माझा रांगोळीचा व्हिडीओ..

Submitted by अर्चना पुराणिक on 1 April, 2013 - 12:15

हि रांगोळी माझ्या एका मैत्रिणीच्या हळदीकुंकवाला मी काढली होती Happy

हा व्हिडीओ तुम्हांला आवडेल आशी अपेक्षा Happy

http://www.youtube.com/watch?v=YFLc1Gg8hRY

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूप सुंदर काढलिये रांगोळी. तुमच्या काढण्यात सहजता, एकतानता खूप जाणवली. अशाच सुंदर सुंदर रांगोळ्या आम्हाला बघायला मिळोत. Happy

सही यार... !!
मागे आमचा चाललेला गोंधळ असून सुद्धा किती एकाग्रतेने काढत होतीस Wink
कितीही वेळा तुला असं काढतांना बघितलं तरी मन भरत नाही एवढं मात्र खरं !!
पूर्ण रांगोळीचा फोटो सुद्धा टाक ना.

खुप सुंदर. रांगोळी किती सहजपणे काढतेस. डिझाईन तर डोक्यात पक्की बसली आहे असे दिसते. तुझी रांगोळी काढण्याची पध्द्त काही वेगळी वाटते. तु चिमटीने नाही का काढत? व्हिडीओत नीट कळत नाही.

अप्रतिम!
हि संस्कार भारती पद्धत आहे ना? तुम्ही शिकलात आहात का?
(मला शिकायचेय)

त्या बायका रांगोळी जवळ आल्या तश्या माझ्या पोटात गोळा... म्हटले देणार की काय रांगोळी पाय(चूकून हो)? जरासा वर लेना....(मराठी हिंदी) Happy

सुरेखच. हात किती सहज वळतो तुमचा. पांढर्‍या रांगोळीनं काढलेल्या सगळ्या वक्ररेषाही किती वळणदार, सुबक आणि एकसारख्या आहेत. जिलब्या काढताना बघायला मज्जा आली - अगदी एकसारख्या वाटोळ्या. शिवाय आतपर्यंत गेल्यावर पुन्हा त्याच गोल रेषांवरून पुन्हा रांगोळी टाकत, आतल्या भागाला खास उठाव देण्याचं कसब एकदम वाखाणण्यासारखंच. Happy

वा! अर्चना खूप सफाईदारपणे वळतो तुझा हात!
सुंदर आली आहे रांगोळी!
ही बहुतेक संस्कारभारती पद्धत आहे.

प्रथम सगळ्यांचे खूप धन्यवाद Happy
शांकली- मी नक्की प्रयत्न करेन Happy
धन्यवाद जयश्री,आग मी या रांगोळीचा फोटो आगोदर टाकला होता.तरी परत एकदा टाकते Happy

SAM_3536_0.JPG

विद्याक-हि रांगोळी पाच बोटांनी काढायची असते.चिमटीने नाही Happy
झंपी-त्या बायका म्हणजे कोण आहेत माहितीय का?ती आपली जयश्री आहे Happy
मामी-त्या जिलब्या नाहीत त्याला केंद्रवर्धिनी म्हणतात Happy
के.सुचित्रा-हो ही खास संस्कारभारतीची रांगोळी बाजारात मिळते.हि रांगोळी थोडी जाड असते.
मानुषी-ही संस्कारभारतीचीच रांगोळी आहे.

>>झंपी-त्या बायका म्हणजे कोण आहेत माहितीय का?ती आपली जयश्री आह>><<
कोण जयश्री?
अहो मला रांगोळीची चिंता वाटली हो.. बाकी काही नाही...

वॉव! काय सही हात वळतो तुझा Happy कसलं फाईन काढतेस! बघतच रहावसं बाततय ...
रेखीव, ठाशीव आणि सुबक ! ________/\________ तुला Happy
जयश्री, मी तेच विचार करत होते Happy कसलं मन लावून काढतेय ती !

खुप छान. या रांगोळ्या काढून झाल्यावरच बघितल्या होत्या. आता प्रत्यक्ष काढताना बघायला मिळाली ( आणि ते किती कठीण काम आहे तेही कळले Happy )