ब्रम्हदेवाची पृथ्वी

Submitted by सचिन पगारे on 16 March, 2013 - 00:21

आपली हजारो वर्षाची झोप पूर्ण करून ब्रह्मदेव नुकतेच उठले होते.ब्रह्मदेव जागे झाल्याची बातमी जशी त्रिलोकात पसरली, तसे त्यांना भेटायला देवगण हे ब्रह्मलोकात जमा झाले.जग बनवण्याच्या कामात अत्यंत श्रम पडल्याने त्यांनी हि हजारो वर्ष झोप घेतली होती.

सर्व देवांचे ब्रह्मलोकात स्वागत करून ब्रह्मदेवाने विचारले,”अरे शक्तिशाली देवानो तुम्ही चिंतेत दिसताय, त्याचे कारण काय?” यावर नारदमुनी म्हणाले, “ ब्रह्माजी, तुम्ही तुमचीं सुंदर रचना पृथ्वी बनवली आणि झोपायला गेलात .इथे त्रास मात्र आम्ही भोगतोय. यावर ब्रह्मदेव आश्चर्यचकित होऊन म्हणाले ‘कसला त्रास, मला काही कळेल का ?इतके झालय तरी काय.

यावर सर्व देवांच्या वतीने उत्तर द्यायला नारदमुनी उभे राहिले. “नारायण, नारायण”हा आपला प्रसिद्ध गजर करून ते म्हणाले “ब्रह्माजी, तुम्ही पृथ्वी बनवली. त्यावर सर्व प्रकारच्या सोयी केल्यात .परंतु, तुम्ही जो मानव नावाचा प्राणी बनवला त्याच्यामुळे आज सारे विश्व नाश पावण्याची शक्यता आहे.

यावर चकित होत ब्रम्हदेव म्हणाले,”मानव, अरे तो तर एक प्राणी आहे. जसा कुत्रा, डुक्कर तसा मानव.अरे हा प्राणी आम्ही माकडानंतर तयार केला. माकड तयार केल्यावर आम्हाला जाणवले ह्यात काहीतरी कमी आहे. म्हणून आम्ही त्याची सुधारित आवृत्ती काढली ती म्हणजे मानव.”

ब्रह्मदेवाचे बोलणे मधेच तोडत नारद म्हणाला, “ब्रह्माजी मानव बनवला पण तुम्ही एक चूक केली, त्याला बुद्धी दिली,कल्पनाशक्ती दिली. त्याच्या जोरावर त्याने आज सर्व प्राण्यांना गुलाम केलेय. तुम्हाला वाटत असेल तुम्ही सिंह हा सर्वात खतरनाक प्राणी तयार केला. त्या सिंहाला मानव नाचवतोय आज सर्कशीत.आज तो इतका बलाढ्य झालाय कि त्याची देवात पण दहशत आहे”.

ब्रह्मदेवाना हा धक्काच होता. नारद पुढे म्हणाले, “आज पृथ्वीवर धर्म धर्मात तुंबळ युद्ध होतायत. “पण नारदा, धर्म म्हणजे काय?यावर नारद म्हणाले,”तुम्ही फक्त मानव बनवला, पण त्याला बुद्धी देऊन चूक केलीत. ज्यांना जास्त बुद्धी मिळाली, त्यांनी त्यांचे वर्चस्व राखण्यासाठी स्वताचे गट तयार केले. धर्म तयार केले.जाती तयार केल्या.त्यांच्यात नेहमी तुंबळ युद्ध चालतात, पृथ्वीवर माणूस जन्माला येतो मानव म्हणून, पण मरतो हिंदू, मुस्लिम,ख्रिश्चन म्हणून”.

“अरे रे काय हि अधोगती, काय हा मूर्खपणा” ब्रह्मदेव हताशपणे उद्गारले.”इतकेच नाही तर ब्रह्मदेव आज पृथ्वीवर दंगे, धोपे,चोऱ्या-हाणामाऱ्या, बलात्कार ह्यांनी उच्छाद मांडला आहे.त्यात तुम्ही पूर्वी युद्धात शरण आलेल्या बऱ्याच असुरांना माफ करून मानवाचा जन्म दिलात. पृथ्वीवर आता त्यातले बरेच असुर राजकारणात गेलेत. दंगे घडवतायत,भ्रष्टाचार करतात.

यावर ब्रह्माजी कडाडले “काय, हि पृथ्वीची दशा!पृथ्वी माझी सुंदर निर्मिती! हा मानव नावाचा प्राणी बरबाद करतोय. पण देवानो तुम्ही इतके शक्तिशाली हे चालवूनच कसे घेतले?” ‘भगवान विष्णू, मी तुम्हाला विनंती करतो पूर्वी जसे तुम्ही दुष्टांच्या निर्मुलनासाठी जन्म घेतलेत, तसे परत एकाधा जन्म घ्या”.

यावर विष्णू म्हणाले “अहो ब्रह्माजी, जन्म घ्यायचा तर कुठल्या धर्मात घेऊ ते हि सांगा. हिंदुत घेतला तर मुस्लिम ऐकणार नाहीत. मुस्लिमांमध्ये घेतला तर हिंदू ऐकणार नाही. आणि हो हिंदुत घ्यायचा असेल तर कुठल्या जातीत घ्यायचा तेही सांगा. त्यांनी आपापसात सहा हजारावर जाती निर्माण करून ठेवल्यात. तिथे मानवाला नावापेक्षा आडनावाने ओळखले जाते. हे सर्व एकूण ब्रम्हदेव गडबडले व म्हणाले “जाऊ द्या, तो जन्म घ्यायचा प्लान आपण रद्द करू.

नारद म्हणाले,”पूर्वी हे मानव आपापसात भांडण करायचे. आता तर आमच्या मंदीरावरही हल्ले करतात, बॉम्बस्फोट करतात, असे हे पृथ्वीवरचे अनिश्चित जीवन झाले आहे काय करायचे ते बोला”.हे सर्व एकूण ब्रह्मदेव क्रोधीत झाले व गरजले “हि पृथ्वी, मी बनवली पण ह्या मानवाने तिची वाट लाऊन टाकली. आज मी ‘ब्रह्मदेव’ हि पृथ्वी नष्ट करून टाकत आहे.” असे म्हणून तोंडाने मंत्र पुटपुटून त्यांनी पृथ्वीच्या दिशेने ब्रम्हास्त्र फेकले.पण काय आश्चर्य. ब्रम्हास्त्राचे तुकडे तुकडे होऊन ते समुद्रात कोसळले.”अरे हे काय?” ब्रह्मदेवानी आश्चर्याने तोंडात बोटच घातले.

ह्यावर इतका वेळ गप्प बसलेले बजरंगबली म्हणाले, “ब्रह्माजी तुमचे ब्रम्हास्त्र, तर मानवाचे क्षेपणास्त्र”.’अहो आता आपल्या गदा, तलवारी, बाण, त्रिशूल ह्यांना कोणीही विचारात नाही. मानवाने इतकी घातक अस्त्रे बनवली आहेत कि दहा मिनटात सारी पृथ्वी जाळून खाक होईल.” यावर साऱ्या देवांत शांतता पसरली यावर काय उपाय करावा याचा ते विचार करू लागले.

इतक्यात भोळे सांब शंकर भगवान यांना एक युक्ती सुचली व त्या युक्तीवर अंमल केला गेला. त्याच रात्री ब्रह्मदेवाने मानवाची बुद्धी काढून घेतली. व त्या जागी माणुसकी हि भावना घातली.त्या नंतर पृथ्वीवर शांतता नंदू लागली. माणसे एकमेकांना धर्मधर्माने जातीने नव्हे तर माणूस म्हणून ओळखु लागली.

सर्व देशांनी आपापली अण्वस्त्रे नष्ट केली व आपली पृथ्वी हि सुंदर रचना वाचल्याबद्दल ब्रह्मदेवही आनंदित झाला.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सर्व देशांनी आपापली अण्वस्त्रे नष्ट केली व आपली पृथ्वी हि सुंदर रचना वाचल्याबद्दल ब्रह्मदेवही आनंदित झाला.

एका थोर हडकुळ्या म्हातार्‍याने हेच सांगितले होते, असे इथे लिहिले की त्या म्हातार्‍याला इथे सगळे शिव्या घालतात.

आणि तीच गोस्।ट ब्रह्मदेवाने सांगितली की लोकाना पचेल का?

मानवाने इतकी घातक अस्त्रे बनवली आहेत कि दहा मिनटात सारी पृथ्वी जाळून खाक होईल

अण्वस्त्रांच्या स्फोटाने पृथ्वी वाळलेल्या गवतासारखी भुरुभुरू जळू लागेल हा कल्पनाविलास झाला. प्रत्यक्षात असे काहीही होणार नाही. पृथ्वी आहे तशीच राहिल, फक्त इथला निसर्ग आणि मानवासहित इतर प्राणी नष्ट होतील. काही काळ लोटला की परत सगळ्याचा श्रीगणेशा होईल.

सर्व देशांनी आपापली अण्वस्त्रे नष्ट केली व आपली पृथ्वी हि सुंदर रचना वाचल्याबद्दल ब्रह्मदेवही आनंदित झाला.

ब्रम्हदेव खरंच असेल तर त्याला बरेच वाटेल. त्याची ही सध्याची रचना एकतर जुनीही झालीय आणि त्या रचनेतल्या काही घटकांनी इतर काही घटकांवर आक्रमणही केलेय, त्यामुळे सगळीच भेळ झालीय. त्याला ही सगळी भेळ नीट पुसून मिळाली तर काहीतरी नवनिर्मिती करण्याचा हुरूप येईल.

सर्व देशांनी आपापली अण्वस्त्रे नष्ट केली व आपली पृथ्वी हि सुंदर रचना वाचल्याबद्दल ब्रह्मदेवही आनंदित झाला.
<<< आस्चिग, गामा, कौशिक नगरकर (अजून कुणी वैज्ञानिक), अण्वस्त्रे नष्ट कशी करणार ?? नाहीतर त्या अण्वस्त्रांचा नाश करताना महास्फोट व्हायचा आणि पृथ्वीच काय पण सूर्यमालाच गायब व्हायची Light 1

हिंदुत घ्यायचा असेल तर कुठल्या जातीत घ्यायचा तेही सांगा. त्यांनी आपापसात सहा हजारावर जाती निर्माण करून ठेवल्यात. तिथे मानवाला नावापेक्षा आडनावाने ओळखले जाते.

>>>> त्यांना म्हणाव गोडबोले बापट ह्यांच्यात जन्म घ्या अन अमेरिकेला जा Proud

ब्रह्मदेवानी आश्चर्याने तोंडात बोटच घातले.

>>>> किती नंबरच्या ?

ब्रह्मदेवानी आश्चर्याने तोंडात बोटच घातले.

>>>> किती नंबरच्या ?

<<<

गिरीजा, तुम्हाला 'कोणाच्या' असे विचारायचे असावे

सचिन पगारे,

>> सर्व देशांनी आपापली अण्वस्त्रे नष्ट केली व आपली पृथ्वी हि सुंदर रचना वाचल्याबद्दल ब्रह्मदेवही आनंदित झाला.

आपल्या कथेचा शेवट जबरदस्त विनोदी आहे. Rofl

आ.न.,
-गा.पै.