Submitted by सांजसंध्या on 13 March, 2013 - 08:40
गर्वास झोडपावे, हा दोष ना कुणाचा
प्रशंसुनी स्वत:ला, घ्या रोष का कुणाचा
जे काम ज्यास येते, त्यानेच ते करावे
स्नायू फुगून मेले, हा जोश का कुणाचा
माझ्याच उल्लेखाने, भरल्यात या कविता
दिसते छबी स्वत:ची , आक्रोश हा कुणाचा
सांगून ना कळाले, शब्दांतले इशारे
नादान पोर आहे, बेहोश हा कुणाचा
शब्दांत शांत माझ्या, काव्यात ली झळाळी
सहजी उठून आली, हा दोष का कुणाचा
तरवार धार ज्यांची, स्नेह्यांसही दिसावी
घायाळ तेच व्हावे, हा दोष का कुणाचा
- संध्या
( एका ठिकाणी कवीता असा शब्द घ्यावा लागत होता. त्याऐवजी वृत्तभंगाचा दोष पत्करलेला आहे. )
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
(No subject)
छान!
छान!
जे काम ज्यास येते, त्यानेच ते
जे काम ज्यास येते, त्यानेच ते करावे >>>>
मीटर सांभाळून लिहीलेली गद्य ओळ वाटतेय. कसलीच नजाकत नाही, कसलंही काव्य नाही, कलाकुसर नाही. शांत रसासाठी हे आवश्यक असलं तरी इथे शांत रस दिसत नाही. ज्याला जमतं त्याने नक्कीच द्विपदी खुलवली पाहीजे हे वै.मत. (तुझ्याकडून अशा प्रकारची ही पहिली आणि शेवटची कविता असावी).
छान
छान!
छान!
सर्वांचे आभार.
सर्वांचे आभार.
Welcome back..
Welcome back..
सुरेख कविता. तुमच्याकडून
सुरेख कविता.
तुमच्याकडून अधिक कसदार कवितांच्या अपेक्षेत.
बागेश्री थँक्स अ
बागेश्री थँक्स अ लॉट!!
मुटेजी..
बाप्रे, माझ्याकडून अपेक्षा ! कधीतरी लिहील्या जातात कविता माझ्याकडून. तुमचे आशिर्वाद असू द्यात फक्त , आभार.
माझ्याच उल्लेखाने, भरल्यात या
माझ्याच उल्लेखाने, भरल्यात या कविता
दिसते छबी स्वत:ची , आक्रोश हा कुणाचा
आत्मपरीक्षण सर्व कवी मित्रांचे.
विक्रांत आभार आत्मपरीक्षण
विक्रांत आभार
आत्मपरीक्षण नाही रे. इतरांवर टीका करणा-या कवितेतही लिहीणा-यालाच आपले प्रतिबिंब दिसते असे काहीसे