श्वासात आज माझ्या गुंफीत श्वास ये तू

Submitted by अनिल आठलेकर on 18 March, 2013 - 16:06

श्वासात आज माझ्या गुंफीत श्वास ये तू
आहे तुझी प्रतिक्षा चढवून साज ये तू..!

हे बंध रेशमाचे माझ्या तुझ्या मनाचे
होतील शब्द वेडे घुमवीत नाद ये तू.....

घेईन मी धिटाई बेधुंद काजव्यांची
उत्फुल्ल चांदण्यांचे प्रिय गीत गात ये तू

येईन मी सुखाने झगडून वादळाशी
खोट्या पराभवाला देऊन मात ये तू

वाटा अशा सुगंधी होतील नित्य साक्षी
गाठेन सर्व शिखरे होऊन भास ये तू.........!

__अनिल आठलेकर , पुणे
१७/०३/१३

Group content visibility: 
Public - accessible to all site users