातल्या आहेत. तेंव्हा तेथे जाउन वैदिक धर्माची दीक्षा देणे ही क्रांती नसून तो आपल्या समाजाचा नित्य व्यवहार होता जो मूर्ख ब्राह्मणानी शतमूर्खपणाने बंद पाडला.ही कुपमंडूक वृत्ती आपल्या समाजात का ,कशी आणि केंव्हा आली या प्रश्नाचे उत्तर मला अजूनही मिळाले नाही. <<<<<<<
जोवर विसाव्याएकविसाव्या शतकातील "मूर्ख ब्राह्मण" या पुर्वग्रहातून तुम्ही बाहेर येत नाही, तोवर हे उत्तर मिळणारही नाही. अन याचे सुस्पष्ट उत्तर देण्याइतपत वैचारिक स्वातन्त्र्य ये देशी सद्यस्थितीत नाही.

>>>>> मला स्वतः ला यात कुठेतरी आदी शंकराचार्य [इ.स ७८८ ते इ.स. ८२० ] याला जबाबदार होते असे वाटते. <<<<
मला तसे वाटत नाही, उलट वरील बन्धने, व शन्कराचार्यान्च्या उगमामुळे, जो काय वैदिक धर्म शिल्लक आहे, तो राहिलाय, अन्यथा .... जाउदे, पुन्हा तेच, वैचारिक स्वातन्त्र्य नाही!
असो.

अन्य माहिती/लिन्क्स बद्दल धन्यवाद. Happy

लिंबुजी,

जातिय टिका झाली तरी मनाला लाऊन घेऊ नये. ब्राह्मण हे सॉफ्ट टार्गेट आहे म्हणुन विषारी टीका होते. ज्यांना हा लेख पटला आहे आणि ज्यांना त्याची खरी कारणे शोधायची आहेत त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या समग्र साहित्याचे अध्ययन केल्यास याची उत्तरे मिळतील.

केवळ समुद्र ओलांडणे धर्म संमत नाही ह्या गोष्टीने हे घडले असे संभव नाही.

मला एक थोडा बाळबोध प्रश्न विचारायचा आहे...या एकाच गोष्टीत मला कनफ्युजन असल्याने विचारत आहे.....मध्यंतरी एक वाद निर्माण झाला होता की रामायण माहाभारत हे घडलेच नाही आहे...जर घडले असेल तर हस्तिनापुर , अयोध्या मधील राजवाडे कुठे आहेत?????? आता मला असा प्रश्न आहे की जर असं काही घडलं नाही असे काही लोक म्हणतात तर द्वारका समुद्रात कशी सापडली??? महाभारतात सर्वात मोठा सहभाग श्री क्रुष्णाचा च होता....त्याची द्वारका सापडु शकते म्हणजे भगवान श्री क्रुष्ण होते....मग बाकीच्या ठिकाणांचं काय.....दुसरी गोष्ट ...गांधारी हीचा देश काश्मीर किंवा त्याच्याच जवळपास होता असे एका पुस्तकात वाचलयं....अजुनही खुप गोष्टी आहेत पण मग हा मुद्दा का काढला गेला की रामायण ,माहाभारत घडलेच नाही......कोणीतरी मार्गदर्शन करा...

अयोध्या मधील राजवाडे कुठे आहेत?? <<< इथे ४०० वर्षा पुर्विचे शिवकालीन वाड्यांचेच अवशेष नामशेष होत चाललेत रामायण महाभारतातले काय आणि कितीसे शिल्लक राहिले असेल

Anishka,

Please view my points given above, you may get your answers. . . .

Sorry for my language, toggle is not happening,

जो मूर्ख ब्राह्मणानी शतमूर्खपणाने बंद पाडला>>>>>> अगदी खरे आहे हे अगदीच खरे लिंबूजी धन्यवाद या वाक्यासाठी

परब्रम्ह्जी तुम्हीही बरेचसे नेमके बोललात .........

१) रामायण ,माहाभारत घडलेच नाही>>>>>>>>>>
२)आदी शंकराचार्य [इ.स ७८८ ते इ.स. ८२० ] याला जबाबदार होते >>>>>>>>>>>>>>>>>>>
.............घालून पाडून बोलून निषेध करण्यात येईल असली वाक्ये पेरू नयेत !!!! एक प्रेमळ तंबी !!!

घालून पाडून बोलून निषेध करण्यात येईल असली वाक्ये पेरू नयेत>>>>>>>>> असं काही करायचा विचार नाही....हा वाद मी ऐकला आहे म्हणुन मला त्यावर थोडं जाणुन घ्यायचं आहे इतकचं....

परब्रम्ह्...... ते मी पाहीलं पण अजुनही बरेचसे प्रश्न अनुत्तरीत आहेत.....

>>> केवळ समुद्र ओलांडणे धर्म संमत नाही ह्या गोष्टीने हे घडले असे संभव नाही <<
नितिनचंद्र, बरोबर. तत्कालिक बाह्य परिस्थितीस अनुसरुन, शत्रूच्या उभ्या अस्तित्वाची दखल घेऊन असुरक्षित कासव जसे काही काळ आपले अन्गहातपायडोके कवचात चोरून घेऊन बन्दिस्त करते तशागत हे समुद्र न ओलान्डण्याचे बन्धन होते,
अन इतकेच जर असेल, तर "अरबी" समुद्र ओलान्डून कोणत्या "भूभागास" भिडल्यानन्तर कोणत्या वंश/धर्माचे असे कोणते लोक भेटणार होते की ज्यान्ची भिती पडली असेल, हा विचार देखिल का केला जात नाही? Wink

अनिश्का,

परब्रम्ह्...... ते मी पाहीलं पण अजुनही बरेचसे प्रश्न अनुत्तरीत आहेत.....> > > > प्रश्न काय आहेत ?

>>>> जो मूर्ख ब्राह्मणानी शतमूर्खपणाने बंद पाडला>>>>>> अगदी खरे आहे हे अगदीच खरे लिंबूजी धन्यवाद या वाक्यासाठी <<<<<<<<<<<<<<<<<<<<<

वै.कु. ते वाक्य माझे नाहीये, मला कशाला धन्यवाद देता? मी ते वाक्य वरील लेखातून संदर्भासाठी उचलुन त्यावर माझे भाष्य पुढे दिले आहे.

या विद्वतसभेत फक्त टंकणा-याच्या बोटांकडे डोळ्याचा आ वासून पहावे लागते आहे.

>>>> या विद्वतसभेत फक्त टंकणा-याच्या बोटांकडे डोळ्याचा आ वासून पहावे लागते आहे. <<<<<
अगदी अगदी, नवल नाही,
महाभारतातील कौरव पान्डव युद्धाचे वर्णन सान्गणार्‍या सन्जयची अन ऐकणार्‍या आन्धळ्या धृतराष्ट्राचीदेखिल, प्रत्यक्ष युद्धजन्य परिस्थिती व युद्ध बघुन्/ऐकुन अगदी अशीच काहीशी अवस्था झाली होती असे "कुठेतरी वाचणात" आले आहे माझ्या Wink