निवृत्ती जवळ l

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 19 April, 2013 - 09:29

निवृत्ती जवळ l
बसता केवळ l
निवे सारा जाळ
अंतरीचा ll १ ll
अभंग हरिपाठ l
विणेकरी गात l
अर्थ हृदयात l
उमलला ll२ ll
समाधी दर्शन l
दृढ आलिंगन l
जाहली संपूर्ण l
तीर्थयात्रा ll३ ll
पावला शंकर l
श्री त्रंबकेश्वर l
नाथपदा वर l
मज पुन्हा ll ४ ll

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नेहमीप्रमाणेच भावार्त रचना.
रच्याकने, 'निवृत्ती जवळ ' या शीर्षकाने थोडी दिशाभूल झाली Happy