रहिवासी ईमारत, अपार्टमेंट ,वाडा ई. ठीकाणी असलेल्या सामाईक जागेत सर्व सभासदांच्या परवानगीशिवाय बांधकाम केल्यास फौजदारी गुन्हा दाखल करता येतो का?

Submitted by हेलबॉय on 6 April, 2013 - 14:54

रहिवासी ईमारत, अपार्टमेंट ,वाडा ई. ठीकाणी असलेल्या सामाईक जागेत सर्व सभासदांच्या परवानगीशिवाय एखाद्या सभासदाने बांधकाम केल्यास फौजदारी गुन्हा दाखल करता येतो का?
असे गुन्हे दिवाणी कायद्याखाली येतात कि फौजदारी??

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हेल बॉय,
त्या बांधकामामुळे तुमची वहिवाटीची येण्याजाण्याची वाट अडली असेल, किंवा हवा उजेड बंद होत असेल, किंवा तत्सम आरोग्याला धोका वै असेल, तर गुन्हा दाखल होऊ शकतो. (बहुतेक)
एकाद्या वकीलास विचारलेत तर तो जास्त नीट सांगू शकतो. जागा सामायिक मालकीची अस्ल्याने दिवाणी दावा तर नक्कीच होईल.

रहिवासी ईमारत, अपार्टमेंट ,वाडा ई. ठीकाणी असलेल्या सामाईक जागेत सर्व सभासदांच्या परवानगीशिवाय एखाद्या सभासदाने बांधकाम केल्यास फौजदारी गुन्हा दाखल करता येतो का?

नाही.

असे गुन्हे दिवाणी कायद्याखाली येतात कि फौजदारी??

दिवाणी.

अवांतर : सर्व सभासदांची परवानगी असून चालत नाही. स्थानिक स्वराज्य संस्थेचे बांधकाम सुरु करणेसाठीचे प्रमाणपत्र आणि बांधकाम पूर्ण झाल्यावर भोगवटा प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.सदर अनधीकृत बांधकाम विकले, त्याचा व्यापारी वापर केला अथवा धोकादायक ह्या सदराखाली सदर बांधकाम असेल तर ''फौजदारी'' गुन्हा दाखल होवू शकतो.

जर यात मार्‍यामार्‍या/धाकदपटशहा ई. झाल्यातर नक्कीच फौजदारी होईल. नाहीतर दिवाणी.

रो हाऊसेस हे सोसायटीमध्ये फॉर्म झालेले नाहीत. प्रत्येक रोहाऊस ही स्वतंत्र मिळकत आहे.

रो हाऊसेस च्या बाबतीत सोसायटीचे नियम लागू होतात काय? सोसायटीचे नियम जरी लागू होत नसतील तरी आक्षेपार्ह बांधकाम, बदल या बद्दल तक्रार दाखल करता येते काय?