प्रश्न किती ?

Submitted by आर.ए.के. on 22 April, 2013 - 00:42

शब्द किती ? संदर्भ किती ?
हरवलेल्या, घुसमटलेल्या जीवनास या अर्थ किती ?
दु:ख किती ? उद्वेग किती ?
लपवलेल्या, दबवलेल्या, हुंकारांचे ध्वनि किती ?
स्फोट किती ? हादरे किती ?
लुळ्या-पांगळ्या आंदोलनांचे,मुके-बहिरे उद्रेक किती ?
प्रवाह किती ? लाटा किती ?
प्रहारांनी ओथंबून ओलावणारे दगड किती ?
आग किती ? चटके किती ?
फुंकरेने पेटते ती, लपवलेली धग किती ?
ऊन किती ? अन झळा किती ?
तप्त धरेहून चालणारी , विझलेली मने किती ?
दोषी किती ? अश्राप किती ?
सभ्यतेच्या बुरख्याखाली दडलेले पाप किती ?
पाऊस किती ? पाणी किती ?
चिखलातून चालणारी, पेटलेली मने किती ?
प्रश्न किती ? कोडी किती ?
उत्तरांच्या प्रतिक्षेत अडकलेली गणिते किती ?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

२७

लुळ्या-पांगळ्या आंदोलनांचे,मुके-बहिरे उद्रेक किती >>>

ऊन किती अन झळा किती
तप्त धरेहून चालणारी , विझलेली मने किती

वाह ! खूप छान

प्रश्नचिन्ह काढून टाकता येतील का ? शीर्षक वेगळं हवं असं वाटतंय का ?

@ Kiran...
प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
प्रश्नचिन्हं मी मुद्दामहून टाकली होती. आणि शीर्षक कवितेत बरीच प्रश्नं आहेत म्हणून तसे दिले होते.
तरी आपण सुचवले आहे तर नक्कीच विचार करेन..बाकी तुम्हीही एखादे सुचवू शकता.

तरी आपण सुचवले आहे तर नक्कीच विचार करेन..बाकी तुम्हीही एखादे सुचवू शकता. >>

मी काय सुचवणार ? मला काहीच नीट जमत नाही. तुम्ही मायबोलीवरच्या चांगल्या कवी/यत्रींच्या कविता वाचाव्यात असं मला वाटतं. खूप जण आहेत इथे. कुणाचं नाव राहीलं तर नाराजी नको म्हणून देत नाही. तुम्हाला कळून येइलच हळू हळू. तरी पण एक दोन नावं सुचवतो. सांजसंध्या, विस्मया यांच्या कविता वाचा तुम्ही. Happy