दत्तप्रसाद मिळावा

Submitted by vijaya kelkar on 1 April, 2013 - 07:45

दत्तप्रसाद मिळावा... -- दव बिन्दूचा अरुणोदयी भरुन आला ऊर-ऊर
ताठ उभे रवि-स्वागता,प्रयत्नात चूर-चूर
त्रयस्था सारखे राहणार नाही दूर-दूर
यत्न वाया जाणार ही हुर-हूर
प्रयत्न विफल ठरलेच, निसर्ग ही क्रूर-क्रूर
सात रंगाच्या किरणाने उडविले त्यास भुर्र-भुर्र
दवाने धुक्याच्या रुपाने पसरला धूर-धूर
मित्राचा मग बदलला नूर-नूर
लाल लाल होण्या तो आतूर-आतूर
वाटू लागले दवाला सोडावी कुर-कुर
( द ता त्र य प्र सा द मि ला(ळा) वा )
लावावा दत्त दत्त हा सूर- सूर

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users