नेमेचि येती वादग्रस्त वक्तव्ये, माफीनामा इ. इ.

Submitted by खटासि खट on 9 April, 2013 - 05:14

नेहमीप्रमाणे विधानसभेचं अधिवेशन आलं. अधिवेशनात होतं काय, चर्चा, लोकांचे प्रश्न मांडणे, समस्येकडं लक्ष वेधून घेणं. हा झाला भूतकाळ. विरोधकात एकटादुकटा सदस्य असतानाही त्याने आपल्या अभ्यासू भाषणाच्या जोरावर सत्ताधा-यांची भंबेरी उडवण्याचा इतिहास महाराष्ट्राच्या विधानसभेला आहे. लोकांच्याही अपेक्षा असतात अधिवेशनाकडून.

या वेळी जलसंधारण घोटाळा, तीव्र दुष्काळ, धरणातल्या पाणीवाटपाबाबत झालेले गौप्यस्फोट, विरोधक - सत्ताधारी मधुर मीलन आणि तृप्तीचे ढेकर, राजसाहेब ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते आणि सत्ताधीश हे अर्थपूर्ण बाबत्चीत करतात असा केलेला आरोप या सर्व प्रश्नांचं प्रतिबिंब सभागृहात उमटेल असं वाटलं होतं. जाहीर सभेत केलेले आरोप इथे पुराव्यानिशी मांडले जातील, नेते नामोहरम होतील असं वाटलं होतं.

पण हाय रे कर्मा ! नेहमी नेहमी अशी अधिवेशनं आली कि वाढलेल्या अपेक्षा, लोकांचे प्रश्न, पूर किंवा दुष्काळ, वीजटंचाई किंवा भारनियमन याबद्दल आता चर्चा होतील असं वाटलं कि नेमकं दुर्दैवाने कुणीतरी काहीतरी वादग्रस्त वक्तव्य करतं मग एकच गोंधळ, एकच कल्ला, एकच हल्ला...! माफी मागा, माफी मागा !

मग इन्कार, मग इकरार, मग माफी आणि मग अधिवेशनातला गोंधळ. कामकाज होऊ देणार नाही. आक्रमक सदस्य, संतप्त सदस्य, घोषणाबाज सदस्य, स्वाभिमानी सदस्य... कामकाज काही होत नाही. मग गोंधळात महत्वाची बिलं पास होतात आणि अधिवेशनाचं सूप वाजतं.

पूर्वी इलेक्ट्रॉनिक मेडीया नव्हता तेव्हां ही वक्तव्य अधिवेशनाआधी पाच सहा दिवस होत असत. त्यावेळी मग या वर्तमानपत्रात आरोप, त्यात खुलासा, विरोधी पक्षनेत्यांच्या प्रतिक्रिया असं वाटावरण तापायला वेळ लागायचा. अधिवेशन सुरू होईपर्यंत वातावरण इतकं तापायचं कि लोक बाकि सगळं विसरून आता काय होणार म्हणून अवाक व्हायचे.

इलेक्ट्रॉनिक मेडीया आला नि चित्रच पालटलं. चार पाच दिवसांपूर्वीचं खूप शिळं होतं सध्या. आता अधिवेशनाच्या तोंडावर असं वक्तव्य येतं. काय करणार बिच्चारे नेते तरी, हा आजारच असा संसर्गजन्य आहे कि नेमका कामकाजाच्या तोंडावरच उद्भवतो. लोकांना तरी काय म्हणायचं ?

आहे का आता दुष्काळ, तृप्ती, लवासा, सेटलमेंट, जलसंधारण असे शब्द कुणाच्या आठवणीत ?

जनतेला आणि नेत्यांना एक तत्त्व पटलेलं आहे.

एकमेकां साह्य करू, अवघे धरू सुपंथ
विना सहकार नाही उद्धार.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुमचे बरोबर असले तरी उपयोग काय? ह्या सत्तापिपासुंना सत्ता सोडायची नाहीच्चे, उलट विना सहकार नाही उद्धार, तू मारल्यासारखे कर मी रडल्यासारखे करतो, तुम्ही आम्ही भाऊ भाऊ दोघे मिळुन सुखाने खाऊ अशा अनेक म्हणी प्रत्यक्षात राबवायच्या आहेत.

पुतण्याने माफी मागीतली ना, झाले तर मग. असे अनेक प्रभाकर देशमुख महाराष्ट्रात आहेत, होतील, येतील, जातील.

कामातुरांणां .... च्या ऐवजी सत्तातुराणां अशी नवी म्हण प्रत्यक्षात जन्माला आलेली आहेच. आणी जलसंसाधारण, लवासा हे मी तरी विसरलेली नाहीये, आणी बाकी इथले लोकही विसरले असतील असे नाही मला वाटत.

रोज नवीन घोटाळे, खून , मारामार्‍या, पैशाच्या लोभाने अतीव मनुष्यहानी ( मुंब्रा दुर्घटना ), मुलाने सुपारी देऊन केलेला बापाचा खून अशा प्रकरणांनी भारतीय समाज बधीर झालाय, तो कधी जागृत होईल झक्की जाणे.:फिदी:

( आता झक्की अमेरीकापुराण, अमेरीकास्तवन, अमेरीकापवाडा, अमेरीकागान, अमेरीका वगैरे वगैरे सादर करतील) झक्की.:दिवा: घ्या.

( आता झक्की अमेरीकापुराण, अमेरीकास्तवन, अमेरीकापवाडा, अमेरीकागान, अमेरीका वगैरे वगैरे सादर करतील) झक्की. घ्या.

दिवा घेतला. माझी आठवण काढल्याबद्दल धन्यवाद.

पण मी आता भारत व अमेरिका यांची तुलना करणे सोडून देणार.

भारतीयांना उगाच वाटते आपण अमेरिकेसारखे आहोत. पण नुसते काँप्युटर नि मोबाइल नि बॉलीवूड वरचा नंगा नाच म्हणजे अमेरिकेसारखे होत नाही.
देश हा त्यातल्या माणसांच्या मनोवृत्ति, संस्कार यांच्यामुळे ठरतो. आजकाल भारतात कुठल्याच संस्कारांचे काही लक्षण दिसत नाही. ना अमेरिकन ना भारतीय.

नि मनोवृत्ती: प्रामाणिकपणे, बुद्धि वापरून, सुधारणा करून, सर्वांचे जीवन सुखकर होईल, कुणि उपाशी रहाणार नाही, पाणी, वीज, उर्जा यांची कमतरता भासणार नाही याची जबाबदारी घेऊन तसे करणे व त्यातून जमेल तेव्हढा पैसा मिळवण्या ऐवजी नुसता 'खाणे'!

ना कुठे शास्त्रीय प्रगति, ना कुठे समाजाचे कल्याण!

नि स्वतःला जमत नाही म्हणून दुसर्‍याचे उणे दुणे - अमेरिकेत सगळी प्रगति बाहेरच्यांनी केली, भारतीयांनी केली, वगैरे. नानाची टांग! एव्हढे थोर आहेत भारतीय तर भारतात राहून का काही करत नाही? अमेरिकेत का यावे लागते? नि भारतात तरी काय भारतीय आहे? सगळे परकीयांकडूनच घेतले ना? स्वतः काय केले? लोक अमेरिकेत येतात तसे भारतात येतील अशी परिस्थिति आहे का भारताची?

अमेरिकेत नि परदेशात कायमच्या गेलेल्या लोकांच्या शंभरपट जास्त लोक भारतात रहातात! ते सगळेच नालायक? संपूर्ण अमेरिकेच्या तिप्पट लोकसंख्या भारताची. नि अमेरिकेत सुद्धा गरीब, सायकॉलॉजिकली, अनस्टेबल, वाईट वृत्तीचे लोक आहेतच. तरी अमेरिका का चांगला देश जिथे सर्वांना यावेसे वाटते?
आज परदेशात असे सांगतात की भारतात जाउ नका तिथे बलात्कार होतात!! टाईम मासिकाने लिहीले की भारतीय टूरिझम २५ टक्क्याने घटले!
भारताची तीच प्रसिद्धि? इतर काही लक्षात घेण्याजोगे होत नाही भारतात?

मग अमेरिकेत वेडे लोक कितीदा तरी गोळीबार करून निष्पाप लोकांचे जीव घेतात, तरीहि सगळ्यांना अमेरिकेतच का यायचे असते? अगदी भारतीयांना सुद्धा? नि अजूनहि?

आता वैयक्तिक हल्ले सुरु होतील - तुम्ही का गेला अमेरिकेला?तुम्हाला काय कळते भारतातले?

मायबोलीवर काय चर्चा होणार? नुसते वाचावीर, वैयक्तिक कुचाळक्या, नावे ठेवणे, टिंगल करणे एव्हढेच फक्त होते. पण तुम्ही, अशोक, भास्कर, इ. काही शहाणे लोक आहेत त्यांच्या साठी मी हे माझे विचार मांडले. तुमच्या उत्तराची अपेक्षा नाही, वाचले तरी प्रत्युत्तर देईनच असे नाही.

Light 1 Light 1 Light 1 Happy Happy इ. इ.

वाईट वाटते, पण काय करणार?
जगच बदलते आहे.:(

भारतीयांना उगाच वाटते आपण अमेरिकेसारखे आहोत. पण नुसते काँप्युटर नि मोबाइल नि बॉलीवूड वरचा नंगा नाच म्हणजे अमेरिकेसारखे होत नाही.

>>>>> तुमचे हे वाक्य मला जास्तच आवडले. मनातले बोललात.

झक्की आधीच लिहीले आहे हलकेच घ्या. समाज आणी समाज बदलायला तशी सारासार विवेक बुद्धी पण असावी लागते, पण ती दुर्दैवाने १०० तल्या १० टक्के लोकातच सापडेल.

लोक म्हणतात की भरपूर पैसा खाल्ला म्हणून त्या तमक्या तमक्याचे तसे झाले, त्याला शिक्षा मिळाली. पण आजकालच्या या भ्रष्ट लोकांकडे पाहुन असे वाटतच नाही की यांना काही धडा मिळाला असेल वा मिळेल. कसला देव आणी कसले काय.

बाकी कलीयुग म्हणून जे म्हणतात ते हेच आहे हे मात्र खरे. भारताचे टुरीझम घटणार नाही तर काय? या बेशरमांना जनाची पण नाही आणी मनाची पण नाही. जिथे राजधानीचीच मुख्यमंत्री बाई असुनही बायका, मुली सुरक्षीत नाहीत, तिथे इतरांचे काय?

राजकारण्यांचे काही नाही पण सामान्य माणुस कायम भरडला जातो, आणी जाणार.

देश हा त्यातल्या माणसांच्या मनोवृत्ति, संस्कार यांच्यामुळे ठरतो. आजकाल भारतात कुठल्याच संस्कारांचे काही लक्षण दिसत नाही. ना अमेरिकन ना भारतीय.
>> सोला आने सच.

पण मी आता भारत व अमेरिका यांची तुलना करणे सोडून देणार. >>>>>>>>>

भारतीयांना उगाच वाटते आपण अमेरिकेसारखे आहोत. पण नुसते काँप्युटर नि मोबाइल नि बॉलीवूड वरचा नंगा नाच म्हणजे अमेरिकेसारखे होत नाही. >>>>>>>>>>>>>>>>>>

दोन परस्पर विरोधी वाक्या नाही वाटत का Wink
भारतीयांना उगाच वाटते आपण अमेरिकेसारखे आहोत. >> चुक अमेरिकेत राहणार्या भारतीयांना वाटत आहे असे भारतातल्या नाही. Wink

>>>> भारतीयांना उगाच वाटते आपण अमेरिकेसारखे आहोत. पण नुसते काँप्युटर नि मोबाइल नि बॉलीवूड वरचा नंगा नाच म्हणजे अमेरिकेसारखे होत नाही.

मान्य आणि अर्धवट इन्ग्रजी...

>>>> देश हा त्यातल्या माणसांच्या मनोवृत्ति, संस्कार यांच्यामुळे ठरतो. आजकाल भारतात कुठल्याच संस्कारांचे काही लक्षण दिसत नाही. ना अमेरिकन ना भारतीय.

हे पण मान्य

>>>>>>नि स्वतःला जमत नाही म्हणून दुसर्‍याचे उणे दुणे - अमेरिकेत सगळी प्रगति बाहेरच्यांनी केली, भारतीयांनी केली, वगैरे. नानाची टांग!

१००% मान्य... आप्पाचा ढोल पण..

>>>>>> एव्हढे थोर आहेत भारतीय तर भारतात राहून का काही करत नाही? अमेरिकेत का यावे लागते? नि भारतात तरी काय भारतीय आहे? सगळे परकीयांकडूनच घेतले ना?

हे मात्र अमान्य... भारतीय स्वतःचे स्वत्व विसरले आहेत हे जास्ती पटेल

>>>>>> आता वैयक्तिक हल्ले सुरु होतील - तुम्ही का गेला अमेरिकेला?तुम्हाला काय कळते भारतातले?

मान्य...

जनता फसते असं म्हणणं म्हणजे आपण वेगळे कुणी आहोत असा अर्थ झाला. खरंच जनता फसते कि अफूच्या गोळीसारखी या नाट्याची सवय झालीये ?

@झक्की | 9 April, 2013 - 16:20
पण तुम्ही, अशोक, भास्कर, इ. काही शहाणे लोक आहेत त्यांच्या साठी मी हे माझे विचार मांडले.
<<
अशोक यांच्या पंक्तीत मलाही बसवलेत हा अनपेक्षित असा मोठाच गौरव म्हणावा लागेल.
त्याबद्दल धन्यवाद !

>>....तरीहि सगळ्यांना अमेरिकेतच का यायचे असते? अगदी भारतीयांना सुद्धा? नि अजूनहि?<<

याच्या कारणांचा शोध हाच एका स्वतंत्र धाग्याचा विषय आहे आणि तुमच्या दृष्टीने याची काय कारणे आहेत ते मांडून सुरुवात केल्यास बरी चर्चा होऊ शकेल.

बाकी राज्यकर्ते जी वक्तव्ये करीत आहेत ती भ्रष्टाचार, दुष्काळ, नेत्यांची दादागिरी अशा बाबींवरून लोकांचे लक्ष दुसरीकडे नेण्यासाठीच होय!

हा लेख १९४७ च्या काळातल्या अमेरिकेसाठी तर नाही. तसंच असावं. मला स्पष्ट आठवतंय, काय ती अंदाधुंदी, काय तो भ्रष्टाचार, शिक्षणाची आबाळ, हुषारी नाही, स्वच्छता नाही,प्रगती नाही, समृद्धी नाही. काही काही नाही. पण अचानक भारतातून लोक येऊ लागले आणि पाहता पाहता अमेरिकेने कात टाकली. भारतातून आलेल्या लोकांनी त्यांच्या अथक परिश्रमाने आणि बुद्धीकौशल्याने आजची अमेरिका बनवली आहे. ही वैज्ञानिक प्रगती, ही समृद्धी, संरक्षण सज्जता, व्यापारौदीमता, आजचं महासत्ता हे स्थान, अवकाश विज्ञानातली झेप हे सगळं इथल्या लोकल्सना कधी तरी साध्य झालं असतं का असा विचार मनात येतो.

मग ते ज्या भारतातून आले त्याबद्दल हा लेख कसा बरं असू शकेल. काहीतरीच ब्वॉ तुमचं !

रमलारमल संमोही विमोही
जा जा रे जा तू निर्मोही

श्लोकाचे अर्थ लावताय का ? Happy
त्याचा अर्थ असा..साहेबांच्या कुलदीपकाने मोरारजीभाईंचा वारसा चालवायचा ठरवलेला दिसतोय.

छ्या:, टुनटुन, तुम्ही माझी आठवण काढून अगदी आ बैल, मुझे मार केलेत.
आता विषयांतराचा धोका पत्करून उत्तर देतो, पण पुनः मूळ लेखाकडे लक्ष वळवावे.

भारतातून आलेल्या लोकांनी त्यांच्या अथक परिश्रमाने आणि बुद्धीकौशल्याने आजची अमेरिका बनवली आहे. ही वैज्ञानिक प्रगती, ही समृद्धी, संरक्षण सज्जता, व्यापारौदीमता, आजचं महासत्ता हे स्थान, अवकाश विज्ञानातली झेप हे सगळं इथल्या लोकल्सना कधी तरी साध्य झालं असतं का असा विचार मनात येतो.

हे विधान जरा अतीच!! भारतीय इथे येऊ लागण्यापूर्वीच इथे फोन, विमान, काँप्युटर, अ‍ॅटम बाँब, मायक्रोसॉफ्ट विंडो, मोटर गाड्या इ. धंदे जोरात चालू होते. तत्पूर्वीच आजचं महासत्ता हे स्थान, अवकाश विज्ञानातली झेप हे झालेले होते. म्हणून तर भारतीय इथे लोंढ्याने आले. पाकीस्तानात का गेले नाहीत?
अफ्रिकेतल्या देशात, मध्यपूर्वेत सगळीकडे गेले, तिथे काय केले? काही ऐकू येत नाही असे काही.

जगातले सगळे लोक इथे येऊन 'लोकल्स' होतात. नि मग ते फ्रेंच, जर्मन, भारतीय न रहाता अमेरिकन बनतात. तसे भारतीय बनायला काही जगातल्या कुणाची इच्छा दिसत नाही.

चुक अमेरिकेत राहणार्या भारतीयांना वाटत आहे

अमेरिकेत दोन प्रकारचे भारतीय आहेत. एक पूर्वीपासून येऊन इथे स्थायिक झालेले मा़झ्या सारखे नि दुसरे तात्पुरते येणारे, भारतीय लोकांच्यातच रहाणारे. दुसर्‍या लोकांच्या काही अव्वाच्या सव्वा कल्पना असतात भारत्-अमेरिका बद्दल. ते इथे नि भारतात त्याबद्दल काय बोलतात ते सगळे खरे नसते.

नि पहिल्या प्रकारातले पण मा़झ्या सारखे यडे लोक काही बाही लिहीत असतात, भारतीयांना उचकवून त्यांची गंमत बघायला. जसे भारतातून आलेल्या लोकांनी त्यांच्या अथक परिश्रमाने आणि बुद्धीकौशल्याने आजची अमेरिका बनवली आहे. Proud

झक्कीकाका
तुमची पोस्ट पाहिलीच नव्हती. मी आपलं असं ऐकलं होतं बरं का Proud मी असंही ऐकलंय कि पाश्चिमात्यांनी, युओपियनांनी जी प्रगती केली ते सगळं ज्ञान भारतातच होतं. ते त्यांनी चोरून नेलं आणि प्रगत झाले. बघा, म्हणजे शेवटी तिथंच आलं कि नाही सगळं Lol

तर तुमच्या पोष्टीतलं हे विधान पहा.

आज परदेशात असे सांगतात की भारतात जाउ नका तिथे बलात्कार होतात!! >>>

काय चुकलं ? दिल्ल्ची घटना होण्याआधीपासून बलात्कार होताहेत. दिल्लीची घटना राजधानीतली, त्यातून अधिवेशनकाळातली. म्हणून गवगवा झाला. आताच पंधरा दिवसांपूर्वी पुन्हा दिल्लीतच चालत्या कारमधे बलात्कार झाला, आहे का मेडीयाला शुद्ध ? बातमीमागचा हेतू, टायमिंग हे ही पहावं असं भारतात वाटतं. भारतात येऊन गो-या लोकांनी भीक मागणा-या मुलांचे फोटो काढले कि आमचे लोक संतप्त होतात. वर्तमानपत्रात लेख लिहीतात. हे फोटो विकून भारताची बदनामी होते म्हणतात. त्याला उत्तर देणारी पत्रं छापत नाहीत हो ! म्हणजे आमच्या पत्रात असं असतं कि भीक मागणारी, कचरा वेचणारी मुलं भारतात आहेत, गो-या लोकांच्या देशात नाहीत हे वास्तव नाही का ? गो-या लोकांना फोटो काढू देणार नाही अशी मोहीम राबवण्यापेक्षा कुठल्याही मुलावर अशी पाळी येणार नाही कि गो-यांसमोर माझी मान शरमेने खाली झुकेल अशी मोहीम का राबवित नाही ? पण यांचा संताप तो. शहाणी माणसं अशीच असतात. मग काय, हा देश कधी सुधारणार नाही म्हणत हळूच वळकटी काखेला मारायची आणि अमेरिकेचा रस्ता धरायचा, झालं. सगळे प्रश्नच सुटतात.

तर बलात्काराचंही असंच आहे. खेडेगावातूनही बलात्कार होतात. अगदी सामूहिकरित्या होतात, काही ठिकाणी तर पंचायतीच्या आदेशावरून होतात. म्हणजे अमक्याची मुलगी तमक्याने पळवली. तमूक हलक्या जातीचा म्हणून त्याच्या घरातल्या आयाबहिणींवर गावाने बलात्कार करायचा असे आदेश निघतात. बातमी येते तिस-या चौथ्या पानावर. पण भारतभा वातावरण ढवळून बिवळून .. म्हणजे हॅ हॅ हॅ काहीतरीच काय, अधिवेशन चालू असेल, राअधानीचं शहर असेल तरच आम्हाला इंटरेस्ट हो !

बाकि काय, बराक काय म्हणतो ? पुरणपोळ्या खायला बोलवायचंय त्याला घरी. भेटला तर माझा नमस्कार सांगावा.

@इब्लिस | 9 April, 2013 - 21:1
जख्खी,
भास्कर उठवला तुम्ही..
(वादग्रस्त) इब्लिस.
<<
स्वतःसाठी पोटदुखीच्या गोळ्या घेऊन खा. मला त्याची जरूरी कधीच भासत नाही त्यामुळे गोळीचे नाव माहीत नाही. नाहीतर गोळ्याच पाठवल्या असत्या.
रामराम.