काही शेर

Submitted by शुभानन चिंचकर 'अरुण' on 24 March, 2013 - 07:59

पंडितांचा चुकवला होरा किती ...
रंग काळोखा तुझा गोरा किती !!!

मीच केली पाठ आयुष्याकडे ...
मीच जावे त्यास सामोरा किती ?

वाचता आली न तुजला आसवे
वाटला कागद तुला कोरा किती ....

'अरुण' (शुभानन चिंचकर)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

शुभाननजी,
मीच केली पाठ आयुष्याकडे ...
मीच जावे त्यास सामोरा किती ?

वाचता आली न तुजला आसवे
वाटला कागद तुला कोरा किती ....

अप्रतिम शेर! गझल का पुरी करत नाही?

गझलप्रेमीजी, वैभवजी धन्यवाद !
गझल पूर्ण करण्याचा प्रयत्न चालू आहे ...
पूर्ण गझल परत नक्की पोस्ट करेन ! Happy Happy