"अपट्रेंड" स्टॉक मार्केट स्कूल!

Submitted by अपट्रेंड on 14 March, 2013 - 01:11

माझे ट्रेडिंगचे टेक्निक

अपट्रेंड म्हणजे काय ?

अपट्रेंड म्हणजे किंमतीचा स्तर जो आपाल्याला एका विशिष्ट कॉमोडिटीसाठी / स्क्रिप्टसाठी व एका विशिष्ट कालावधीसाठी बाजारातील प्रवृत्तींचा कल दाखवतो.

जर किंमत खालच्या बाजूने अपट्रेंड स्तर विश्वासाने ओलांडेल व खरेदीच्या मोडमधे तो पर्यंत राहील, जो पर्यंत किंमत अपट्रेंड स्तरावर आहे, तेव्हा आपण खरेदी करु शकतो. याच प्रमाणे आपण विक्री करु शकतो जो पर्यंत किंमत वरच्या बाजूने अपट्रेंड स्तर विश्वासाने खाली आहे तो पर्यंत आपण विक्री करु शकतो आणि तिथ पर्यंत थांबू शकतो.

निफ्टिच्या ट्रेडिंगसाठी सामान्यताः २०/२५ पॉइंट स्टॉपलॉसचा सल्ला दिला जातो, परंतु बॅंकनिफ्टीच्या ट्रेडिंगसाठी ६०/७० पॉइंट स्टॉपलॉसची शिफारस केली आहे.

दोन किंवा अधिक लॉटसचे ट्रेडिंग केले तर अपट्रेंड तंत्र अधिक लाभदायक आहे कारण त्यामुळे अंशत: नफ्याच्या बुकींगच्या सुविधांचा व ट्रेंडवर अवलंबून राहण्याचा लाभ मिळू शकतो. लाभाचे अंशत: नफ्याचे बुकिंग केल्यामुळेः
अगदी सोप्या रीतीने ट्रेंडवर अवलंबून राहता येते.
आपले पैसे पुन्हा व्यापारात गुंतविण्यासाठी मुक्त ठेवता येतात.
गुंतवलेल्या पौशांची सुरक्षा सोप्यारीतीने करता येते.

निफ्टिच्या ट्रेडिंगसाठी ४०/५० पॉइंटवर नफ्याचे बुकिंग केले पाहिजे व बॅंकेनिफ्टी ट्रेडिंगमध्ये किंमतीतील बदलानुसार ७०/८०पॉइंट वर नफ्याचे बुकिंग केले पाहिजे. एकदा नफा बुक केल्यानंतर स्टॉपलॉस खरेदीच्या किंमतीनुसार असला पाहिजे.

जास्त कालावधितील किंमतीतील बदल लक्षात घेऊन कमी कालावधीमधे ट्रेड घ्या.

प्रत्येक ट्रेड आत्मविश्वासाने व नुकसानीला न घाबरता करा. इतकेच नव्हे तर जर तुमचा कोणत्याही प्रकारचा स्टॉपलॉस, मार्केट उच्चतम ( गॅपअप ) वान्यूनतम ( गॅपडाऊन ) किंमतीवर ओपन झाल्यामुळे झाला तर त्याचा हसत मुखाने स्वीकार करा आणि पुढच्या ट्रेडमधे ते भरुन काढण्याचा प्रयत्न करा. परंतु हळूहळू आस्ते कदम. पुढच्या ट्रेडमधे ते एकाचवेळी भरुन काढण्याचा प्रयत्न करु नका.


दृढतेने पालन करावयाचे नियमः

१ वास्तविकत: ही सिस्टीम दीर्घकालीन ट्रेडिंगसाठी, विशेषत: फ्युचर ट्रेडिंग विभागासाठी आहे. पण अपट्रेंड स्तर नीट बघितल्यावर आपल्याला एका दिवसातील अस्थिरतेतील यशाचा आनंद घेता येतो.

२ अपट्रेंड स्तर रोज दिवसाच्या अखेरीस स्टॉक बंद होण्याच्या किमतीच्या आधारे मिळवता येतो व तो दुस-या दिवशी लागू केला जातो.

३ नेहमी खरेदीत प्रवेश करा जेव्हा किंमत खालच्या बाजूने वरच्या बाजूला अपट्रेंड स्तर पार करते आणि विकीत प्रवेश करा जेव्हा किंमत अपट्रेंड स्तरवर जाऊन खालच्या बाजूने पार करतो.

धावती ट्रेन पकडण्याचा कधीही प्रयत्न करु नका.

जर स्क्रिप्ट/किंमत अपट्रेंड स्तराच्या खूप वर गेली असेल किंवा खूप खाली गेली असेल, तर ट्रेडमधे प्रवेश करु नका कारण स्क्रिप्ट/किमंत केव्हाही कुठल्याही बाजूने परतू शकतो.

ट्रेडिंगमधे यश मिळवण्यासाठी अपट्रेंड स्तराची वाट बघणे योग्य असते. तरच संयमाचे फळ मिळेल…..

४ या सिस्टीम मधे खरेदीसाठी किंवा विक्रीसाठी ट्रेडमधे दीर्घ काळ राहणे आवश्यक असते.

५ जेव्हा किंमत अपट्रेंड लेव्हल कोणत्याही दिशेने पार करत असेल तेव्हा तुम्ही खरेदी व विक्रिची पोझिशन थांबवून त्याच्या विरुद्ध दिशेने ट्रेड करायची गरज असते, ज्यामुळे व्हिपसॉचे (अस्थिर बाजाराता ट्रेडिंगमधे पैसे घालविणे)परिणाम कमी करता येतात.

६ ट्रेडमधे अपट्रेंड स्तर पार केल्यानंतर प्रवेश केल्यावर जर किंमत अपेक्षेच्या विरुद्ध जात असेल आणि अपट्रेंड स्तर परत पार करत असेल तर ५/१० मिनिटे थांबणे आवश्यक असते आणि मग उलट स्थितीत यायचे असते. उदा: जर आपण खरेदीसाठी अपट्रेंडच्या ५३८४ स्तरावर ट्रेडमधे प्रवेश केला आणि जर किंमत ५३९५....५४०५....५४१५ प्रर्यंत जात असेल… जर आपण अंशताः किंवा पूर्णपणे याचा लाभ घेतला नाही आणि अचानक किंमत घसरायला लागली आणि अपट्रेंड ५३८४ स्तराच्या खाली गेली तर अशा परिस्थितीता ५/१० मिनिटे थांबणे आवश्यक असते आणि जर या वेळात किंमतीतील घसरण अधिक क्षमतेने चालूच राहिली तर आपल्याला खरेदीची स्थिती कमी करावी लागेल व अजिबात वेळ न लावता विक्रीत प्रवेश करावा लागेल कारण किंमत अपट्रेंड स्तराच्या खाली जाण्याची शक्यता असते.

अशा परिस्थितीत आपल्याला अनेक व्हिपसॉजना तोंड द्यावे लागते. परंतु काही काळ पूर्ण झाल्या नंतर जर तुम्ही तुमचा ट्रेड परिस्थिती नुसार बदलला तर व्हिपसॉचे परिणाम नाहीसे होतात आणि त्यातून तुम्हाला संपूर्णपणे जास्ती रिटर्नस् मिळू शकतात.

७ २…४…६…८…१० अशा लॉटसवर तुम्ही खरेदीची किंवा विक्रीची बाजू घ्यावी. अर्थात हे तुमच्या गुंतवणूक क्षमतेवर अवलंबून असते. जर लॉटस साईज खूपच मोठे असतील तर केवळ थोडयाच लॉटसची खरेदी/विक्री करावी म्हणजे M2M वर सहजपणे नियंत्रण मिळवता येईल. एका पेक्षा जास्ती लॉटसचे ट्रेडिंग करण्याचा सल्ला दिला जातो कारण नफा मधेच अंशत: बुक केला जाऊ शकतो. गुंतवलेल्या पैशाचे अपेक्षित रिटर्न मिळवण्यासाठी कमीत कमी दोन लॉटसनी ट्रेडिंग करायला पाहिजे.

८ आपाल्या गुंतवणूक क्षमतेच्या २५% एवढी गुंतावणूक M2M साठी किंवा इतर अचानक उद्भवणा-या घटनांसाठी बुक करुन ठेवायला पाहिजे.

९ नेहमी मार्केट उच्चतम किंवा न्यूनतम स्तरावर ओपन होईल तेव्हा अंशतः नफा बुक करुन ठेवा.

१० ट्रेडिंगमधे नव्याने प्रवेश करताना सर्व ट्रेड/मार्केट सुरु होण्यापूर्वी स्क्रिप्टसाठी अपट्रेंड स्तरावर नेहमी अलर्ट लावून ठेवा. म्हणजे जेव्हा जेव्हा किंमत अपट्रेंड स्तरापर्यंत येईल तेव्हा त्या विविक्षित स्क्रिप्टससाठी नवीन बाजू घ्यायला सोपे जाईल.

११ फक्त काही मोजक्या स्क्रिप्टसाठी ट्रेड करा कारण त्यामुळे त्यांची हाताळणी सोपी होते. उदाहरणार्थ दोन लॉटसने अ व ब स्क्रिप्टसाठी ट्रेड घेण्याचा सल्ला दिला जातो. एका लॉटने अ, ब, क, ड, ई व फ अशा स्क्रिप्टसाठी ट्रेड घेउ नका.

१२ नेहमी निवडलेल्या स्क्रिप्टशी जोडलेले रहा आणि एका स्क्रिप्ट पासून दुस-या स्क्रिप्टकडे सतत उडया मारु नका.

१३ उदाहरणार्थ निफ्टिच्या ४ लॉटस् वर व बॅंकनिफ्टिच्या ४ लॉटस् वर ट्रेड घ्या आणि याच्याच बरोबर ट्रेडिंगसाठी एक किंवा दोन स्क्रिप्टस् निवडा व विशिष्ट काळासाठी याच स्क्रिप्टशी ट्रेडिंगने जास्तीत जास्त वेळ जोडलेले राहा. अर्थात तुमच्या क्षमतेनुसार तुम्ही तुमच्या ट्रेडिंगचे लॉटस् कमी जास्त करु शकता.

१४ जर दोन किंवा अधिक लॉटस्चे ट्रेडिंग केले तर ट्रेडिंगचे हे तंत्र अधिक फायदेशीर आहे व अधिक लाभ देऊ शकते. अशा वेळी एका लॉटमधे अंशतः नफ्याचे बुकींग करायचे व दुसरा लॉट मार्केटच्या अखेरच्या ट्रेड पर्यंत ठेवायचा.

अधिक माहितीसाठी संपर्क करा
http://uptrained.blogspot.in/
श्री. राजेंद्र श्रीकृष्ण शिंदे
+९१ ९४०४०८१००० +९१ ९६०४०८१०००

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला हे कळत नाही जार तुम्ही मार्केट मधे एवढं कमवता तर मग पैसे कश्याला घेता.जर मराठी माणसाला मदतच करायची आहे तर फ्री मधे का करत नाही.

प्रिय भारत जी

प्रत्येक विद्यार्थाला विद्या शिकण्याकरिता शुल्क हे द्यावेच लागते हि परंपरा आहे आपली हे विसरून चालणार नाही आपणांस. तुम्ही बोलत असाल तर मी फ्री हि मदत करेन पण मला तुम्ही त्यावर काम करत आहात कि नाही हे बघण्याकरिता तुमच्या कॉनट्रकट नोट तुम्हाला मला दरोरोज दाखवाव्या लागतील. फ्री चे मोल किंवा त्याचा फायदा करून घेणारे कमी आहेत भारत जी.

मराठी माणसाने पैसे न घेताच व्यवसाय करावा काय ?
व्यवासाय उभा करताना लागलेले कष्ट, मेहनत, वेळ आणि सर्वात महत्वाचे म्हणजे कठिण प्रसन्गात (आर्थिक आणि मानसिक ) साम्भाळलेले मनोबल ह्या सर्वातुन आलेले ज्ञान म्हणजे 'व्यवसाय करण्याचि कला'. येवढे सगळे करुन आलेली अक्कल फुकट शिकवायची म्हणजे सगळे ज्ञान अक्कलखाती जमा !!!

राजेंद्रजी,
अनमोल माहितीबद्दल खुप धन्यवाद !
मी शेअरखान मध्ये खाते उघडले आहे, पण सुरुवात केली नाही, कुठुन करायची हेच कळत नाही.ट्रेनींग घ्यायच आहे.

आमच्या मते शेअरमार्केट मधे बहुसंख्य गमावतात व अत्यल्प कमावतात. शेअर गुंतवणुकदारांनी ८-१० वर्षांची सरासरी काढून किती कमावले हे काढावे.

प्रकाश जी,
आपल्या मताशी मी १००% सहमत आहे. फक्त मी असे तुम्हाला (सर्वांना) विचारेन कि, आपण सर्वांनी शेअरमार्केट मधे गुंतवणुक करतांना शास्त्रोक्त त्या शेअरचा अभ्यास केला का ? केला असेल तर किती दिवस अभ्यास केला ? केलेला अभ्यास आणि त्यावरून निघालेल्या निशकर्ष आणि त्यानुसार घेतलेल्या वेगवेगळ्या शेअर्स मधून किती फायदा झाला ? नाही झाला असेल तर आपले काय चुकले ? आपण अभ्यासात कुठे मागे पडलो ? खरोखरच आपण परिपूर्ण शिक्षण घेतले होते का ?

वरील सर्व प्रश्नाची उत्तरे आपणास नाही अशीच मिळतील ……!

या सर्वांमुळेच शेअरमार्केट मधे बहुसंख्य गमावतात व अत्यल्प कमावतात.

ग्राजूअशन पूर्ण केल्या शिवाय नोकरी मिळता नाही आणि ग्राजूअशन पूर्ण करण्या करिता १५ वर्षे आपण वाहतो , आय. टी. आय पूर्ण केल्याशिवाय वेल्डर किंवा डीझेल मेक्यानिक बनता येत नाही,
तर मग कष्टाने आणि घाम गाळून मिळवलेला पैसा शेअरमार्केट गुंतविण्यापूर्वी आपण त्याचे परिपूर्ण शिक्षण का पूर्ण करत नाही ? का घेत नाही ?
इथे शोर्टकट का मारायचा ?

ब्लोग पहा १९ फेब्रुवारीला पहिला ट्रेड घेतला आज ०१ जुलै पर्यंत एक लाख पेक्षा जास्त प्रोफित आहे नुकसान वजा करिता. शेअर बाजार वर जाओ अथवा खाली प्रोफीटमध्ये नेहमी असतो आम्ही.
http://uptrained.blogspot.in/p/blog-page_4.html लिन्क ला क्लिक करा.

मला तुम्हाला दुखवायचे नाही पण, ८ ते १० वर्षांची सरासरी काढून बघण्यापेक्षा आमचे रिटर्न्स रुपये ६००००/- गुंतवणुकीवर फक्त ५ महिन्यांत रुपये १०००००/- पेक्षा जास्त आहेत.

वरील रिटर्न्स आपल्याला हेच सुचित करतात कोणताही व्यवसाय सुरु करण्यापूर्वी त्याचे शास्त्रोक्त आणि सखोल शिक्षण घेतल्याशिवाय यशाची पायरी चढता येत नाही.

वरील रिटर्न्स आपल्याला हेच सुचित करतात कोणताही व्यवसाय सुरु करण्यापूर्वी त्याचे शास्त्रोक्त आणि सखोल शिक्षण घेतल्याशिवाय यशाची पायरी चढता येत नाही.

नमस्कार..

मी एका वर्ष पूर्वी lanco infra घेतलेयत @ रु २०.००. लॉस जास्त आहे.
कंपनी मध्ये positive न्यूस असून सुद्धा जास्त मोवेमेंत नसते.

या आगोदर माझ्याकडे godrej consumer प्रोदुच्त आणि jp associate होते.
आणि दोन्ही stock मध्ये चांगला नफा मिळवलेला.

मी stock market चा बसिक course पूर्ण केलाय.

आपल्या मताशी मी १००% सहमत आहे. फक्त मी असे तुम्हाला (सर्वांना) विचारेन कि, आपण सर्वांनी शेअरमार्केट मधे गुंतवणुक करतांना शास्त्रोक्त त्या शेअरचा अभ्यास केला का ? केला असेल तर किती दिवस अभ्यास केला ? केलेला अभ्यास आणि त्यावरून निघालेल्या निशकर्ष आणि त्यानुसार घेतलेल्या वेगवेगळ्या शेअर्स मधून किती फायदा झाला ? नाही झाला असेल तर आपले काय चुकले ? आपण अभ्यासात कुठे मागे पडलो ? खरोखरच आपण परिपूर्ण शिक्षण घेतले होते का ?>>>>>>>> +१
घाटपांडे साहेब, शेअर मार्केट मध्ये अ‍ॅक्टिवली गुंतवणूक करायला माहिती तर लागतेच पण संयम ही लागतो. काहीच माहिती नसताना किंवा अगदी कमी माहिती करुन घेऊन गुंतवणूक करणे म्हणजे सट्टा खेळण्या सारखेच आहे. शेअर मार्केटच काय इतर कुठल्याही गोष्टीत ज्यात पैसे गुंतवणे इन्वॉल्व्ड आहे त्याबद्दल आधी माहिती काढणे, अभ्यास करणे अनिवार्य आहे, नाही का?
तुम्ही एरवी भविष्य, होमियोपथी वगैरे विषयावर आवर्जून मतप्रदर्शन करता, थोडक्यात जिथे लोकांची फसवणूक होऊ शकते तिथे आवर्जून दुसरी बाजू मांडता म्हणून मनात एक शंका आली की शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करण्यात सुद्धा तुम्हाला फसवणूक वाटते का? सहज म्हणून विचारत आहे. मी बर्‍याच लोकांकडून हे ऐकलय.

हम्म. शास्त्रोक्त अभ्यास वगैरे करून ओळखीतले बरेच जण महिन्याला किमान २०-२५ हजार रुपये मिळवत आहेत. पण त्यांच्या डोक्यात कायम मार्केट बद्द्ल असणारे विचार बघितल्यावर असं वाटलं की, आपली (मानसिक) हट्टीकट्टी गरीबीच बरी. Wink

॒॒@ तुर्रमखान तुमच्या ओळखीच्या लोकांना अजून काही वर्ष पहा. नंतर त्यांना विचारा की सरासरी किती कमावले? बरेच लोक वाहवत जातात. अतिअल्प लोकांना खर्‍या अर्थाने कमावणे जमते. सामान्य माणसांचा तेवढा अभ्यास व क्षमता नसते. शिवाय रिस्क घेण्याची तयारी नसते. आता अभ्यासाचे म्हणाल तर तो कितीही केला तरी कमीच असतो. डुबला तर अभ्यास कमी पडला हे म्हणायला लोक असतातच.

इंटरेस्टींग !!

एकदा हे व्यवस्तित शिकायचे आहे आणि अ‍ॅक्टीव्ह ट्रेडर व्ह्यायचे आहे ... सध्या फक्त लॉन्गटर्म इन्व्हेस्टमेन्ट चालु आहे !

मुंबैत आलो की कॉन्टॅक्ट करेन ! Happy

@घाटपांडे साहेब: बरोबर आहे तुमचं. पण नुकसान होण्यासाठी क्षमता, आभ्यासाबरोबरच एक 'पिक्युलिअर' मानसिकता कारणीभूत आहे. ती म्हणजे जुगारी जो पर्यंत कफल्लक होत नाहीत तो पर्यंत अड्ड्यातून बाहेर पडत नाहीत. तद्वत, म्वाडरेट रीस्क घेउन थोडा फायदा झाला की लोक तेव्हडाच फायदा घेत बसण्याऐवजी जास्त रिस्क घेउन जास्त रक्कम लावतात. एकदा दणका बसला की मग या क्षेत्राला रामराम ठोकतात.

uptrend, blog post chya link var click kele tar 'you are not invited ' ase aahe what to do?

वरील विवेचन ऐकून गम्मत वाटते. शेअर मार्केट मध्ये अत्यल्प लोक कमावतात म्हणून सगळे मान्य करताहेत पण जे कमावतात (नशीब हो त्यांचे मेहनत करणारे...शिक्षण अपुरे पडले म्हणणारे वेगळे ते अपयशी)ते का कमावतात? कसे कमावतात ते हि पहावे.
आणि मराठी माणूस रडणे, निराशावादी असणे,नकारात्मक असणे कधी सोडणार ?
आणि बुडाला तर अभ्यास कमी पडला हे म्हणायला हे लोक असतातच........ह्यचा अर्थ काय ते समजले नाही कारण मुळात कुठल्याही धंद्याला लागणारी शिस्त, नियम, रणनीती लागतेच लागते.

दुष्काळ पडला म्हणून आत्महत्या करणार्यांनी शेती सोडावी का ? जर हो असेल तर रडणाऱ्या लोकांनी मार्केट मध्ये येऊच नये कुणीही त्यांना आमंत्रण देत नाहीये. आणि जर उत्तर नाही असेल तर वेलकम म्हणजे तुम्ही मेहनत घ्यायला तयार आहात.
तुमच्या आजूबाजूला चाललेले सगळे धंदे हे शेअर्बजरतून भांडवल उभे करून मोठे झाले आहेत म्हणजे जो धन्देवला आहे त्याला भांडवल बाजार हा कळलाच पाहिजे. आणि ज्यांना नाही कळत त्यांनी तिथे फिरकू नये.
चुकीचे निदान करून पेशंटला मारणारे लुटणारे डॉक्टर्सही समाजात आहेत म्हणून समस्त मेडीकल खराब म्हणणे जितके गैर तितकेच मार्केट मध्ये अभ्यास ना करता येणे आणि अपयश आल्यावर मार्केट किंवा इतर कुणी ह्यांच्यावर खापर फोडणेही गैरच.

हे माझे मत आहे. कुणी जर त्याच्याशी सहमत नसेल तर नसेल.....

शेअरमार्केट मधे बहुसंख्य गमावतात व अत्यल्प कमावतात.

असेल पन बहुसंख्य गमावनरे लव्कर कमवन्याच्य हेतुत लव्ब्कर मार्केटच भाहेर जातात. व नशीबाला दोश
देत बसतात. मग या क्षेत्राला रामराम ठोकतात. दीर्घ कालीन व्यवस्तीत गुंतवणूक केल्यास परतावा हि चांगला मिळतो .. बाजाराकडे पाहण्याचा द्रीष्टीकोन बदल्यास नक्कीच फायदा होईल .शेअरमार्केट मधे दीर्घ कालीन गुंतवणूक हि बँकेत मिळणाऱ्या ठेविवेरील परताव्या पेक्शा नक्कीच जास्त असेल . फक्त योग्य वेळ व योग्य स्क्रिप्ट निवडणे गरजेचे असते .

Aho bahrtji

tumhi jehanva shalet admission gheta tehnva sudha fee dilyashivay kohihi shikavat nahi

tee detat ch na tehnva ka nahi mahnat ki mala phukat shiva mahnun ,deta na paise

mulatch aaplya la koni phukat shikavave ase tumhala ka vatate ?

ani fukat kahi milale na ki tychi kimat shunya aste.

te aaplyal evdhe margdarshan kart aahet tyacha labh ghya na

me tar tya lekahkache dhnyvadacht mante

smita kane