मायक्रोमॅक्स कॅनवास एचडी

Submitted by माधव on 8 April, 2013 - 00:21

मायक्रोमॅक्स कॅनवास एचडी बद्दल आपली मते (review), त्याच्याकरता उपयुक्त अ‍ॅप्स, टिप्स असे सगळे या बाफवर चर्चा करूयात.

मला आवडलेले काही फिचर्सः
१५००० रुपयात तुम्हाला क्वॉडकोअर आणि एचडी फोन दुसरा मिळणे कठीण.
एचडी विडीओ खरच अप्रतिम दिसतात.
नोकियावरून स्विच झाल्याने स्क्रीनचा फेदरटच प्रकर्षाने जाणवतोय. Happy
क्वॉडकोअर प्रोसेसरमुळे एकदम सुसाट पळतय सगळं.
आवाज मात्र दणदणीत नाहीये. आवाजाची प्रत (quality) पण ठीक म्हणावी अशीच आहे.

एकंदरीत मस्त फोन आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मलाही हा फोन आवडला
याच्यापेक्शा थोड्याश्या कमी किंमतीत लावाचा झोलो अलाय तो पण इतकाच मस्त आहे

बाब्या, मागच्या आठवड्यात snapdeal वरून घेतला. नंतर परत तो गायब झाला होता.

तातडीने हवा असेल तर, शाहू मार्केटजवळच्या श्रीजी मध्ये १६००० ला आहे (म्हणजे काल होता) - काळे पॅनल आणि पांढरे कव्हर. पूर्ण पांढरा महाग आहे.

हाय... मी आजच म्हणजे ८ तारखेला हा फोन घेतलाय, आणि त्यावरुनच हे टाईप करून लिहितोय Happy
मला विशेष आनंद वाटतोय तो म्हणजे मराठी अगदी व्यवस्थित लिहिता येतंय... उत्तम आहे फोन...
सध्या सगळ्या फिचर्स तपासून पाहतोय, यथावकाश टायपायचा स्पीड वाढला की सांगेनच अनुभव Happy
आता तरी खूप छान वाटतंय...

विषयबदलः
झक्की रागावतील शिर्षक बघून..
मागे माझ्यावर रागावलेले इंग्रजीचा वापर बघून (घर भाड्यानं घेण्यासंदर्भात)

मागे माझ्यावर रागावलेले इंग्रजीचा वापर बघून >>>>>>>>
donald-duck-022007-3.gif
.
.
.
.
.
.
.
@ माधव कॅनवास एचडी १६० चा बॅटरी बॅकअप कसा आहे?

मी Micromax Canvas HF A116i ऑर्डर केलाय, परवा पर्यंत मिळेल.
१२.५ हजारला मिळाला.

Want to increase speaker volume of your mobile here's the tip:
dial *#*#3646633#*#*
then go to Audio>Loudspeaker Mode>scroll down and change Max Value to 150 then press Set. Its done.
If you are using Jelly Bean then go to Hardware Testing> Audio>Loudspeaker Mode>scroll down and change Max Value to 150 then press Set.

मी स्वतः कॅन्वास २ वापरतो आहे.

दुसरा मार्ग MX Player वापरणे. त्यात व्हॉल्यूम जास्त मोठा करता येतो.

अरे कोणीतरी मायक्रोमॅक्स कॅनवास २ + बद्दल पण लिहा ना..... मला घ्यायचा आहे. मायक्रोमॅक्स ची सर्वीस कशी आहे?

इब्लिस, हार्डवेअर टेस्टिंग ऑप्शन दिसत नाहिये Sad

आणखी एक म्हणजे, कॅमेराचा शटर साऊंड बंद करता येत नाहि काय? मला सेटींग्स मध्ये तो पर्याय मिळाला नाही. तसेच अजून तरी फोटो काढताना माझा गोंधळ उडतोय, एकतर टच फोन आहे आणि यात नुसता शटर वर क्लिक केलं तर फोटो निघेलच याची खात्री नाही आणि बटन दाबून ठेवलं तर भाराभर ५-१० फोटो निघतात Sad

कुणाचेही चोरून फोटो काढता येउ नयेत म्हणून लीगली शटर साउंड ऑफ करता येउ नये असे सर्वच फ़ोनवल्यान्ना कंपल्सरी केल्याचे मधे वाचले होते.फोन म्यूट केला तर आवाज येत नाही.

सिंगल शॉट मोड निवडा.

सेटिंग्स मधे डेवलपर ऑप्शन आहेत की.

रंगासेठ, कॅमेर्‍यात ३ मोड्स आहेत. त्यातला HDR मोड निवडलात तर क्लिक केल्यापासून फोटो निघायला वेळ लागतो तेवढ्या वेळ कॅमेरा (फोन) आणि समोरचे ऑब्जेक्ट दोन्ही स्थीर हवे. या मोडमध्ये स्टील फोटो मस्त निघतात. आजपर्यंतच्या फोनमधला हा पहिलाच फोन आहे क ज्याचा कॅमेरा मला आवडलाय.

एकदाचा घेतला मोबाईल..... मायक्रोमॅक्स कॅनवास २ +
मंगळवार पर्यंत मिळेल. १०८००/- मिळाला.
बाकी आता फोन वापरल्यावर.... Happy

माझ्या कॅन्वास HD सारखा रिस्टार्ट होत आहे २ आठवड्यांपासून Sad
उद्या सर्विस सेंटरला जातोय. ऑनलाइन घेतल्याने वॉरंटी पिरिअड सर्विस बद्द्ल शंका आहे!

माझं मोबाईल पुराण -
आयफोन ४ गेल्या विकांताला बदलला. तो देऊन सोनी एक्स्पीरीया एसपी घेतला (१ जीबी रॅम, १.७ ड्युअलकोअर, ४.७ एच्डी स्क्रीन). पण काही केल्या ते अ‍ॅन्ड्रॉईड प्रकरण नाहीच जमलं. फोन होता स्मूथ अन छान रिस्पॉन्सिव; पण काही केल्या त्याला आयओएस्ची सर नवतीच.

काही जास्त अ‍ॅप्स मी वापरत नाही. थोपु, ट्वीटर, वॉट्सॅप, लिंक्डीन (सगळे ऑलवेज ऑन) ४ ईमेल अ‍ॅड्रेसेस + १ ऑफीस चा एक्स्चेंज चा ईमेल (सगळ्यापैकी ३ पुश सर्वीस) अन कधीतरी गेम. एवढं वापरून बॅटरी दिवस्भरही नाहीच टिकायची!

बर्‍याच ठिकाणी टॅप + होल्ड करून मग ऑप्शन आहेत. त्यात परत सोनी चे अ‍ॅप्स वेगळे अन सिमिलर गुगलचेही. नसता गोंधळ. बॅटरी भसाभसा संपते(च); का माहीती नाही.

मग मित्रांनी सांगितल्या प्रमाणे नको असलेले अ‍ॅप्स डिसेबल केलेत. बॅटरी लाईफ सुधारली पण तरी संध्याकाळी ऑफिसात चार्ज करावीच लागायची. अन ते सारखं सारखं डेटा + वायफाय बंद करण मला तरी काही पटत + झेपत नाही. का म्हणून करायचं तस? बॅटरी री-चार्ज व्हायलाही वेळ लागतो.

मेसेज डिलिट करायला त्याला टॅप + होल्ड केल्यावरच पुढचे ऑप्शन्स येत. वईताग.
नोटिफिकेशन सेंटर काही खूप खास नाही. फोन अन्लॉक केल्यावरच ते अ‍ॅक्सेस होणार. स्वाईप करून अ‍ॅक्शन फार कमी ठिकाणी आहे.
विडिओ कमी जास्त स्पीड्ने फॉरवरफॉ/ बॅक करण्याची सोय नाही. विडिओ शूटिंग करतांना झूम करता येत नाही.

शेवटी काढला त्यास. अन पुन्हा अ‍ॅपलच घेतला. हा मात्र मस्त आहे. वर दिलेलं सगळ वापरूनही बॅटरी मस्त पुरते. फास्ट आहेच. स्क्रीन रेझोल्यूशन सुप्पर + ब्राईट्नेस कमी जास्त नाही करावा लागत बॅटरी टिकवायला.

मी इतक्यातच मायक्रोमॅक्सचा कॅनव्हास ए ११९ घेतला फ्लिपकार्ट वरून. एच डी आहे. पण ३० एफपीएस स्पीड ने व्हिडीओ कॅमे-याचा फील येतो. पॅनोरामा आहे. रेझोल्युशन हाय आहे.

फोन घेतला आणि शाओमी चा एमआय ३ लाँच झाला, नाहीतर तोच घेतला असता. १४००० त जवळपास एस ५ चे फीचर्स ! आता एमआय ५ लाँच होतोय.

मी घेऊन खुष आहे. डूडल घेतले २ परवा. १२वी ला उत्तम मार्क मिळवलेल्या मुलांना गिफ्ट दिले. Wink मस्त आहेत फोन अन पोरं खुष आहेत.

एक्स्पिरिया भुक्कड आहे असे वैम. त्याला पाहून अँड्रॉईडची लायकी ठरवणे म्हणजे कठीण आहे..

मी युनाईट २ घेतला मायक्रोमॅक्सचा. मला तरी आवडला.
१ जीबी रॅम, १ जीबी रॉम, ५ मेपि कॅमेरा, मोठी स्क्रीन इ. मुळे.

आवाज वाढवायची युक्ती वाचली. माझा अँड्रॉ किटकॅट आहे. त्याच्यावर हा उपाय काम करेल का? मला गाणी ऐकत काम करायला आवडते. तिथे हा माझ्या जुन्या सॅमसंगपुढे अगदीच मार खातो. अगदी थोडंसं दूर गेलं तरी आवाज येणं बंद होतं. Sad

माझा एक्सपिरिया व्य व स्थि त चा ल तो
android ची लायकी ठरवायला तो इतकाही कठिण नाही
दीड वर्ष झाल
अजिबात तक्रार नाही

मी खूष आहे फोनवरती.

त्याच सुमारास अजून ३ जणांनी (ओळखीत / ऑफीसात) हा फोन घेतला होता. माझा आणि दुसर्‍या दोघांचे फोन व्यवस्थीत चालू आहेत. एकाचा खराब झाला.

माझ्या मते तरी पैसा वसूल.

कोणाला जॉनर प्रमाणे सॉर्ट करू शकणारा म्युझिक प्लेयर माहीती आहे का या फोन वर चालणारा? डीफॉल्ट प्लेअरवर मला जॉनरवर सॉर्ट नाही करता येत. विनअँप टाकून पाहीला तर त्यात (फ्री वर्जन मध्ये तरी) ग्राफिकल इक्व. नाही येत. मग अगदीच सुमार आवाज येतो.

Sorry for writing in English!
=====
I have Micromax Canavs HD (A116 i) , just 6 months old. The issue of continuous restarting occurred twice in last six months, which is frustrating and I am not able to use that phone, also service center near my home is also shifted so could not get the time to repair it Sad

"May be my device was faulty , like one OFF cases!"

My friends who bought Micromax after me, are happy as it's "Paisa Vasool"!

After six months (when phone was not facing issues):
+ves :
Great Display and screensize
Nice UI, apps downloaded from playstore appear on home screen automatically
Good Camera (does the job)
Nice sound quality (calls/ earphone)
Decent speed for operations
Lightweight

-ves
low internal memory, restriction to get the good apps to be downloaded
This frequent restart issue Sad

रंगासेठ, माझ्या मायक्रोमॅक्स कॅनव्हास डुडल ए १११ ला असाच प्रॉब्लेम ३-४ महिन्यांपूर्वी आला होता. (फोन घेतल्यावर २-३ महिन्यात) त्यावेळी सर्व्हिससेंटर मध्ये नेवून ठिक केला.

परवा परत असाच फोन रिबुट व्हायचा प्रॉब्लेम सुरु झाला होता. त्यावेळी इब्लिसकाकांनी हा उपाय सुचवला.

If the following method doesn’t works for you, check whether your phone battery has swollen or not. If swollen try replacing it, and it might help you from restart problem

To sort out this automatic rebooting problem in Micromax mobiles do follow the instructions,

Go to your phone Settings –> Dual SIM settings option.

Now choose SIM1 –> Mobile network settings.

Tap on Network Mode and choose GSM only option(GSM/WCDMA is the default option)

That’s it! By changing the setting to GSM only will help you out from rebooting problem.

If the problem exists after changing the network mode, then you may go to the service center and sort out the problem. You can comment about the other problems you experience while using your Smartphone, we will help you out of it.

माझ्या फोनला हा उपाय लागू पडला. http://hwto.in/stop-automatic-rebootingrestarting-micromax-mobiles/ इथे दिला होता हा उपाय.