साबुदाणा......किती चांगला ....किती वाईट?

Submitted by नाना फडणवीस on 11 April, 2013 - 06:04

मला नेहमी उपवास करताना एक गोश्ट मनात येते.....कि आपण उपवासाला साबुदाणा खातो.....पण खरच साबुदाणा......किती चांगला ....किती वाईट?...........तो कसा बनवतात्?.....जाणकारांनी प्लिज प्रकाश टाकावा....

Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुमच्या पोस्टीत तुम्ही दिलेल्या टिंबांचा जेवढा उपयोग आहे फक्त तेव्हढाच उपयोग साबुदाण्याचा जेवणात होतो

साबुदाणा कसावा या मूळापासून बनवतात. त्याचा साका काढून ठेवतात. ( कसावाच्या सालीत थोडा सायनाईडचा अंश असतो. सविस्तर माहिती माझ्या विठाई मालिकेत आहे. ) मग खोबरेल तेल लावलेल्या सपाट पत्र्यावर त्याच्या बुंदी पाडल्या जातात.

साबुदाण्यात पोषण मूल्य काहीच नाही. निव्वळ स्टार्च असतो तो.
त्यापेक्षा उपवासाला आपली परंपरेने चालत आलेली धान्ये, म्हणजे वरी व राजगिरा खावीत.

खरे तर प्रकृती बघूनच उपवास करावा. आणि उपवास असला तरी मर्यादेतच अन्नग्रहण करावे.
लंघन करण्यामागे धार्मिक कारणांपेक्षा वैयक्तीक प्रकृती हे कारण असले तर जास्त चांगले.

मध्यंतरी एका बाबाजीने कुठेतरी साबुदाण्यावर लिहीलेला लेख वाचला होता, की तो वरील पद्धतीने ( म्हणजे दिनेशजींनी सांगीतलेली ती वरची प्रोसेस) तयार झाल्यानंतर कशाही पद्धतीने ( म्हणजे साबुदाणा तयार करणार्‍या वेगवेगळ्या कंपन्या) सुकवतात आणी नंतर तो बाजारात आणतात.

पण काही उत्पादक स्वच्छतेकडे पूर्ण दुर्लक्ष करुन त्या अर्धवट सुकलेल्या साबुदाण्यात अळ्या किडे झाले तरी तो साबुदाणा तसाच pack करुन विकत होते, ही गोष्ट काही पत्रकारांनी ( जे मुलाखतीकरता तिथे गेले होते ) उघडकीस आणल्यावर जाम गोंधळ माजला होता. मग सरकारने हस्तक्षेप करुन तो प्रकार बंद पाडला आणी कड्क धोरण घेतले. पण ही गोष्ट आहे साधारण काही वर्षापूर्वीची. त्यामुळे अजूनही ते आठवल्यावर साबुदाण्याविषयी थोडी शंका येतेच. पण काय करणार? दृष्टी आड सृष्टी.

अर्थात, दिनेशजींनी त्यांना माहीत असलेली शास्त्रीय पद्धत लिहीली आहे, त्यात त्यांना वरची मी लिहिलेली घटना माहीत नसेलच.:स्मित:

दुसरी गोष्ट साबुदाणा खीर करण्यासाठी वापरला तर तो पचनास हलका असतो, पण त्यात पचनास जड असे तेल, शेंगदाणे कुट, बटाटे घालुन वापरला तर तो खूपच बाधक ठरतो. कारण उपास हा आपण शरीराला आराम देण्याकरता करतो, पण असे जड पदार्थ नेमके उपासालाच खाऊन प्रकृती का बिघडवुन घ्यायची?

तसंही आपण जे जे खातो ते थोड्या फार प्रमाणात चांगले वाईट असतेच.
त्यामुळे सर्व काही योग्य प्रमाणात खाणं कधीही चांगलं.

साबुदाणा कितीही वाईट असो चांगला असो... इट्स माय फेवरिट.. सो... Happy

हो दक्षिणा.....मलाही साबुदाणा खिचडी म्हनलं कि बास्......फुल्ल फिदा.......
दिनेशदा.......टुनटुन्......सचिन.....धन्यवाद्

नाना दिनेश यांच्या पाऊलखुणात जाऊन ई-मेजवानीतले फोटो पहा, त्यातली खिचडी खतरनाक आहे. मी आज सकाळीच नेत्रसुख घेतले.

काय हे उद्या साबुदाण्याची खिचडी करण्याचा विचार करत होते आणि आज हा धागा यावा? Sad
काहीही असो..... वर्षातुन एक्-दोन वेळा खायला काय हरकत आहे? उद्या नाही तर परवा करणारच!

वत्सला कधीतरी करायला काय हरकत आहे?:स्मित: मला ही तशी साबु खिचडी आवडते, पण नेमकी उपासाच्या दिवशी इच्छा होत नाही, कारण शेंगदाण्यांनी मला जाम पित्त होते.:अरेरे:

साबुदाणा कितीही वाईट असो चांगला असो... इट्स माय फेवरिट.. सो... >>> या वाक्यासाठी अनेक मोदक.... अं .... नाही नाही खिचडीच्या प्लेटी. Lol

मध्यंतरी एक इमेल फिरत होती. ज्या पिट्स मधे साबुदाणा करण्यासाठी साका साठवतात ( त्याला रबडी म्हणतात ) त्यात अनेक किडे वगैरे पडले होते. तसा कोरडा साबुदाणा किड्यांनाही आवडत नाही.

माझ्या ओळखीतले अनेक गुजराथी / जैन लोक साबुदाणा खात नाहीत.

मी तिथे लिहिले असणारच पण साबुदाणा आणि सॅगो हे वेगवेगळ्या झाडापासून करतात. सॅगो पाम हे नारळाच्या कूळातले झाड आहे आणि त्याच्या बुंध्यात भरपूर स्टार्च असतो. त्यापासून केलेला साबुदाणा ( सॅगो पर्ल्स ) हा पांढराशुभ्र नसतो.
दक्षिणेकडे आणि बाकी आग्नेय आशियाई देशात तो बहुदा खीरी सारख्या गोड प्रकारातच वापरतात. त्यापासून खिचडी / चिवडा / फेण्या वगैरे प्रकार हे जास्त करुन महाराष्ट्र , मध्य प्रदेश, गुजराथ आणि थोडीफार उत्तरेकडची राज्ये इथेच असे तिखट प्रकार करतात.

--

दक्षे.. ई मेजवानी भाग २ टाकू का ?

विषय निघालाय म्हणून आठवण काढतो......पुणेकर असाल तर...PYC वर आप्पांची खिचडी काकडी खाउन पहा....अ हा हा.... Happy

..

>>>एक प्लेट साबुदाण्याची खिचडी म्हणजे ९०० कॅलरीज... असे ऐकलेय >>>> ९०० की काय माहित नाही पण ज्या भरपूर कॅलरीज असतात त्या वाईट पद्धतीच्या असतात. नुसते कार्ब्ज. त्यातील शेंगदाणे जरा तरी प्रोटीन देतात. पण आपल्याकडे उपवासाचा मेनु म्हणजे नुसती सा खि असा नसतं. तर अनेक पिठूळ पदार्थांमधील हा एक असतो. Happy

अप्पाची खिचडी हा एक ओव्हरहाईप्ड प्रकार आहे....
एकतर ते अत्यंत कळकटलेले खोपटे आणि त्यातून त्यांचा तुसडा स्टाफ...
आणि इतके करूनही खिचडी काय अद्वितीय वगैरे काही नाही...
खोपट्याचा आकार लहान आहे हे समजू शकतो पण कळकटलेले कशासाठी...

बिना उपासाची खिचडी म्हणजे- साबुदाणा आणि हरभरा डाळीची खिचडी (वाटली डाळीसारखी लागते) सांगोपांग चर्चा करण्याचा विषय आहे. कुणी खाल्ली आहे काय??

फार नाव ऐकुन अप्पाची खिचडी खायला गेलो होतो.
सा खि नॉट अप टु द मार्क.
सोबतची खमंग काकडी मात्र अप्रतिम. Happy

तिकडे मिसळचा वास पण मस्त येत होता पण पोट भरल्याने नाही घेतली.

अप्पाचा कोणताच पदार्थ खास नसतो. वासाला कृपया भूलू नये.
कित्येक वर्षा त्या एरियात तो एकमेव माणूस होता खाद्यपदार्थ पुरवणारा त्यामुळे इतका ओव्हरहाईप्ड आहे. इडली सांबार एक प्लेट २५ रूपयांना विकतो तो.