पाण्यात बुडून मेलेल्या माणसाची गोष्ट ………….

Submitted by स्वप्ननिल on 16 April, 2013 - 02:28

आत्ममग्न लोकांच्या फौजा व्यस्त आहेत
"Amusement" पार्कच्या रोलर कोस्टल मध्ये
स्वतःला विकतचा "Artificial" थरार देण्यात ,

अंगावरच्या शहारयांची मोजली जातेय रोख रक्कम,

आणि नेमकी त्याच वेळी …….

आखूड निर्जीव झालेली वर्तमान पत्रात रोज झळकणारी दुष्काळी पोरं ,
विधवांच्या कपाळावरचा पुसट कुंकू ठसा……

आमच्या Programmed मेंदू पर्यंत पोहचत नाहीत असले फालतू "Virus" अलर्ट .
अन्यथा मदत करू शकणारे आमचे हात नसते राहिले engaged "Virtual Gaming" मायाजालात .

"आज फ्रीज मध्ये थंड पाणी नाही यार "
इतका लिमिटेड दुष्काळ आमचा ….
सह अनुभूतीचा नुसत्या नावाने तोंडचं पाणी पळाल … ?

बघतो कुठे Recharge मिळतो का "माणुसकीचा "
एरवी "Talktime"खूप असतो पण बोलण्यासारखे काहीच नाही ………………

Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रभावी !!
परिणामकारक !!!

इंग्रजी शब्द देखील मराठी फाँटात लिहावेत असे सुचवावेसे वाटते

अम्यूजमेंट . आर्टिफिशियल , प्रोग्राम्ड् , वायरस ,एंगेज्ड् , वर्च्युअल गेमिंग , रीचार्ज , टॉक् -टाईम

धन्यवाद !!!