जीवन..

Submitted by रोहितगद्रे१ on 5 April, 2013 - 00:37

क्षण सुखाचे दुखाचे
रान उनसावल्याचे
वारा वाहतो निराळा
कधी झुळूक कधी झळा

मेघ कधी काळभोर
कधी हवेसे निळेशार
धारा कधी वरदान
कधी शाप संततधार

नदी कधी ते खडक
भुई भेगाळ तडक
कधी पूर पूर होई
दिसेना ती सडक

उन कोवळे सुखद
कधी तप्त रणरण
कधी पुनवेची रात
कधी अमावस दाट

पायवाट पुसटत जाई
काट्या दगडात नेई
वेली बाजूस सारता
राजमार्ग तो देई....

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ही तुमची कविता चांगली अष्टाक्षरी होऊ शकते, जरा शब्दांची नीट मांडणी करावी लागेल..

बाकी तुमच्या विचारपूस (वि पू त) मधे सविस्तर लिहिले आहे...

धन्यवाद.

शशांक खूप चांगला शिक्षक आहे >>>> का रे मला हरबर्‍याच्या झाडावर चढवताय ???
माबो वर उल्हासकाका भिडे, भारतीताई, बेफिकिर, श्याम, के अंजली, बागेश्री, क्रांती, स्वाती आंबोळे व इतरही अनेक दिग्गज मंडळी असताना मला कशाला गोवताय या मात्रा, वृत्त, लय, छंद या प्रकरणात ???
या मंडळींपैकी कोणाचाही सल्ला घेणे - अर्थात त्यांची परवानगी घेऊनच हे सगळे करावे ...