नेमके दावतो चेहरा!
आरसा वाटतो चेहरा!!
ध्यास माझ्या मनाला तुझा.....
मी तुझा शोधतो चेहरा!
जीवना! मी निरक्षर कसा?
आज मी वाचतो चेहरा!
खूळ हे काय मी घेतले?
सारखा चाळतो चेहरा!
चलबिचल आतली समजते.....
बोलुनी टाकतो चेहरा!
काय प्रश्नामधे एवढे?
काय ओशाळतो चेहरा!
कोण मी वाटतो त्यास? की,
तो असा लपवतो चेहरा!
काय खाते मनाला तुझ्या?
काय रोडावतो चेहरा!
मीच थट्टाविषय का तुझा?
वाकुल्या दावतो चेहरा!
काय छद्मीपणाला म्हणू?
काय वेडावतो चेहरा!
हौस रंगायची दांडगी!
केवढा रंगतो चेहरा!
पार काळानिळा जाहला....
टोमणे सोसतो चेहरा!
पाहिल्या पाहिल्या भावतो!
चित्त आकर्षतो चेहरा!!
पाहणा-यास तो खिळवतो!
मंत्रही टाकतो चेहरा!!
काय चुकले कळेना मला;
मौन का पाळतो चेहरा?
गुणगुणायास तो लावतो!
चक्क झंकारतो चेहरा!!
रंग चढवायला नवनवे;
रोज खंगाळतो चेहरा!
रोज खातो शिव्याशाप तो;
रोज निर्ढावतो चेहरा!
चेह-याला स्मरे चेहरा!
चित्र रेखाटतो चेहरा!!
फूलही लाजते, शरमते!
और गंधाळतो चेहरा!!
***************कर्दनकाळ
चांगली आहे की
चांगली आहे की
चांगला आहे की, प्रतिसाद!
चांगला आहे की, प्रतिसाद!
गझल चांगली झाली आहे, अनेक शेर
गझल चांगली झाली आहे, अनेक शेर आवडले. मात्र काही वेळा शेरांची संख्या जास्त असल्यामुळे (त्यात पुन्हा वृत्तही लहान आहे) शेरांवर रेंगाळणे होत नाही, आस्वाद घेताना 'पटकन वाचून पुढे जावे' अशी भूमिका आपोआप निर्माण होते. हा अनुभव आला. त्यामुळे नीट आस्वाद घेता आला नाही.
कृपया गैरसमज नसावा.
-'बेफिकीर'!
तिलकधारी आला आहे. रोज खातो
तिलकधारी आला आहे.
रोज खातो शिव्याशाप तो;
रोज निर्ढावतो चेहरा!
गुणगुणायास तो लावतो!
चक्क झंकारतो चेहरा!!
रंग चढवायला नवनवे;
रोज खंगाळतो चेहरा!
जीवना! मी निरक्षर कसा?
आज मी वाचतो चेहरा!
चांगले शेर आहेत.
तिलकधारी निघत आहे.
धन्यवाद भूषणराव!
धन्यवाद भूषणराव!
धन्यवाद तिलकधारीजी!
धन्यवाद तिलकधारीजी!
ह्या वृत्तात गुरू ऐवजी दोन
ह्या वृत्तात गुरू ऐवजी दोन लघु अधिक प्रमाणात घेतल्याने रसभंग होतो असे वाटते.
जीवना! मी निरक्षर कसा? आज मी
जीवना! मी निरक्षर कसा?
आज मी वाचतो चेहरा!
चलबिचल आतली समजते.....
बोलुनी टाकतो चेहरा!
कोण मी वाटतो त्यास? की,
तो असा लपवतो चेहरा!
मीच थट्टाविषय का तुझा?
वाकुल्या दावतो चेहरा!
पाहणा-यास तो खिळवतो!
मंत्रही टाकतो चेहरा!!
गुणगुणायास तो लावतो!
चक्क झंकारतो चेहरा!!
काय चुकले कळेना मला;
मौन का पाळतो चेहरा?
रंग चढवायला नवनवे;
रोज खंगाळतो चेहरा!
फूलही लाजते, शरमते!
और गंधाळतो चेहरा!!
२० शेरांपैकी वरील ९ शेरांत आपल्या मते रसभंग होत आहे!
>उरलेलेले ११ शेर रसयुक्त म्हणायचे का?ng>
अवांतर : अशा रसभंगाची मोजपट्टी सार्वजनीकपणे लावावयास हवी!
**********कर्दनकाळ
कणखरजींनी साधे "अरे" सुद्धा
कणखरजींनी साधे "अरे" सुद्धा केलेले नाही उगाच "कारे" करू नयेत ही विनंती
अशाने वातवरण दूषित होते आहे व आपली प्रतिमाही डागाळते आहे इतकेच सांगेन
चूक भूल द्यावी घ्यावी
~वैवकु

कैवार घेण्यापेक्षा व नसत्या
कैवार घेण्यापेक्षा व नसत्या उमाळ्याचा उद्रेक करण्यापेक्षा उपस्थित मुद्यावर बोलला असतास तर किती चांगले झाले असते?
अरे, आम्ही पण काय व कोणाकडून अपेक्षा करत आहोत!
एवढ्या मोठ्या नदीच्या राहुनी
एवढ्या मोठ्या नदीच्या राहुनी पात्रामधे......
हाय हे पाषाण सारे कोरडेच्या कोरडे!.........................हेच खरे!
कणखरजींचे ते वैयक्तिक मत असू
कणखरजींचे ते वैयक्तिक मत असू शकते जे त्यांनी तुमच्या प्रस्तुत गझलेस नव्हे तर एकंदरच या वृत्तातील रचनांना उद्देशून अतीशय संयतपणे नमूद केले आहे
माझे मत हे की हे जे कोणते वृत्त आहे त्यात ते मुळातच फार लहान असल्याने खरेतर किती गुरूना लघु+लघु केले आहे हा अतीशय तांत्रिक मुद्दा लागू करावयाला नको आहे
ह्या गझलेबद्दल असे की मला कोणताही रसभंग इत्यादी जाणवला नाही !!
याचे कारण हेच असावे की मी स्वतः देखील अशा अनेक उपनियमाना व मतप्रवाहाना फारसे ध्यानात घेत नाही
याचे कारण हे की तितक्या चिकीत्सकतेमुळे मला माझे काव्य सुचायला अडचणी / बाधा जाणवू लागतात
असो माझे ज्ञान , मते मी पाजळली आहेत
थां ब तो

याच वृत्तातील रचनांना
याच वृत्तातील रचनांना उद्देशून .......का रे बाबा? बाकीच्या वृत्तांना काय मोकाट सोडायचे?
अतीशय संयतपणे नमूद केले आहे <<<<<<<<<<<मत हे मत असते, त्यात अतिशय/अल्प/स्वल्प संयतपणा कसला डोंबल्याचा?
सदरहू गझलेत एकाही ठिकाणी
सदरहू गझलेत एकाही ठिकाणी लयभंग दिसत नाही!
गझलेतील शेरांची संख्या,
गझलेतील शेरांची संख्या, गझलकार कोण हे गौण आहे! शेर महत्वाचे असतात!
लहानवृत्तातील शेरांवर रेंगाळणे उलट सोपे असते! किंबहुना रेंगाळण्याची आवश्यकताच पडत नाही! समग्र शेर क्षणार्धात क्लिक होतो!
शेरांची संख्या जरी जास्त असली तरी प्रत्येक शेर ही स्वतंत्र कविता असल्याने तो शेर स्वतंत्रपणे आस्वादता येतो!*************************इति कर्दनकाळ