देण्यासारखं खुप काही....

Submitted by मी कल्याणी on 12 April, 2013 - 13:50

देण्यासारखं आहे.. खुप काही..
पण द्यायचय.. कुणा 'आपल्या' ला..

एक क्षण.. आशेचा..
पल्याड लपल्या स्वप्नाचा..
एक क्षण प्रीतीचा..
निर्भय निर्मळ मैत्रीचा..

एक ओंजळ प्रकाशाची..
तेजाळल्या संवेदनांची..
एक ओंजळ आठवणींची..
धुसर झाल्या पावलांची..

एक वचन.. सोबतीच..
सहवासाच.. आधाराच..
एक वचन.. ॠणांच..
येणार्‍या प्रत्येक क्षणांचं...

एक जाणीव.. विश्वासाची
मैत्रबंधाच्या अस्तित्वाची..
एक जाणीव.. विसाव्याची..
शांत.. विश्रांत.. शाश्वताची..

खरंच.... देण्यासारखं खुप काही असतं..
पण द्यायचं असतं.. ते फक्त कुणा 'आपल्या'ला!!!!!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users