अद्भुत भाग 8

Submitted by Mandar Katre on 9 March, 2013 - 13:50

8

तुझ्याबरोबर आणखी कोण आहे?/

अॅन आहे

तो कोण आहे?

अर्धमानव

म्हणजे?

म्हणजे मानवी शरीराशी तंतोतंत जुळणारी तशीच यंत्रणा वापरुन कृत्रिम-रित्या बनवलेला रोबोट .फक्त दर आठवड्यातून एकदा त्याला रीचार्ज करावे लागते... आणि त्या रोबोमध्ये अॅलेक्स नावाच्या एका व्यक्तीचा आत्मा आहे ,जो 2057 साली मृत झाला होता.

तो कसा काय?

2187 मध्ये एक नवीन महत्त्वपूर्ण शोध लागला ज्याने मानवी जीवन आणि मृत्यू यांच्या परिभाषाच बदलून टाकल्या . या शोधामुळे ज्या मृत व्यक्तींचे आत्मे astral plane वर suspended animation या अवस्थेत आहेत, त्यांना रोबोटमध्ये implant करण्यात शास्त्रज्ञांना यश मिळाले.

अच्छा. म्हणजे हे भुतानी माणसांना झपाटण्या सारखेच दिसतेय...

नाही.अगदी तसेच काही नाही. पण पूर्वीच्या काळात दुष्ट आत्मे सामान्य माणसांना झपाटून त्रास द्यायचे ,पण आता तसे होत नाही. Astral plane वर आता कायदा आणि सुव्यवस्था आहे. गुंड आणि समाजविघातक दुष्ट प्रवृत्तीच्या आत्म्याना रोबॉट्स मध्ये प्रवेश नाकारला जातो.

अच्छा ,मग या अॅनला म्हणजेच अॅलेक्सला पूर्वीचे काही आठवते का?

हो. तो जीवंत असताना 2010 साली त्याने हिमालयात जावून साधना केलेली होती. रोहन देसाई नावच्या मित्राबरोबर त्याने एका तिबेटी मठात बुद्धिस्ट गुरूंकडून दीक्षा घेतली होती.

अच्छा ,म्हणजे आता अॅन आणि तुझे संबंध कशा प्रकारचे आहेत?

अॅन एक पुरुष रोबोट आहे आणि मी एक जीवंत स्त्री. पण तरीही आम्ही जोडीदाराप्रमाणेच राहतो.

म्हणजे नवरा-बायको?

हो.

आणि शारीरिक संबंध देखील?

त्यात काय विशेष?अॅन अन्य कोणत्याही जीवंत पुरुषा पेक्षा अधिक चांगल्या प्रकारे मला तृप्तिचे सुख देवू शकतो. फक्त त्याच्याकडून अपत्यप्राप्ती होऊ शकत नाही. त्यासाठी आम्हाला कृत्रिम fertility centre ची मदत घ्यावी लागते.

असे का?

कारण 21 व्या शतकाच्या उत्तरार्धात ढासळलेल्या पर्यावरण संतुलनाचा दुष्परिणाम , अन्नातील विषारी औषधांचा दुष्प्रभाव आणि सेक्सविषयीच्या लोकांच्या अतिविकृत संकल्पना ,तसेच अनियंत्रित सेक्स यामुळे मानवाची जनन-क्षमता कमी झालेली होती. यास्तव मग कृत्रिम-रीतीने स्त्रीबीज आणि पुरुषबीज यांचा संयोग मशिनद्वारे करून प्रयोगशाळेत मानव जन्माला घातले जावू लागले. ही सर्व बालके अतिशय सुनियंत्रित वातावरणात आणि आवश्यक ती सर्व पोषकद्रव्ये देवून ,रोगप्रतिकारक औषधे देवून वाढविली जातात. आणि बाळ एक वर्षाचे झाल्यानंतर आई किंवा बाबांच्या ताब्यात दिले जाते.

आई किंवा बाबा? का? कपल्स नाहीत का?

बरेच पुरुष व स्त्रिया अर्धमानवा सोबतच राहतात . काही तर पूर्ण यंत्रमानवा सोबतही! त्यामुळे आजकाल शुद्ध मानवी जोडी पाहायला मिळणे मुश्किलच आहे. नाही म्हणायला भारतात काही ठिकाणी अजूनही पूर्ण मानवी कपल्स आहेत. जे देवांची पूजा आणि देवळांची व्यवस्था वगैरे पाहतात !

क्रमश :

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हा भाग जरा जास्तच उशिरा आल्याने मागील सगळे विसरुन मातीमोल झाल्यासारखे वाटतेय. ही कथा पुर्ण लिहुन झाल्यावर एकाच जागी पोस्ट करा. जेणेकरुन सगल वाचता येईल.
पु.ले.शु.