ठरेन या जगात मी महान एकदा तरी (तरही)

Submitted by इस्रो on 26 March, 2013 - 07:25

कुणी तरी करेल मानपान एकदा तरी
ठरेन या जगात मी महान एकदा तरी

घडेल जर कधी इथे जसे हवे तसे मला
म्हणेन मी मलाच नशिबवान एकदा तरी

उगाचच्या उगाच जर मला कुणी छळेल तर
तयास दाखवेन आसमान एकदा तरी

विदेश देश पाहिले फिरुन हे किती जरी
परत अता बघेन पण जपान एकदा तरी

म्ह्णेल छान! थोपटेल पाठही जरा कुणी
खराखुरा मिळेल कदरदान एकदा तरी

-नाहिद नालबंद
[भ्रमणध्वनी : ९९२१ १०४ ६३०]
[ईसंपर्क : nahidnalband@gmail.com]

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान झालेत शेर सगळेच
जपान चा शेर फार भारीये !!

पण पहिल्या ओळीत अनेक देश साठी देश विदेश हा शब्द विदेश देश असा आल्याने द्विरुक्ती वाटली तसेच फिरून(फिरसे या अर्थी) व परत हे दोन शब्दही द्विरुक्ती वाटले तरी मला ही द्विरुक्ती छान वाटली व मला पुढे असे ही वाटले की जपान बद्दल सांगताना अधिकाधिक देशांचा उल्लेख टाळून फक्त जपान बद्दलच बोलले तर अजून खुलून येईल तो शेर

पाहिलाय मी जरी कितीकदा फिरून पण
वाटते ..बघू पुन्हा जपान एकदातरी

जपान हा काफिया मस्त आहे त्यानुषंगे व्यक्त झालेला खयालही हटके आहे त्याबद्दल धन्यवाद नाहीदभाई

चू भू द्या घ्या Happy