प्रो. भांडारदरे आणि मी: एक रम्य रिक्षाप्रवास..

Submitted by सुशांत खुरसाले on 18 April, 2013 - 10:42

प्रोफेसर भांडारदरेंना दरदरून घाम फुटला होता. कारणही तसेच होते. त्यांच्याशेजारी बसलेल्या एकोणीसवर्षीय तरुणीला बॉयफ्रेंडचा फोन आल्याने रिक्षातील एकूणच वातावरण सामाजिक अधःपतनाला अनुकूल झाले होते.
त्यातच रिक्षावाल्याने 'चाहत न होती तो कुछ भी न होता
मै भी न होती तू भी न होता '
आदी भणंगछाप गाणे वाजवायला सुरुवात केल्याने तरूणीचा आनंदकल्लोळ आणि प्रोफेसरांचा नैतिकक्षोभ या दोन्ही गोष्टी एकत्रितपणे पाहण्याचे महत्भाग्य मला लाभले. या सर्व प्रकाराने माझे स्वयंघोषित निर्मितीक्षम मन साहित्यनिर्मितीच्या नवउमाळ्यांनी झुरु लागले.
प्रोफेसरांच्या शेजारी बसलेला तरूण फारच अरसिक भासत होता. कारण फोनवर बोलणार्‍या संबंधित तरूणीने तीन ते चार वेळा नजरमिलाफ करण्याचा प्रामाणिक व लडिवाळ प्रयत्न करुनही त्याने कुठलीच दाद दिली नाही. त्यामुळे एकूणच रिक्षातील त्याचा सहभाग अर्थशुन्यतेच्या पातळीला गेला होता. आंघोळ न करता आलेल्य रिक्षावाल्याच्या शेजारी बसण्याचा मान मला मिळाला . ( रिक्षावाल्याशेजारीच बसणे या प्रकारास आमच्या शहरात राजमान्यता आहे.)
'मै तुलसी तेरे आंगण की ' असं लिहिलेल्या आरशातून तरुणीने थेट रिक्षावाल्याच्या डोळ्यांचा वेध घेतला. त्यामुळे रिक्षावल्यास जोम चढुन त्याने तीन -चार वळणे अशी घेतली की ,डाव्या गालावर तीळ असणार्या प्रोफेसरांचा
जीव आपले सामाजिक ब्रम्हचर्य टिकवण्यासाठी 'तीळ- ती़ळ' तुटू लागला.
'बेफिकीर यांची चौफेर साहित्यनिर्मिती ' या विषयाप्रमाणेच 'तरुणीची चौफेर नजरबाजी 'असे एक नव्हे तर दोन चर्चासत्रांचे विषय यावेळी माझ्या मनाला स्पर्शुन गेले. आता रिक्षामध्ये कमीत कमी हँडसम असलेल्या आणि एकमेव न बाटलेल्या अशा माझ्या निष्पाप डोळ्यांत तिने चुकून ऩजर मिसळलीच. तेव्हा मला काही 'विदारक' सामाजिक अनुभव आले. परंतु पुढ्च्याच क्षणी
' डोळ्यांत व्यर्थ वेड्या गुंतू नये कुणाच्या
जखमा जपीत जाव्या भेगाळल्या मनाच्या'
या ओळींनी मला भानावर आणले आणि या रिक्षाप्रवासाच्या मुळ उद्दीष्टपूर्तीच्या दिशेने मी महत्वाचे पुढचे पाऊल टाकले.
प्रोफेसरांची उतरायची वेळ आली तेव्हा मला अपेक्षित प्रसंग सहजच घडून आला. प्रोफेसर हे 'अर्था'तच 'प्रोफेसर' असल्याने १००,५००,१००० इ. नोटांव्यतिरिक्त कोवळ्या किमतीच्या नोटांना ते शिवत नसत. अर्थातच प्रोफेसरांकडे सुटे नव्हते आणि भर सकाळी ते कोठे मिळणेही शक्य नव्हते.रिक्षावाला १५ रुपये मागत होता आणि प्रोफेसरांकडे १०० ची कडक नोट. त्यामुळे प्रोफेसरांना लोकक्षोभाला बळी पडावे लागणार ,हे माझ्या संवेदनाक्षम(हेसुध्दा स्वयंघोषित)मनाने पक्के हेरले. ह्याच मोक्याचे पुरेपूर सोने करायचे असे ठरवून मी 'मला उशीर होतोय' , 'आय अ‍ॅम गोईंग लेट' ,'मेरेकु लेट होरा' ही तीन वेगवेगळ्या भाषांतली पण समानार्थी विधाने एकपाठोपाठ करून एकच खळबळ उडवून दिली. तरूणीनेही लगेच 'हो ना' असा नाजूक स्वर काढत अनुमोदन दिल्याने मला एकाच उत्खणणात दोन सोन्याचे हंडे सापडावेत तसा खंडीभर (की हंडीभर) आनंद झाला.
त्यामुळे प्रोफेसरांची त्रेधातिरपीट होऊन यथोचित सामाजिक अप्रतिष्ठा झाली. त्यांना शंभराची नोट प्रचंड दबावाखाली येत स्वहा करावी लागली आणि परमानंदाने माझे मन उचंबळून आले.
-----------------------------------------------------------
'प्रोफेसर आणि माझा रिक्षाप्रवास' हा खरेतर मी प्रोफेसरांविरुध्द घडवून आणलेला एक पध्दतशीर कट होता. वर वर्णिल्याप्रमाणे प्रोफेसरांची सामाजिक अप्रतिष्ठा करणे हा या कटामागचा मूळ उदेश होता .ज्याप्रमाणे दुसर्या महायुध्दाची बीजे ही पहिल्या महायुध्दात सापडतात त्याप्रमाणेच या कटाची बीजे प्रोफेसरांच्या भूतकाळातील काही हलकट कॄत्यांत आपणास सापडतील.
आम्ही मित्रांसहीत गल्लीत मोठ्यामोठ्याने गप्पा मारतो ,असा काही लोकांचा आक्षेप आहे . त्यात भांडारदरेंचे नाव आवर्जून घ्यावे लागेल. परंतु या विषयी त्यांनी आमच्याशी कोणतीही शाब्दिक चकमक न करता थेट मानवतेलाही लाजवेल असे एक कृत्य केले. आम्ही गप्पा मारत असताना त्यांनी त्यांच्या प्रशिक्षित परदेशी कुत्र्यास कधीनवेतो मोकळे सोडले. त्यामुळे तो कुत्रा (डाबरमॅन की डॉबरमॅन काय म्हणत्यात तो) माझ्या मित्राला डसल्याने ( या ठिकाणी सभ्य्यतेच्या किमान मर्यादा पा़ळणारा 'चावल्याने' हा शब्द योजणार होतो ; पण तो एवढ्या तीव्रतेने डसला आय मीन चावला की .....) आम्ही या हिडीस कॄत्याविरुध्द जबरी उत्तर द्यायचे ठरवले.

या संपूर्ण घटनाक्रमात माझा प्रत्यक्ष , अप्रत्यक्ष, उघड ,छुपा सहभाग असा::-

१) आदल्याच दिवशी प्रोफेसरांच्या चारचाकीला चांगलेच दुखणे आल्याचे मला कळाले .

२) काही क्षणांतच माझ्या मन:पटलावर 'माझ्या मोहिमेची योजना' पूर्णपणे स्पष्ट झाली.

३) पुढ्च्याच क्षणी मी भांडारदरेंच्या घरी जाऊन साळसुदपणाचा उत्कॄष्ट आव आणला (प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार) . नम्रतेचे परमोच्च ढोंग केल्याने आणि माझ्या चुका पदरात घेण्याची विनंती केल्याने प्रोफेसर प्रसन्न झाले. 'उद्या सकाळीच आपण सीटर रिक्षाने सोबत जाऊ.त्यानिमित्ताने मनामनातल्या आढ्या कमी होतील ' असे एक प्रगल्भ विधान मी बड्या परिश्रमपूर्वक केले.यातील गोम प्रोफेसरांना न कळल्याने विनंतीला मान देण्याची भाबडी चूक त्यांच्याकडून घडली. शिवाय फुकटात चहा ढोसत असताना त्यांच्या मुलीशी असलेली ओळख अधिकच दॄढ झाली. (या पोरीशी ते आम्हाला बोलू देत नाहीत्,हीसुध्दा एक खंत होतीच.)

त्यानंतर दोन व्यक्तींना फोन करून या फजितीच्या योजनेवर कळस चढवण्यात आला.
त्यातला एक होता माझा खास मित्र रिक्षावाला .त्याने सकाळी सहा वाजता स्टॉपवर उभे रहावे आणि प्रोफेसर व मी रिक्षात बसल्यावर टुकारात टुकार गाणी वाजवावीत ,असा एक करार झाला .त्याबदल्यात जास्तीच्या हडपलेल्या पैशातील २५% रक्कम पेट्रोलसाठी वापरण्याचे अभिवचन मी दिले.

दुसरा फोन केला गेला अर्थातच प्रोफेसरच्या पोरीला . प्रोफेसरच्या खिशातील सर्व सुट्टे (असल्यास) काढून टाकण्याचे आदेश देण्यात आले .त्याजागी १००,५०० भरण्यात आले.

पुढचा प्रकार आपण जाणलाच आहे.,.....

संध्याकाळी परत आल्यावर मी प्रोफेसरांची सदिच्छा भेट घेतली. यापुढे त्यांनी फड्तूस कॄत्ये केल्यास "काही संदर्भहीन कविता सुनावून तुमची मनस्थिती बिघडवून टाकली जाईल " अशी बुलंद धमकीही देऊन आलो.
-----------------------------------------------------------
या कारस्थानातून मिळालेले अतुलनीय अनुभवामॄत मी मायबोलीकरांशी घोटभर शेअर करत आहे . या कारस्थानात भर पडत राहिल्यास अजूनही शेअर करत राहीन .
--लोभ असावा..

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हा. हा....हा.. ... !
बहोत खुब. ..

आपल्या आग्रहास्तव ....१
रिक्षावाल्याच्या अत्तराचा सुगंध...
प्रो.सरांचा आवेष. ..
मित्राच्या दवा-पाण्याचा खर्च वसूल...

कालांतराने या कथेचे पुढील भाग वाचण्यास आवडतील...

वाह क्या बात वाक्यावाक्याला हसलो
बेफीजींची चौफेर साहित्यनिर्मिती>> Lol मजा आली

बाकी हे प्रोफेसर खनिजतेलुत्खनन्शास्त्राचे असते तर कित्ती मजा आली असती नै? Wink

अजून येवूद्यात खुरसाले

छुपे रुस्तम आहात अगदी

वै.व.कुं... खुरसाले लंबी रेस का घोडा (स्वयंघोषितच...हा..हा...!) लगता है...
वाक्या-वाक्यात विनोद ठासून भरलेत..!
चालू द्या ...
मस्तच...

धन्यवाद वैभवजी,शिवम ..!
बाकी हे प्रोफेसर
खनिजतेलुत्खनन्शास्त्राचे
असते तर कित्ती मजा आली असती नै>>> Lol

विनोदाचा sense चांगला जपलात. ...!

आपला 'ईलेक्ट्रॉनिक्स तिरस्कार मंडळ' लेख वाचल्यावर प्रचिती आलीच होती ..

त्यांचं काळं कुत्रं चावलं Rofl
अहो, मग कुत्राधारी म्हणायचं ना !

इलेक्ट्रॉनिक मंडळ असा एक लेख होता त्यावर प्रतिसाद राहीलाय. सावकाश देईन. खुर्सुलेजी नुकताच आपल्या कथा वाचू लागलोय, पण असं वाटलंच नाही कि ही शैली अनोळखी आहे म्हणून.

पुलेशु.

>> ( या ठिकाणी सभ्य्यतेच्या किमान
मर्यादा पा़ळणारा 'चावल्याने' हा शब्द योजणार
होतो ; पण तो एवढ्या तीव्रतेने डसला आय मीन
चावला की .....)>>> बावचळून गेलो याच्यामुळे ...
याच्यासाठी एक खास मुजरा!
___/\___

उर्वरित कथेसाठी अजून एक मुजरा!
___/\___
लिखते रहो...

शिवम ,भारतीताई ,किरण ,सौरभ सर्वांचे आभार....

हे प्रो.काल्पनिकच आहेत ना...?>>> हो त्यांचा छळ करता यावा म्हणून त्यांच्याकडून हवे तसे वागवून घेतले आहे..

<<पण असं वाटलंच
नाही कि ही शैली अनोळखी आहे म्हणून>>
किरणजी , कळलं नाही आपलं म्हणणं मला..

iblis jee

kitee vinodee lihitaa ho?
aaj kaahihee kele toggle kele taree Marathi font yet naaheeye?
kaay problem aahe?

>> य लेखात विनोदी असं काय आहे?<<
आपल्याला एक रसिक म्हणून तसे वाटल्यास आम्ही दिलगीर!