अबोल-ताना

Submitted by करकोचा on 10 March, 2013 - 11:06

तोंडे हलताना दिसताहेत त्यांची.
ते बोलत असावेत.
पोहोचत काही नाही,
दूरच्या रस्त्यावरील रहदारीच्या आवाजाप्रमाणे.
त्यांच्याकडे पाठ करून बसतो मेंदू.

दिसत असावे माझ्या डोळ्यांत
माझे तिथे असून नसणे.
ते आणखी खवळतात.
उडू लागते थुंकी तावातावाने बोलताना;
स्वत:ला चाबूक मारून
जणू घोडा स्वत:च्या तोंडास फेस आणतोय.

वादाला तोंड फुटल्यावर,
संवादातील सम सरल्यावर,
काय उरते बोलण्यासारखे?
त्यापेक्षा आळवावा एखादा सुंदर
मौनराग...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वादाला तोंड फुटल्यावर,
संवादातील सम सरल्यावर,
काय उरते बोलण्यासारखे?
त्यापेक्षा आळवावा एखादा सुंदर
मौनराग... >>>>>>>>>>> नक्कीच .... पण लक्षात कोण घेतो ????

चांगली रचना......