कोणतीही नोकरी घ्या, हाच शिष्टाचार आहे!

Submitted by गझलप्रेमी on 31 March, 2013 - 23:01

गझल
कोणतीही नोकरी घ्या, हाच शिष्टाचार आहे!
आज जो तो जाहला स्वायत्त नोकरदार आहे!!

लोकशाहीचा जमाना, पांगळे सरकार आहे!
लाख अध्यादेश काढा, कोण ताबेदार आहे?

माणसांच्या चेह-यांची श्वापदे फिरतात येथे....
जंगलांपेक्षा अधिक शहरात हिंसाचार आहे!

एवढे त्यांना सलाया, मी तरी थांबू कशाला?
लादणे अस्तित्व सुद्धा एक अत्याचार आहे!

माझिया पिंडाप्रमाणे चालतो शिस्तीमधे मी!
या पिढीचे धावणे भलतेच बेदरकार आहे!

काय घोटाळे, किती लफडी, किती माया जमवली!
आज त्याच्या एवढा कोणी न अब्रूदार आहे!!

हौस असते वेगळी अन् ध्यास हा असतो निराळा!
कैकजण लिहितात गझला, कोण दर्जेदार आहे?

सावळा गोंधळ बघत असतील भटही खिन्नतेने!
आज गझलेचेच नकली, पीक भारंभार आहे!!

............गझलप्रेमी

Group content visibility: 
Public - accessible to all site users

एवढे त्यांना सलाया, मी तरी थांबू कशाला?
लादणे अस्तित्वसुद्धा एक अत्याचार आहे!

माझिया पिंडाप्रमाणे चालतो शिस्तीमधे मी!
या पिढीचे धावणे भलतेच बेदरकार आहे!

<<<

आवडले

३, ४, ५ हे शेर मस्त आहेत.

शेवटचा शेर उगाचच आणि चुकीचा असल्यासारखा! आपण मूल्यमापन कशाला करायचे असे मला वाटते.

धन्यवाद विजयराव!
शेवटचा शेर जरा धांदलीतच लिहिला गेला!
सानी मिसरा बदलला आहे, व संपादित केला आहे! पहाता का ?

धन्यवाद अरविंदराव!

शेवटचा शेर जरा धांदलीतच लिहिला गेला!
सानी मिसरा बदलला आहे, व संपादित केला आहे! पहाता का ?

कोण दर्जेदार आहे?>>>>>>> मी आहे की !!!! <<<<<<<<<<<<

इथे दर्जा भरलेल्यांविषयी चालले नसून गझललेखनाच्या एकंदर दर्ज्याविषयी चालले आहे!

बरेचसे गझलकार शेवटच्या शेरात तखल्लुस का काहीतरी घेतात ना? तखल्लुस घेताना सुध्दा नाव अव्यक्त ठेवलेलं चालतं का?

ही गझल मी अशी वाचली काका.

कोणतीही नोकरी घ्या, हाच शिष्टाचार आहे. आज जो तो स्वायत्त नोकरदार जाहला आहे. लोकशाहीचा जमाना, पांगळे सरकार आहे! लाख अध्यादेश काढा, कोण ताबेदार आहे? माणसांच्या चेह-यांची श्वापदे येथे फिरतात. जंगलांपेक्षा अधिक शहरात हिंसाचार आहे.

एवढे त्यांना सलाया, मी तरी थांबू कशाला?
लादणे अस्तित्व सुद्धा एक अत्याचार आहे! धुगधुगी है शेर मे

माझिया पिंडाप्रमाणे चालतो शिस्तीमधे मी. या पिढीचे धावणे भलतेच बेदरकार आहे. काय घोटाळे, किती लफडी, किती माया जमवली. आज त्याच्या एवढा कोणी न अब्रूदार आहे.

हौस वेगळी असते अन् ध्यास निराळा असतो. कैकजण गझला लिहितात , कोण दर्जेदार आहे, सांगा बरे ?

सावळा गोंधळ बघत असतील भटही खिन्नतेने!
आज गझलेचेच नकली, पीक भारंभार आहे!! जान है शेर मे

हडळ ज्येष्ठांचा मान ठेवते. पण जे वाटले ते स्पष्टपणे सुनावते.

एवढे त्यांना सलाया, मी तरी थांबू कशाला?
लादणे अस्तित्व सुद्धा एक अत्याचार आहे!...............वा वा ! मस्त !!

गजलुमिया,

मी का म्हणून माळू गझलेत नाव माझे?
सांगेल सर्व काही हा बाज खास माझा!
........................ इति गझलप्रेमी

अवांतर: आपला निरागस छद्मीपणा पोचाला!

तिलकधारी आला आहे.

एवढे त्यांना सलाया, मी तरी थांबू कशाला?
लादणे अस्तित्व सुद्धा एक अत्याचार आहे!

छान!

तिलकधारीला गझल वेगळी वाटली.