भावनांचा अंतराशी दाबतो उद्रेक मी

Submitted by रसप on 13 April, 2013 - 00:29

भावनांचा अंतराशी दाबतो उद्रेक मी
विझविण्या ती आग अश्रू सांडतो कित्येक मी

धुंद झाल्यावर ठरवतो 'सोडले आता तिला'
सांजवेळी रोज असतो एक ती अन् एक मी

संपला पेला तरीही कंठ आहे कोरडा
आज अश्रू एकही ना चाखला बहुतेक मी

लोकशाहीतील राजे खूप झाले आजवर
तप्त रक्ताचे अनन्वित पाहिले अभिषेक मी

चेहरा खोटा न माझा वाटतो कोणासही
सभ्यतेच्या नाटकाचा बोलका अतिरेक मी

कोण तू माझा, तुझा मी कोण आहे विठ्ठला ?
मागण्यांच्या पूर्ततेपुरताच 'जीतू' नेक मी

....रसप....
११ एप्रिल २०१३
http://www.ranjeetparadkar.com/2013/04/blog-post_13.html

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त!!
लोकशाहीतील राजे खूप झाले आजवर
तप्त रक्ताचे अनन्वित पाहिले अभिषेक
मी

चेहरा खोटा न माझा वाटतो कोणासही
सभ्यतेच्या नाटकाचा बोलका अतिरेक मी

कोण तू माझा, तुझा मी कोण आहे
विठ्ठला ?
मागण्यांच्या पूर्ततेपुरताच 'जीतू' नेक मी

हे सर्व तुफान शेर झालेत.....

सभ्यतेच्या नाटकाचा बोलका अतिरेक मी<<< उत्तम ओळ, सुरेख!

कोण तू माझा, तुझा मी कोण आहे विठ्ठला ?
मागण्यांच्या पूर्ततेपुरताच 'जीतू' नेक मी<<< छान मक्ता

धन्यवाद!

बेफीजींचा प्रतिसादच कॉपी पेस्ट करावा वाट्तोय .
Happy
__________________________________
एक तू अन एक मी हा समजला नाही म्हणजे नेमके असे की ठरवतो असे जे म्हटले आहे त्याने शेराला काय अर्थ मिळतो / कसे वळण मिळते वगैरे

बाकी शेर छान आहेत

चेहरा खोटा न माझा वाटतो कोणासही
सभ्यतेच्या नाटकाचा बोलका अतिरेक मी ......शेर आवडला!

मतल्यातल्या सानी मिस-यात जर (भावनांची) आग असा शब्द असेल, तर उला मिस-यातील उद्रेक शब्द खटकतो!
आगीचा डोंब/लोळ वगैरे उठतो/ असतो.............वै.म.

धुंद झाल्यावर ठरवतो 'सोडले आता तिला'
सांजवेळी रोज असतो एक ती अन् एक मी

चेहरा खोटा न माझा वाटतो कोणासही
सभ्यतेच्या नाटकाचा बोलका अतिरेक मी >>>> हे शेर सर्वात आवडले.

चेहरा खोटा न माझा वाटतो कोणासही
सभ्यतेच्या नाटकाचा बोलका अतिरेक मी
>>
व्वा!

धुंद झाल्यावर ठरवतो 'सोडले आता तिला'
सांजवेळी रोज असतो एक ती अन् एक मी
>>>
आहाहा!

मस्तच!