'अभिशाप'

Submitted by अमेय२८०८०७ on 19 March, 2013 - 10:46

चारी दिशा झाकोळात वर विषारी आकाश
जळे एकटीच वात दारी पुरेना प्रकाश

तडा गेलेल्या काचेला अंधाराचा अभिशाप
कोपऱ्यात फुटताना रिते जीवनाचे माप

सरलेल्या गीतापरी स्तब्ध काळोखी निःश्वास
आता सूर आठवून शब्द आर्ततो कशास

दृष्टी थिजते कोरडी आंधळ्याचे झाले हात
जणू निशाणे दावून घ्यावे तमाला घरात

किती चढावे डोंगर किती उतरावे घाट
तरी सापडत नाही सूर्योदयाची पहाट

Group content visibility: 
Public - accessible to all site users

नैराश्याची भावना छान प्रकट झालेय.
शेवटच्या दोन ओळी विशेष उल्लेखनीय वाटल्या.

"जणू निशाणे दावून घ्यावे तमाला घरात " >>> यातील 'निशाणे दावून' चा नीटसा संदर्भ लागला नाही.
माझ्या आकलनशक्तीचा दोष असू शकेल.

धन्यवाद मंडळी.
माझे अत्यंत भाग्य म्हणजे फेसबुक कविता समूहावर या कवितेसाठी क्रांतीताई साडेकर यांनी हृदयस्पर्शी विवेचन लिहिले. त्याची लिंक देत आहे.
https://www.facebook.com/groups/marathikavitasamooh/502322886469993/?not...