रिक्षा - भिक्षा कि शिक्षा????

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

"रिक्षा..... रिक्षा..... रिक्षा........"

"आयला, एक जण थांबायला तयार नाही...."

"रिक्षा, गडकरीला येणार का??"
"नही"
" अरे... हा तर नाही म्हणुन निघुनही गेला"

"रिक्षा, कळव्याला येणार का??"
"नाही"
"का???"
"गाडी माजिवड्याची आहे.. कळ्व्याला गेलो तर तिथुन एम्टी रिटर्न याव लागेल..."
"अरे पण बरोबर बाईमाणसं आहेत.. आता रात्री दुसरी रिक्षा कुठे मिळणार???"
"नाही साहेब, नाही जमणार यायला. तुम्ही दुसरी रिक्षा बघा."

हे असे अनेक प्रसंग आपण रोज नाक्यानाक्यावर घडताना पाहतो. मला तर या सर्व प्रसंगातुन नेहमीच जावे लागायचे. शेवटी मी ठाणे स्टेशनवरुन कळव्यासाठी रिक्षा पकडणेच सोडुन दिले. (थोडक्यात शस्त्रे टाकली) आणि शेअर रिक्षाने कळवा नाक्यावर उतरुन पुढे चालत घरी जाऊ लागलो. पण या सर्व गोष्टिंचा खुप राग यायचाही. खुपदा भांडायचोही पण त्याचा काही फायदा होत नसे. ट्रॅफिक हवालदार जर असेल तर कधी कधी रिक्षा मिळायचीही. या सगळ्याची कुठेतरी तक्रार करता यावी असे वाटायचे. पण प्रत्येक वेळी जाऊन पोलिसात तक्रार करणे शक्य नसायचे. आणि मुळात पोलिसांच्या चक्करमध्ये कोण अडकणार हा विचारही मनात असायचा.

पण कालच घारुअण्णांनी एक नविन बातमी दिली आणि खुप बरे वाटले. त्यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे आपल्या विभागातील पोलिस स्टेशनमध्ये एक तक्रार पत्र मिळते. हे तक्रार पत्र एका पोस्ट कार्डासारखे आहे.

complaint_letter.jpg

यात सर्व माहीती भरुन तिकिट लाउन पोस्ट केले की त्या रिक्षावाल्यावर योग्य ती कारवाई केली जाते. आता हे सर्व किती फायदेशीर आहे याची मलाही कल्पना नाहीये. पण घारुअण्णांनुसार याचा फायदा हा होतोच. तेव्हा सर्वांनी अगदी मुक्त हस्ते ही कार्डे वापरा.

मला ही माहिती कालच मिळाली. ती जर तुम्हापर्यंत पोहोचवली तर त्याचा तुम्हा सर्वांस फायदा होईल असे वाटले म्हणुन इथे टाकली आहे. या बाबतीत तुम्हा सर्वांना खुप जाणुन घ्यायचे असल्यास मी घारुअण्णाच्या मदतीने तुमचे शंका समाधान करण्याचा प्रयत्न करीनच.

तो पर्यंत .... किप पोस्टींग...

विषय: 
प्रकार: 

अरे पण रात्री ठाणे स्टेशनावर रिक्शा स्टॅन्ड वर ट्रिफिक वाला नसतो का?
मी आलो होतो तेव्हा तरी होता रे तो. त्याच वेळी घारु अण्णानी सांगितलेल अस आठवतय की हा जर हवालदार नसेल तर सरळ पोलिस स्टेशनला फोन करायचा मग तो येतो अस.

अरे झकास... हे फक्त ठाणे स्टेशनवर घडते असे नव्हे रे.... सर्व ठाण्यात हीच परिस्थिती आहे... किंबहुना.... मुंबईतही रिक्षा आणि टॅक्सीने प्रवास करणार्‍या प्रत्येकाची आहे. शहरात प्रत्येक ठिकाणी, नाक्यावर गल्ल्यांमध्ये हवालदार असणे शक्य आहे का ???

७०% रिक्षावाले, मिळणारे भाडे फक्त जवळचे आहे म्हणुन नाकारतात.... आता ठाण्यातलेच म्हणशील तर गडकरी, मल्हार यासारख्या जवळील ठिकाणी यायला ते तयार होत नाहीत... तेच तु घोडबंदर रोड, उपवन, लोकमान्य नगर इथे जायचय असे सांग... रिक्षाच्या रांगा लागतील.....

छान माहिती.
अशी सोय पुण्यात सुद्धा उपलब्ध आहे का?

मी पण नुकताच हाच विचार करत होते अणि लॉगिन होउन विचारेन म्हटलं तर माझा काम Detroitkar नी केलय.. थँक्स..
पुणं काय आणि ठाणं काय सगळीकडे सारखच.. इथे पुण्यात तर रिक्षावाले थाम्बुन नाही म्हणण्याचे सुद्धा कष्ट घेत नाहीत....

प्रणती

हे प्रकरण खरंतर ५०-५० आहे कारण मला काही इतके वाईट रिक्षावाले भेटले की काय सांगु? आणि काही इतके चांगले भेटले की किती किती सांगु?

ब्रम्हदेवाचा बाप आला तरी पुण्यातल्या रिक्षानां शिस्त लागणार नाही. आणि गंमत म्हणजे स्वतःला समाजसेवक म्हणवणारेच या रिक्षावाल्यांच्या गुंडगिरीचे नेत्रुत्व करतात...........

पुण्यातले रिक्शा वाले भयंकर मुजोर आहेत. सन्ध्याकाळी ५ वाजता सुद्धा half return मागतात.

अरे वा नील, मस्त माहिती दिलीस तू.... आता ह्या पोस्ट कार्डांचा गठ्ठाच जवळ बाळगायला पाहिजे.

पुण्यातले रिक्षावाले, रात्रौ ९.३० ला विठ्ठलवाडी गावाबाहेर आहे म्हणून हाफ रिटर्न मागतात. Angry

*इन्द्र्सुत(अ)द्वितीय*
अगदी योग्य व उपयुक्त अशी माहिती दिली त्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद. भाडे नाकारणे, रिक्शा सुरक्षित व व्यवस्थित न चालवणे,
मीटर जलद पळणे ही तर सर्वाधिक चिन्तेची बाब आहे.
कोणतेही शहर याला अपवाद नाही.
पोलीसान्ची मदत घेणे हा उत्तम उपाय आहे.
भान्डण्यात आपला वेळ जातो व मानसिक त्रास तर खूपच होतो.
यान्ना शिस्तीचा धडा शिकवणारी यन्त्रणा असणे अत्यावश्यक आहे.

ठाण्यात या अनुषंगाने कारवाई होत असेल तर स्वागतार्ह आहेच. पुण्यात मात्र माझा अनुभव वेगळा आहे. रिक्षावाले यायला नाही म्हणताहेत किंवा मीटरपेक्षा जास्त पैसे मागताहेत हे मी वेळोवेळी ट्रॅफिक पोलिस्/इन्स्पेक्टरना सांगितलं आहे. इतकच काय मी पोलिस कंट्रोल रूमला फोनही करते. पण प्रतिसाद अतिशय वाईट असतो. मागच्याच आठवड्यात जेव्हा माझी रिक्शा गोल्फ क्लबच्या आसपास बंद पडली, दुसरा एकही रिक्शावाला खडकीबाजारला यायला तयार होत नव्हता (वेळ रात्री आठच्या आसपास) . कंट्रोल रूमला फोन केल्यावर त्यांनी मला सर्व रिक्शांचे नंबर लिहुन पोलिस आयुक्तांना पत्र लिहायला सांगितलं. वैतागुन चालत पुढच्या चौकातल्या ट्रॅफिक पोलिसला सांगितलं तर तो दुर्लक्ष करुन चक्क माझ्याकडे पाठ करुन उभा राहिला. आता बोला?? पुढचा अर्धा तास मी रिक्शा शोधत होते.

मागच्याच आठवड्यात पुण्यात गेलो होतो. नळ स्टॉप जवळ बसमधून उतरलो आणि लगेच रिक्षा पकडली. सिटी प्राईड, सातारा रोडला उतरताना त्याने भाडं काहिच्या काही सांगितलं म्हणुन टॅरिफ कार्ड मागितलं तर त्याने चक्क मला मुम्बईचं टॅरिफ कार्ड दाखवलं. मला हसावं का रडावं तेच कळेना. आता बोला.

विशाल कुलकर्णी.
नवी मुंबई.

वा... ठाणेकरांचा हेवा वाटला क्षणभर... अशी सुविधा पुण्यात सुरू होईल तेव्हा तो दिवस सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल....!!!!
मधे एकदा कोल्हापूरहून पुण्याला आले होते तेव्हा सकाळी ५.३० वाजता स्वारगेटहून दांडेकर पूलापर्यंत आल्यावर त्या रिक्षावाल्याने ९० रुपये मागितले... खोटे टेरीफ कार्ड दाखवले आणि वर आम्हालाच म्हणे, "कालच रिक्षांचे दर वाढलेत..."
असे एका दिवसात रिक्षांचे दर ३० - ४० रुपयांनी वाढत असतील तर एक रिक्षाच घ्यावी म्हणलं... कशाला करिअरसाठी वणवण करा...!!!!

Proud
******************************
__"()"
\__/ शुभ दिपावली !!!!!!!!!!!
दिसलीस तू, फुलले ॠतू

तेच तु घोडबंदर रोड, उपवन, लोकमान्य नगर इथे जायचय असे सांग... रिक्षाच्या रांगा लागतील.....
अत्यंत चुकीचे निरिक्षण आणि विधान.उलट संध्याकाळी साडेसहा नंतर वर उल्लेखीलेल्या कोणत्याही मार्गावर येण्यास एकही रिक्षावाला तयार होत नाहि.
पण यावेळी मला चक्क एक चांगला अनुभव देखिल आला.........
या वर्षी जुन ते सप्टेंबर या तीन महिन्यातला हा अनुभव आहे.
गणपती उत्सव सुरु झाल्यानंतर एक दिवस मी लेकीला घेउन खरेदीला बाहेर पडले.बरेच फिरलो .ब्राम्हण सोसायटीच्या गल्लीत रिक्षासाठी साधारण १ तास उभ्या राहिलो.इतक्यात पाऊस देखिल चांगलाच पडायला सुरुवात झाली होती .लेकीने रडुन आकांत करायचा बाकी होता आणि घरच्यांचे मोबाईलवर सतत फोन खणखणत होते.कंटाळुन मी प्रत्येक रिक्षावाल्याला शेलक्या शिव्या घालत होते .बर्‍याच वेळाने एक रि़क्षा येताना दिसली मी रिक्षाचालकाशी वाद घालण्याच्याच बेतात होते तितक्यात तो म्हणाला "ताई बसा".माझा माझ्याच कानांवर विश्वास बसेना.
रिक्षात बसल्या बसल्या लेकीने मांडिवर डोके टेकले.मी रि़क्षाचालकाशी बोलत होते त्याचे शब्द ऐकुन कुठेतरी माणुसकी शिल्लक आहे याचा प्रत्यय आला.मला म्हणाला "ताई आता तुम्ही वर्तक ऐवजी घोड्बंदरला चल असे जरी म्हणाला असतात तरी नेले असते.तुमच्या मुलीचा चेहरा बघुन माझ्याच काळजाच पाणी झाल."कॉलनीत फोहोचले आणि रिक्षा गॅस संपल्यामुळे बंद पडली.शेवटि बिचारा तिथेच रिक्षा ठेवुन बस ने घरी गेला आणि बहुदा दुसर्‍या दिवशी येवुन रिक्षा घेवुन गेला असेल कसा ते माहित नाहि.
जय हिंद!
जय महाराष्ट्र!

अनामिका,
अगं मी लिहिले आहे ते ठाणे स्टेशनवरिल रिक्षावाल्यांबद्दल... तेथील रिक्षा स्टँडवर पहिल्या तीन रांगा पाहशील तर ते फक्त लोकमान्य नगर, घोडबंदर रोड, उपवन इथलीच भाडी घेतात.... संध्याकाळनंतर तर तेथुन शेअर रिक्षाही सुरु करतात....

मुळात मुद्दा हा नाहीये कि रिक्षावाले घोडबंदर रोडला येतात कि नाही.... तर मुद्दा हा आहे की येणारा कोणताही प्रवासी कुठीही जाणारा असो... रिक्षावाल्यांनी त्याला नाही म्हणणे बरोबर नाही. कोण कधी कुठल्या अडचणीत असेल हे सांगता येत नाही....

त्यातुनही कोणा घोडबंदर रोड, उअवन, लोकमान्य नगर रहोवाश्यांना राग आला अस्ल्यास मी माफी मागतो....

वरील मुख्य लेखातील स्थानांचा केलेला उल्लेख हा केवळ उदाहरणासाठी केलेला आहे.... त्याचा वास्तवाशी संबंध असेलच असे नाही... असल्यास किंवा नसल्यास तो केवळ योगायोग समजावा.

अरे निल!
मला तसे म्हणायचेच नव्हते.
ठाणे स्टेशनचा अनुभव सध्या काही वर्षात घेतला नाही पण परिस्थिती वेगळी नसेलच याची खात्री आहे.
मागे कधी तरी एकदा मी ठाणे स्टेशन येथे रिक्षा साठी उभी असताना दुपारची वेळ होती त्यामुळे गर्दी कमी होती .तेंव्हा एका चालकाने येण्याची तयारी दर्शवली पण माझ्या कडे ४० रुपयाची मागणि केली मी त्याला आमच्या विभागात पर्यंत रिक्षा न्यायला लावली व सरळ वर्तकनगर पोलिस स्टेशन समोर रिक्षा थांबवुन त्याला हवालदाराच्या हाती दिले.माफी मागुन निघुन गेला .काही वेळेस असा मार्ग अवलंबुंन बघायला हरकत नाही.
जय हिंद!
जय महाराष्ट्र!