नव्हतास कधी तू जेव्हा...

Submitted by अश्विनीमामी on 2 April, 2013 - 06:14

नव्हतास कधी तू जेव्हा
मी जगून मोकळी झाले.

तुझी वाट पाहता पाहता
सगळेच भोगून जाहले.'

हे जगणे माझे आहे
ह्या वस्तू, ह्या अनुभूती.

शोधुनी ना सापडती
एकत्र क्षणांच्या स्मृती.

मृगजळापरी ते जगणे
अव्यक्त वेदना होते.

आता खर्‍या मनाने
मी माझे विश्व सजविते.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान Happy

Happy

कळत नाही आहे !

नव्हतास कधी तू जेव्हा
मी जगून मोकळी झाले. >> आनंदा सबोधले आहे कि व्यक्तिला कळत नाही

मग
खाली-- सर्व भोगून जाहले म्हटले आहे. -बरोबर बोध होत नाही !