निनावी

Submitted by रेव्यु on 12 March, 2013 - 00:49

थोडासा ओलावा , थोडीशी ओळख
थोडयाशा जुन्या पाऊल वाटांच्या
पुसट पण सुखद आठवणी
कधी तरी फक्त एकमेकांसाठीच
वेचलेले क्षण अन कधी धरलेला अबोला

याला नसे स्थलकालाचे बंधन
ना वयाची सीमा
मी जगतो याच शिदोरीवर
अन ठरतो एक खुळा
कालबाह्य एकाकी
पथिक , असहाय पांथस्थ

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुंदर पण अपूर्ण. कवितेतील जाणिवांसारखे

झीरो रिस्पॉन्सने हुरळून जाऊ नका. ते भाग्य माझ्याही वाट्याला आलेले आहे.
आपण कविता कराव्यात, बाकी काही आपल्या हातात नाही.

गंगाधर, अमेय , जाई, राजीव
यारों!!
ही फक्त ३० सेकंदात अवतीर्ण झाली होती एका हळव्या क्षणी

धन्यवाद सर्वांस

<<<<झीरो रिस्पॉन्सने हुरळून जाऊ नका. ते भाग्य माझ्याही वाट्याला आलेले आहे.
आपण कविता कराव्यात, बाकी काही आपल्या हातात नाही.>>>>>>

सहमत.
माझेकडे ताजे उदाहरण आहे.

मी ही गझल लिहून आंतरजालावर टाकल्यानंतर मायबोलीसकट सर्वच संकेतस्थळावर आणि माझ्या स्वतःच्या ब्लॉगवर सुद्धा जवळजवळ फ्लॉपच गेली. माझ्याच अन्य गझलांच्या तुलनेने ह्या गझलेला फारच कमी प्रतिसाद मिळालेत.

प्रतिसाद कमी मिळाले तरी या गझलेबद्दलचा माझा आत्मविश्वास मुळीच कमी झाला नाही. त्यामुळेच गझलनवाज श्री भिमरावजी पांचाळे यांच्या जन्मगावी गजल सागर प्रतिष्ठान तर्फे मोर्शी तालुक्यातील आष्टगाव (जि. अमरावती) येथे उभारलेल्या सुरेश भट गजलनगरीत दि. ९ आणि १० फेब्रुवारी २०१३ रोजी सातव्या अखिल भारतीय गजल संमेलनातील मुशायर्‍यात सादर करण्यासाठी मी याच गजलेची निवड केली.

आश्चर्याची बाब अशी की, सुमारे ४ ते ५ हजार प्रेक्षकांसमोर आणि शेकडो गझलकारांसमोर ही गझल सुप्परडुप्पर सुपरहीट ठरली. (चित्रफित येथे पाहता येईल.)

तात्पर्य एवढेच की, आंतरजालावरील प्रतिसादाच्या संख्येवरून रचनेचे भवितव्य आणि गुणात्मक दर्जा ठरविणे, धोकादायक ठरू शकते.