बुरखे घेऊनि आले होते

Submitted by विस्मया on 5 April, 2013 - 12:11

या दुनियेची रीतच न्यारी, शिफारशीला भाव आहे
ज्या चेह-यांची भेट नकोशी, त्यांचे नेमके नाव आहे

काळे गोरे लंगडे लुळे, कोणी नाही ओळखीचे
धाक इथे ना कायद्याचा, त्या लोकांचे गाव आहे

का द्यावी शिक्षा त्यांना जर, दिधल्या जखमा खोल मनाला
बुरखे घेऊनि आले होते, माणुसकीला वाव आहे

शर्यत कसली शहरामधली, जो तो धावत सुटलेला
हातावरची रेषा जितुकी, तितुकी त्यांची धाव आहे

आयुष्या दे इतुके ओझे, जितकी छाती फुलते रे
जे मिळते ते माझे आहे, ना मरणाची हाव आहे

- मै
५.४.२०१३

Group content visibility: 
Public - accessible to all site users