तुला प्रत्येकदा सांभाळले गेले

Submitted by वैभव फाटक on 27 March, 2013 - 05:08

तुला प्रत्येकदा सांभाळले गेले
चुका माझ्याच होत्या मानले गेले

कुठेसा सांडला शेंदूर थोडासा
पुढे देऊळ तेथे बांधले गेले

जराशी घेतली बाजू तुझी मी अन
तुझ्याशी नाव माझे जोडले गेले

तसा लाचार तो नव्हताच आताही
भुकेने पाय त्याचे ओढले गेले

नवी मी जोडली नाती कशासाठी ?
पुराणे पाश त्याने तोडले गेले.

वैभव फाटक ( २७ मार्च २०१३)

http://vaibhavphatak12.blogspot.in/2013/03/blog-post_27.html

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त बांधलीत फाटक साहेब
अतीशय आवडली

गझल बांधायची कशी हे मी तुमच्याकडे पाहून हळू हळू शिकतो आहे
त्याबद्दल आपला ऋणी
~वैवकु

कुठेसा सांडला शेंदूर थोडासा
पुढे देऊळ तेथे बांधले गेले

मस्तच!

कुठेसा हे काही भावले नाही

बाकी गझलही छान!

कुठेसा सांडला शेंदूर थोडासा
पुढे देऊळ तेथे बांधले गेले

छान शेर
सांडला ऐवजी फासला शब्द बरा वाटला असता का असे वाटून गेले!

बाकी गझल ठीकठाक!

<<< सांडला ऐवजी फासला शब्द बरा वाटला असता का असे वाटून गेले! >>>

प्राध्यापक महोदय, काय चालवलेत हे?
सांडला आणि फासला या शब्दात जमीन अस्मानचा फरक आहे.

अनपेक्षितपणे चुकून सांडले जाते त्याला सांडणे म्हणतात.
जाणीवपूर्वक प्रयत्न करून फासले जाते त्याला फासणे म्हणतात,

गझलकाराला या शेरामध्ये

"चुकून जरासा शेंदूर सांडला त्या ठीकाणी"

असे म्हणावयाचे आहे असे दिसते. व ते आणि तेच अत्यंत योग्य आहे.

--------------------------------------------------------------
प्राध्यापक महोदय, सावरा स्वतःला आणि आवरा हा फाजिलपणा.

तुम्हाला अजूनही इतरांना शिकवत बसण्यापेक्षा स्वतः शिकण्याची सक्त आवश्यकता आहे. Sad

गंगाधरराव,
प्राध्यापक महोदय, सावरा स्वतःला आणि आवरा हा फाजिलपणा.

तुम्हाला अजूनही इतरांना शिकवत बसण्यापेक्षा स्वतः शिकण्याची सक्त आवश्यकता आहे<<<<<<<<<<<<

आपला काव्य/शब्दबोध/काव्यात्मक कयास/ दिलेला मोफत अनाहूत सल्ला/इशारा सारेच वाखाणण्याजोगे आहे!

आपण काय शिकलो, काय शिकायला हवे, की शिकवायला हवे, कुठे उभे आहोत, कुठे चाललो आहोत हे ज्याचे त्याने पहावे! दुस-याने काय करायला हवे याची चिंता/ काळजी/ फिकीर करत जिवास जाळण्यापेक्षा स्वत:ला कसली आवश्यकता आहे याला पहिला अनुक्रम माणसाने द्यायला हवा!

जो तो आपल्या वकूबाप्रमाणे, अनुभवाप्रमाणे व एकंदर काव्यबोधाप्रमाणे आपले मत नोंदवत असतो!
आपल्याच मताचा रबरी शिक्का दुस-याच्या मतावर मारल्याने काहीही साध्य होत नाही!

समाजात अनेक देवळे बांधली जातात व देवळांचा धंदा पण काहीजण तेजीत करताना दिसतात! त्याकरता लागते जागा! म्हणूनच कुणी तरी कुठे तरी दगडाला शेंदूर फासतो व मूर्तीचा आभास निर्माण करतो व जागेची तजवीज करतो जेथे पुढे देऊळ उभे राहते ज्याचे बडे देवस्थान होते हे समाजात दिसून येते!
इथे देऊळ चुकून जरासा शेंदूर सांडल्यामुळे नाही तर जाणीवपूर्वक दगडाला शेंदूर फासून निर्माण होते!

अनपेक्षितपणे चुकून सांडले जाते त्याला सांडणे म्हणतात.
जाणीवपूर्वक प्रयत्न करून फासले जाते त्याला फासणे म्हणतात,

सांडणे काय अनपेक्षितपणेच घडते काय दरवेळी?
नकळत काही फासले जाऊ शकत नाही काय?

काहीही ठोकून द्यायचे त्याला काही सीमा?

आपण काय शिकलो, काय शिकायला हवे, की शिकवायला हवे, कुठे उभे आहोत, कुठे चाललो आहोत हे ज्याचे त्याने पहावे! दुस-याने काय करायला हवे याची चिंता/ काळजी/ फिकीर करत जिवास जाळण्यापेक्षा स्वत:ला कसली आवश्यकता आहे याला पहिला अनुक्रम माणसाने द्यायला हवा!<<<<<<

सांडणे आपोआप तर फासणे हेतूपुरस्पर असते.

गझलप्रेमी, तुला दुसर्‍यांना काय म्हणायचे आहे हेच कळत नसेल तर दुसर्‍यांनी काय म्हणावे यावर भाषण का ठोकतोस?

सांडणे कुठे आणि फासणे कुठे!

तिलकधारी तुझ्या मतप्रदर्शनाकडे एक तुच्छ कटाक्ष टाकत आहे.

<<< सांडणे काय अनपेक्षितपणेच घडते काय दरवेळी? >>>
होय.
अनपेक्षितपणे नसलेले आणि जाणूनबुजून "सांडणे" याला "सांडवणे" म्हणतात. Happy

<<<< नकळत काही फासले जाऊ शकत नाही काय? >>>
नाही.
नकळत फासले गेले तर त्याला "चुकून गालबोट लागले" असे म्हणतात. Rofl
-----------------------------------------------------------------------------------------------------
मंदीरांच्या निर्मितीमागच्या कारणांचा शोध घ्यायचा असेल तर त्याची उत्तरे भूगर्भशास्त्रात मिळायची नाहीत. त्यासाठी इतिहासाचे उत्खखन करावे लागते. लढाया, आक्रमणे, लुटीची संपत्ती सुरक्षित ठेवायची ठिकाणे आणि लुटीचे अर्थशास्त्र याचा काथ्याकुट करावा लागतो.

असो. हेमाशेपो. Happy

मंदीरांच्या निर्मितीमागच्या कारणांचा शोध घ्यायचा असेल तर त्याची उत्तरे भूगर्भशास्त्रात मिळायची नाहीत. >>>>>

झालं बोंबल्लं ! Sad
घ्या आता मुटे सर !!
तुमच्यामुळे समस्त निष्पाप मा.बो.कराना काय काय भोगावं लागणार आहे याची तुम्हाला कल्पना येईलच थोड्यावेळात Light 1

असो ..आय अ‍ॅम रेडी,,,,,,,,,,,,,,,,,,आलिया भोगासी असावे सादर !!!

Lol Lol Lol

तिलकजींच्या मौल्यवान तुच्छ कटाक्षामुळे व वैभवाच्या रास्त भीतीमुळे सांडणे/फासणे यावरील चर्चा आम्ही थांबवत आहोत मुटे सर!
टीप: एक आम्ही पाहिले.......
आम्ही काही मत नोंदवले की, त्याला फक्त विरोधाला विरोध म्हणून इथे लोक मते मांडत सुटतात!
तर्कशुद्ध चर्चेची वेळ आली की, तुच्छ कटाक्ष टाकू लागतात!
त्यामुळे आम्ही असल्या वादग्रस्त विषयांवर अधिक बोलणे टाळत आहोत! म्हणजे अनेकांची भीती,चिंता व भोग तरी चुकतील!

उत्खनन म्हटले की, भूगर्भशास्त्रज्ञ आलाच मुटे सर!
तो जमिनीखाली किंवा समुद्राच्या तळाखाली, किंवा वर वातावरणात, किंवा अंतराळात, आपल्याच नाही तर इतर कोणत्याही परग्रहावर काय आहे, आपल्याच नाही तर इतर आकाशगंगेत काय आहे याचा काथ्याकुट करायला तैनात असतो!

तसा लाचार तो नव्हताच आताही
भुकेने पाय त्याचे ओढले गेले

नवी मी जोडली नाती कशासाठी ?
पुराणे पाश त्याने तोडले गेले.

सुंदर.

पुराणातली वांगी पुराणात.............ही म्हणही ऐकली असेल ना?

नवी मी जोडली नाती कशासाठी ?
पुराणे पाश त्याने तोडले गेले.

पुराणे हा शब्द जुनेपुराणे या अर्थाने वापरलेला आहे.

खाणाखुणा कुणाच्या पाहून पावलांच्या?
जखमा जुन्यापुराण्या गंधाळल्या अचानक!.......इति गझलप्रेमी

पुराणातली वानगी पुराणात..... अशी आहे ती म्हण! Happy

(वानगी = दाखला =दृष्टांत वगैरे या अर्थाने)

पुराणात कुठून आलेत वांगे? Happy

कुठेसा सांडला शेंदूर थोडासा
पुढे देऊळ तेथे बांधले गेले

शेर आवडला.

वैभव, परवानगी न घेता थोडी अवांतर चर्चा करीत आहे. समजून घेशील.

मला समजत नाही की गझलेला सोडून येणारे प्रतिसाद नेमकं काय साधतात.
एक ओवी आठवली:
तुका वेडा अविचार करी बडबड फार

भट एकेठिकाणी म्हटले होते की शहाणा म्हणजे कमी अडाणी माणूस.
असेही म्हणावेसे वाटते की शहाणा म्हणजे स्वतःच्या अज्ञानाची जाणीव असणारा माणूस.
कृपया कुणीही प्रतिसाद देण्याऐवजी स्वतःलाच साद घालावी.
कारण रिझोलुश्यन तुमच्यापाशीच आहे.

धन्यवाद.

Pages