सवय!

Submitted by आर.ए.के. on 21 March, 2013 - 06:06

रस्त्यावरच्या दगडांना सुद्धा आता
माहीत झाल आहे,
तुझ्या जाण्याची आणि येण्याची
आता त्यांनासुद्धा सवय झाली आहे!

तुझं जवळ असणं किंवा नसणं
याला आता महत्त्व नाही,
तुझ्या अस्तित्त्वाची जाणीवच,
माझी सोबत बनली आहे!

तुझं वावरणं,हसणं किंवा रडणं,
कधी डोळ्यांदेखत जरी नसलं,
तरी त्याची चाहूल आता,
तू दूर असतानाही मी ऐकली आहे!

तुझं ते आधार देणं,
सांभाळणं आणि सावरणं,
तू इथे नसलास तरी ते काम,
तुझ्या शब्दांनी आधीच करुन ठेवलं आहे!

आनंदाच्या पावसात कधी धुंदपणे भिजताना,
दु:खाच्या उन्हात कधी एकाकी भाजताना,
हिवाळ्याच्या दिवसांत कधी चांदणं न्याहाळताना,
तुझं माझ्यासोबत असणं, आता मी गृहीत धरलं आहे!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

aadhi kuthe vachli aathavat nahi

<< नक्की काय म्हणायचं आहे आपल्याला?
प्रतिसादाबद्द्ल धन्यवाद!