वायरस

Submitted by अनुराधा म्हापणकर on 10 April, 2013 - 05:30

"कंटाळा" नावाचा एक वायरस
किती जीवघेणा असतो
एण्टी वायरस स्पाय वाय
सारं उडवून तो घुसतो

नक्की कुठल्या साइटवरुन
तो येतो हेच कळत नाही
ब्लॊक पॊपअप्स सारं पाहिलं
कुठे काहीच मिळत नाही

आला की समजावं याने
सगळ्या फाइल्स उडवल्याच
’उत्साह’, ’एनर्जी’, ’स्पीड’ तर
सॊफ्टवेअर सकट बुडवल्याच

कुठल्या ड्राइव मधे शोधू
कोण जाणे कुठे लपला आहे
नक्की कुठल्या फाइलवर आता
कसं कळावं तो टपला आहे

हार्डडिस्कला नको बाबा
माझ्या हॆन्ग करुन ठेवू
जा नवा पीसी शोध बरं
गेला की काय?.....
रीस्टार्ट करुन पाहू... !!

-अनुराधा म्हापणकर

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users