दुष्काळ निधी

Submitted by Prajakta C. Kulkarni on 18 March, 2013 - 05:11

|| श्री ||

बाबांना काय वाटेल ,जयदेव जहागिरदारांच्या एकुलत्या एक मुलाचे लग्न्,इतक्या साधेपणाने करायचे ,कारण काय तर लग्नातला वारेमाप खर्च टाळुन तो पेसा दुष्काळ्ग्रस्तांना निधी म्ह्णुन द्यायचा.आई तर किती कांगावा करेल,तिला तर निधी द्यायची कल्पनाच आवड्णार नाही,आणि त्यांना निधी द्यायचा म्हणुन आपण आपली श्रीमंती का दाखवायची नाही.मुख्य म्हणजे ही गोष्ट दमयंतीला मान्य आहे,एका मिनिटात तिने ह्या गोष्टीला मान्यता दिली ,मला वाट्ले नव्ह्ते ती इतक्या सह्जपणे तयार होईल्,एवढी शिकलेली , श्रीमंत मुलगी वारेमाप खर्चाला लगाम घालायला तयार झाली,तिच्या जागी दुसरी कुणी असती तर ... जाउ दे पण आज ही गोष्ट घरात सगळ्यांना सांगायचीच काहीही होओ.असा विचार करुन भुषण खाली दिवाणखान्यात येतो.

"बाबा" भुषण
"बोला चिरंजीव ,मी एकतोय" जयदेव
"हा जो काही अफाट खर्च होणार आहे" भुषण
"तु कशाला खर्चाची काळ्जी करतोस्,आम्ही सगळेजण आहोत ना."त्याल मध्येच थांबवत ईरावती त्याची आई बोलते.
"अजुन काही हवे असेल तर सांग" अनुराधा काकु
"हो ना" कांचन आत्या
" आत्या ,काकु जरा थांबा. माझा विचार थोडा वेगळा आहे.हा जो काही वारेमाप खर्च होणार आहे,तो टाळुन आपण हा पेसा दुष्काळ्ग्रस्तांना निधी म्ह्णुन द्यायचा.तिकडे पाण्याचा थेंब नाही आणि आपण इकडे अत्तराचे सडे मारायचे,केवळ आपल्याकडे पेसा आहे म्हणुन का.मला ह्या गोष्टी पटत नाही.म्हणुन हा शाही-सोहळा आपण साधेपणाने करायचा" भुषण
सांगतो.
"वा भुषण ,चांगली कल्पना आहे " वीणा वहिनी
" ए तुझे काय जातय ग चांगलं म्हणायाला,मला नाही ह आवडणार साधेपणा मी आधीच सांगतेय. मी काय उगीच आलेय का लंडन वरुन हा साधेपणा पहायला,ते काहि नाही शाही सोहळा झालाच पाहिजे , ईरावती वहिनी अग तु बोल ना काहि तरी" कांचन आत्या
"आत्या अगं इतका दुष्काळ् पड्ला असताना ,माणसे आपापलि घरे दारे सोडुन चाललीत्,स्थलांतरीत होत आहेत. आपल्या ईथे दुष्काळ् नाही ,म्हणुन आपण ही उधळ्पट्टी करायची का,त्यांना एक वेळचे जेवण मिळत नसताना,आपण इथे पंचताराकीत हॉटेल मध्ये पंचपक्वान्नाच्या पंगती झाडायच्या का? परिस्थिती चे भान नको का?" भुषण
"तु काय दुष्काळ्ग्रस्त भागाचा दौरा करुन आलास की काय ,नाही ते नेते मंडळी जातात तसे तुझे काका गेलेत ना दौर्यावर म्हणुन आपले विचारले" काकु
" समाज काय म्हणेल ,आपले नातेवाईक काय म्हणतील ,जगात एवढे सगळे शाही सोहळे होतात त्यावेळी कुणाला दुष्काळ आठ्वत नाही,आपणच का हा विचार करायचा?" ईरावती
"आई अग सुरुवात कुठुन तरी केलीच पहिजे ना म्हणुन मी आणि दमयंती ने ठरवले की हा वारेमाप खर्च कमी करायचा" भुषण
"म्हणजे तुमचे ठरलय तर मग आम्हाला कशाला विचारताय्,तुमचे चाललय तर चालु द्या.त्या तोफखान्यांना तरी या गोष्टी कशा पट्ल्या देव जाणे" ईरावती तणतणत आत जाते.पाठोपाठ सगळया बायका आत जातात.

भुषणचे वडील जयदेव जहागिरदार हे अर्थशास्त्राचे प्राध्यापक होते.त्यांचा ह्या विषयावर वेगळ मत होते. आत्ता तरी त्यांनि त्यांचे मत मांडले नव्ह्ते तरी आज संध्याकाळी ते सांगणार होते.भुषणचा चुलत भाऊ सारंग,आणि वीणा वहिनी या दोघांना ही गोष्ट आवड्ली होती..पण बाकी कुणालाच हे आवड्ले नाही.
संध्याकाळी भुषणची वाट बघत सगळेजण बसले होते.दिवसभर या बायकांनी अगदी काथ्याकुट केला होता. तेवढ्यात भुषण घरी येतो.

" भुषण असा कोणता खर्च वारेमाप होतोय रे ते तरी सांग सकाळी इतका तणतणत होतास ते,आणि तुझ्या डोक्यात हे खुळ कुठुन आले रे" ईरावती

"परवा मी आणि सारंग दादा ,सगळ्या खर्चाचा अंदाज काढत होतो,त्यावेळी लक्षात आले की फेटे,वरात्,फाइव्ह्स्टार हॉटेल ,पंचपक्वान्न,च्या पंगति अजुन यादी खुप मोठी आहे ,पण हा खर्च खुप होतोय ,करणारे समर्थ आहेत पण हा अनावश्य्क खर्च आहे" भुषण

"ए मला वरातीत नाचायचे होते ना" रेवती भुषण ची चुलत बहिण
" मला पण नाचायचे होते ना" आत्या
"त्या दिवशी संध्याकाळी तुमच्या दोघींचा नाच ठेवु आपण ,आत्या-भाचीचा" भुषण
" आणि ते फाइव्ह्स्टार हॉटेल नको म्हणतोस ,मग काय देवळात लावायचे का लग्न?" ईरावती

"देऊळ कशाला काकु, त्या तोफखान्यांचा तीन मजली बंगला आहे ना,एका राजवाड्याला शोभेल असा.आणि दमयंती ची काही हरकत नाही याला,फक्त जवळचीच माणसे बोलवायची ,नेहमीप्रमाणे गावजेवण घालायचे नाही काय?" सारंग

"मला असे वाट्ते की हा शाही सोहळा व्हायलाच पाहिजे, त्याशिवाय माणसांना कामे कशी मिळणार .हे केटरर वाले,पत्रिकावाले, मंड्पवाले ,फेटेवाले या सगळ्याना काम मिळते,हाताला काम मिळते.पेसा वाहतो.मंदीच्या काळात हे असे शाही सोहळे व्हायलाच पाहिजेत. त्याशिवाय चलन -वलन कसे होणार? छोट्या उदयोगांना हातभार कसा लागणार? "जयदेव
"काका अरे अर्थ शास्त्राचा तास चालु नाही रे" सारंग
" पण बाबा मंदी मोठी का दुष्काळ?" भुषण
" अरे ए ,घरात मोठी माणसे आहेत ना ,का सगळा निर्णय तुम्ही पोरच घेणार का?त्या पोरीचा दमयंतीचा विचार करा,तिच्या घरच्यांचे काय म्हणणे आहे ते पहा जरा" काकु
शेवटी चर्चा अशीच थांबते.

रेवतीला वरातीत नाचायचे आहे,आईला वरमाई म्हणुन मिरवायचे आहे.सगळ्यांचीच काही ना काहीस्वप्ने आहेत्,इच्छा आहेत.आत्या तर खास लंडन वरुन आलि शाही-सोहळा साजरा करायला.तर बाबांचे वेगळेच गणित .पण त्यांच्या बोलण्यातही तथ्य आहे.दमयंतीच्याही काही इच्छा असतील.
तेवढ्यात दमयंतीचा फोन येतो.तसा भुषण भानावर येतो.दमयंतीच्या वडिलांनी भुषणला घरी बोलावले होते.त्याला वाट्ते आता तोफखान्यांच्या घरी पण जंगी सत्कार आहे.कुठुन ही दुष्काळ निधी ची कल्पना मला सुचली आणि मी ती दमयंतीला सांगितली आणि तिने तिच्या वडिलांना.
दुसर्या दिवशी संध्याकाळी दमयंतीचे वडिल जयसिंगराव तोफखाने भुषणची वात बघत बसले होते.तसे ते ही वेळेचे पक्के होते ,आणि भुषण सुद्धा .बरोबर आठ वाजता भुषण त्यांच्या "दौलत" बंगल्यावर हजर होता.घरच्यांनी दुष्काळ निधी ला केलाला विरोध त्याच्या चेहर्या वर स्पष्ट्च दिसत होता.हे सगळे जयसिंगरावांनी ओळखले होते.म्हणुन त्यांनी भुषण सोबत वेगवेगळया विषयावर चर्चा केली.तरीपण भुषणला अपेक्षीत विषयाला जयसिंगरावांनी अजुन हात लावला नव्हता.त्याला असे वाटायचे कि कोणत्याही विषयावरुन जयसिंगराव त्या विषयावर येतील ,म्हणुन तो जरा बिचकुन होता.
मग ते सगळे जेवायला बसतात.दमयंती आणी तिची आई वाढायला उभ्या होत्या.दमयंतीला बाबांच्या स्वभावाचा काहीच अंदाज लागत नव्ह्ता.तेवढ्यात भुषणच विचारतो.
"तुम्हाला ही दुष्काळ निधी ची कल्पना आवड्ली नसेल तर माझी काहीच हरकत नाही.माझेच चुकले.माझा हा विचार आमच्या घरी पण फारसा कुणाला पट्ला नाही.शेवटी तुमच्या पण भाव भावना महत्त्वाच्या आहेत.सॉरी त्यासाठी"
"पण आम्हाला पट्ली ना ही गोष्ट.भुषणराव अहो कौतुक करण्यासारखी ही गोष्ट आहे ,आमचे काहीच म्हणणे नाही,असा विचार सगळ्यांनी केलाच पाहीजे ,काय" जयसिंगराव
"बाबा खरंच" दमयंती
"मग अगं तु जेव्हा मला हे सांगितलेस ना तेव्हाच मला ही कल्पना पट्ली होती" जयसिंगराव
"मग मला का नाही सांगितली?" दमयंती
"असेच" जयसिंगराव
"हं " दमयंती
"हं काय बासुंदी वाढ सगळ्यांना" जयसिंगराव

भुषण बासुंदीवर ताव मारुन घरी येतो.दमयंतीच्या घरच्यांनी परवानगी दिल्या मुळे त्याला असे वाटत होते की आता आपल्या घरातील सुद्धा तयार होतील.त्याच्या घरी त्याचे काका रघुनाथराव आले होते दौर्या वरुन.रघुनाथराव हे एक राजकीय प्रस्थ होते.त्यांना आता येत्या निवडणुकीला उभे रहाय्चे होते.तशी समाजात त्यांची चांगली प्रतिमा होती.शिवाय भुषणचे मामा -मामी आले होते खरेदी पहण्यासाठी.

" या भुषणराव या,आम्ही तुमचीच वाट बघत होतो,. तुमच्या पत्रिका वाटायचे काम आम्ही आणि तुमच्या काकु करणार आहोत " काका
"हो करा की, आणि कधी आलात तुम्ही? आणि हे काय आहे काका?" एका कोपर्यात एकावर एक रचल्या जाणार्या खोक्याकडे भुषणचे लक्ष जाते .
"अरे त्यात साड्या आहेत.पत्रिके सोबत घरटी एक साडी वाटायची आहे" काकु
"त्या निमित्ताने मतदारांना भेटता येईल काय" काका
"हो ना" काकु

घरटी एक साडी देण्यामागे काकांचे राज कारण होते.त्यांना येत्या निवडणुकीला उभे रहायचे होते त्याची ही तयारी होती.तसे ते यापुर्वी दोन वेळा उभे होते ,पण संधी मिळाली नाही.याआधी त्यांनी मतदारांना लाच देण्याचा प्रकार केला नव्हता,पण यामुळे एक त्यांच्या लक्षात आले होते कि मतदारांना मी लाच दिलि नाही तर आणखी कुणी तरी देईलच ना,मग मी का नाही.यासाठी त्यांनीपत्रिका वाटायचे काम हाती घेतले होते.ही गोष्ट सध्यातरी भुषण च्या लक्षात आली नव्हती. पण दुसर्या दिवशी सकाळि च हे राजकारण लक्षात आले. तसा तो चिड्तो,

" काका हा काय प्रकार आहे वेडयासारखा.इतके वर्षे तुम्ही ज्या गोष्टी चा राग केला, तिटकारा केला,तिच गोष्ट तुम्ही करताय ,एका मतासाठी तुम्ही चक्क लाच देताय.मला तुमचे गणितच कळत नाही "

"भुषणराव अहो आता आम्ही त्यांना विकत घेतले तर आणखी कुणितरी घेईलच ना,आणी त्यामुळे माझे दोन वेळा नुकसान झाले आहे.मला पण पट्त नाही हा प्रकार पण आता पर्याय नाही" काका

" इतर कुणि लाच देतो म्हणुन आपण द्यायची का ,आपण आपली सगळी तत्वे विसरायची का.मग उपयोग काय काका .या फोटोंचा.या तत्ववेत्त्यांची तत्वच पाळायची नाहीत का ,कशाला लावायचे हे फोटो ? कशाला पांढरे शुभ्र कपडे घालुन मिरवायचे आपण स्वच्छ आहोत ते दाखवायला का" भुषण भिंतीवर लावलेल्या फोटो कडे बघतो.
"भुषणराव तुम्ही खरेच खुप चांगले भाषण देता,मुद्दे चांगले पटवुन देता.आमच्याएवजी तुम्ही च या आता राज कारणात " काका
"काका विषयांतर करु नक.समाजात तुमची प्रतिमा चांगली आहे आणि मला त्याचा अभिमान आहे.पण असे लाच देण्या एवजी तुम्ही दुष्काळ ग्रस्ताना मदत करु शकता ,तिथे या पेशाची गरज आहे"
"ते खरे आहे हो पण नुसती प्रतिम चांगली असुन उपयोग नाही होत ,लोकांना आपले मुद्दे पटले पाहिजेत " काका
"वाटले तर तुमच्या प्रचाराची सगळी जवाबदारी मी घेतो , पण तुम्ही लाच देणार नाही आणि दुष्काळ ग्रस्ताना मदत करणार आहात कबुल?"
"अगदी कबुल.आता कार्यकर्त्याना तिकडे पाठवतो मग तर झाले"

त्यादिवशी संध्याकाळी ती साड्यांची खोकी जिथुन आली होती तिकडे जातात.रघुनाथरावांना आज त्यांच्या पुतण्याचा खरा अभिमान वाटत होता. आणि भुषण ला पण काकांचा अभिमान वाटत होता की
काकांनी माझे बोलणे एकले

रात्री इरावती एकटीच स्वयपाकघरात आवराआवर करत होती, भुषण आईचे मत जाणुन घेण्यासाठी येतो
"आई तुझे म्हणाणे तु सरळ सरळ सांग ना"
"भुषण अरे समाज काय म्हणेल ,आपले सगळे नातेवाईक काय म्हणतील , शेजारी -पाजरी काय म्हणतील ? त्याचा विचार कोण करणार .ते तुझे बाबा सगळ्या गोष्टीकडे अर्थ शास्त्राच्या द्रुषटीकोनातुन बघणार, तुझे काका त्यांचे वेगळेच राजकारण आणलेल्य सगळ्या साड्या पाठवल्या माघारी , लोकं काय म्हणतील त्याचा विचार कर जरा ,समाजात आपली एक प्रतिष्ठा आहे , मान आहे कळले"

आईचा हा विचार एकुन भुषण पुढे काहीच बोलत नाही.

मधले चार-पाच दिवस असेच जातात.कुणिच या विषयावर बोलत नव्हते आणि एकमत ही होत नव्ह्ते ,कारण सगळ्यांचेच विचार वेगळे.नेहमीचे वातावरण ही घरात नव्हते.त्यामुळे भुषण ला असे वाटायचे की आता हा शाही- सोहळाच होणार आहे.बाबांचे अर्थशास्त्र ,काकांचे राजकारण ,आईची प्रतिष्ठा महत्त्च्वाची आहे या दुष्काळा पेक्षा . सकाळी दमयंती ला सांगतो पुर्वी ठरल्या प्रमाणे सगळ्या गोष्टी होति ल म्हणुन ,भुषणराव आता शाही- सोहळाची स्वप्ने पहा,असा विचार करुन भुषण झोपी जातो.

दोन -तीन दिवसांनतरची सकाळ . सारंग पत्रिकेवर नावे घालत बसला होता.भुषण हॉलमध्ये नुसता बसुन होता ,पण कुणाशी काहीच बोलत नव्हता. जयदेव मेन्यु कमी करत बसले होते.अनुराधा काकु पाहुण्यांची यादी कमी करत बसली होती.

"जयदेव काका त्या केटरर वाल्याचा फोन आहे किती ताटं आहेत विचारतोय काय सांगु? " सारंग
"त्याला सांग नंतर फोन करुन सांगतो म्हणुन " अनुराधा काकु
"आता नंतर कशाला ,परवाच तुम्ही यादी केली ना मग आता काय अजुन पंगत वाढवायची आहेत का" सारंग
" नाही रे सारंग कालच मी आणि वहिनींनी यादी कमी केलीय ,तरी एकदा फायनल झाली सांगतो" इरावती
"आणि हो हे मेन्यु पण मी कमी केलेत शिवाय ते हॉटेल वाले त्यांना आपण निम्मे पेसे दिलेत ते जर नाही म्हणाले तर काय करायचे " जयदेव
"मला तर बाई टेन्शनच आलेय ह्या सगळ्यांना आता नाही कसे म्हणायचे ,एका महिन्यावर या गोष्टी आल्यात कसे होणार?" इरावती
"काकु ती जवाबदारी माझी ,पण अचानक विचार कसा काय बदलला? सारंग हसुन
"कुणाचा विचार बदलला ? आणि कसला?" भुषण
" हाच दुष्काळ निधी देण्याचा ,नथी घालुन , भरजरी शालु नेसुन,आपली श्रीमंती मिरवण्याची काही गरज नाही, राज्यात पाण्याचा तुटवडा असताना आपण अत्तराच सडे मारायचे ,पट्त नाही ना ते हेच" कांचन आत्या हसत जिन्यातुन खाली येते.
"मग काय काही गरज नाही वारेमाप खर्च करायची ,उधळपट्टी करायची ,कळले का वीणा ?" अनुराधा काकु
"हो हो कळले बरे" वीणा
" आत्या हे चक्क तु बोलतेस ,कमाल आहे तुझी ,अग तुला तर वरातीत नाचायचे होते ना" भुषण
"आता ते घरी आल्यावर नाचायचे असे ठरले आहे ना ," आत्या
"सगळे काही तुझ्या मनासारखे होणार आहे रे ,भुषण " काकु
"पण विचार बदलला कसा काय? सारंग
"तेच ना" भुषण
"काही नाही, आम्हाला हा विचार पट्ला,म्हट्ले समाजाचा कशाला विचार करायचा तो दोन्ही बाजुने बोलणारा,शेवटी ही एक सुरुवात आहे.आज आपण उधळ्पट्टी ला आवर घालतोय उद्या आपले नातेवाईक घालतील.समाजापुढे हा एक आदर्श असणार आहे.माणुसकीच्या नात्यातुन मदत ही केली च पाहिजे आणि वारेमाप खर्च पण खुप होतोय ,हयाचा विचार केला आम्ही सगळ्यांनी" इरावती
"आणि बाबा तुमचे काय चालु होते आर्थिक मंदी चे?" भुषण
"मी फक्त मुद्दा मांडला ,तशी माझी परवानगी होतीच ,कालच माझे आणि तोफखान्यांचे बोलणे झाले याविषयावर "जयदेव
"वा काका वा , आणि हे आत्ता सांगतोस" सारंग

"बाबा ,सगळ्यांचे रुसवे-फुगवे काढुन झाले असतील तर माझे एका मी करवली आहे. फोटोग्राफर चे काम माझ्या एका मित्राला द्यायचे तो पेसे पण कमी घेईल ,का फोटो पण काढायचे नाही असे ठरवले आहेस का? रेवती
" नाही ग बाई दिले हे काम तुझ्य मित्राला दिले ,मग तर झाले ,नाही तरी हे काम अर्थशास्त्राच्या द्रुष्टीने हे योग्य आहे काय बाबा? भुषण
"शाब्बास दादा" रेवती

------------------समाप्त----------------------------

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users