गर्दी

Submitted by आर.ए.के. on 21 March, 2013 - 01:05

गजबजलेली गर्दी
अन थबकलेला वारा,
माणसांचे थवे,
अन अस्ताव्यस्त पसारा!

अनोळखी मुखवटे,
अन असंबध्द बडबड,
पळणारे रस्ते,
गोंधळ, घाई आणि गडबड!

हसणारे, रागावलेले,
क्वचित घाबरलेले चेहरे,
नाकासमोर चालणारे,
पण कानांनी बहिरे!

गर्दीच्या या किलबिलाटात,
कुणाचाच कुणाशी संबंध नाही,
नातं फक्त रस्त्याशी,
बाकी कशालाच अस्तित्त्व नाही!

तक्रार कुणाला?
आणि कशाला करायची?
अस्तित्त्वाच्या अस्तित्त्वाला
दुर्लक्षिण्याची लढाई,
आपणही लढायची!

प्रवाहासोबत चालायचे,
प्रवाहासोबत जगायचे,
गर्दीतलाच एक मुखवटा बनून,
मुक्काम आपापले गाठायचे!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अस्तित्त्वाच्या अस्तित्त्वाला
दुर्लक्षिण्याची लढाई,

विचार आवडले. कविता आवडली. कळावे.

गं स

vinayakparanjpe , गंभीर समीक्षक प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद!