Suicide note (आत्महत्या पत्र)

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 8 March, 2013 - 11:47

वयाच्या अठराव्या वर्षी
तिला मरावास वाटलं
गळफास लावून
त्याचं कारणही
तसच काही असावं
अस मला वाटत होत.
पण ती चुरगळलेली चिट्ठी
कुठल्यातरी अमानिक आवेगाने
अन मृत्यूच्या ओढीने लिहलेली .
जेव्हा समोर उलगडली,
तेव्हा समोर होते
ते बालिश तर्कहीन
अव्यवहारी विचार .
हट्टाला पेटलेले
आंधळे झालेले
एखाद्या प्रेषिता सारखे
ठाम गंभीरपणे लिहलेले.
साऱ्या जगाला नाकारून
विजयाची द्वाही पिटणारे.
छे ! छे !!
मरण्यासारख त्यात
नक्कीच काही नव्हत
तरीही मरणाची वकीली करणारे
हे विचार ?
खरच तिचेच असतील का ?
का मरतांनाही
तिने फसविले असेल
स्वत:ला आणि जगालाही
ती कल्पनिक परिस्थिती,
ती हताशा,ती चीड
जगाबद्दलची उदासीनता
आणि त्यासाठी असणार कारण,
न पटणार .
ते एक न सुटणार कोड होत
कारण काहीही असेल
ती चिट्ठी हि कदाचित
तिला लिहता आली नसेल
पण ज्या तुच्छतेने
ती गेली जीवन फेकून
या जगाच्या तोंडावर
त्याची एक जखम
माझ्या आत
खोलवर जावून
मला आहे सतत रुतत
अस्वस्थ करत.

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

Group content visibility: 
Public - accessible to all site users

पण ज्या तुच्छतेने
ती गेली जीवन फेकून
या जगाच्या तोंडावर
त्याची एक जखम
माझ्या आत
खोलवर जावून
मला आहे सतत रुतत
अस्वस्थ करत.

Sad सुंदर ,एका दुखर्‍या अर्थाने.

विक्रांतजी
तुमची ही बहुधा पहिलीच कविता वाचली असेन. पण अनेक कवितांवरचे तुमचे प्रतिसाद मला लक्षवेधी वाटले. या कवितेबद्दल बोलायचं झालं तर भाव छान व्यक्त केलेत शब्दांत. क्षमा असावी, पण थोडी आटोपशीर असायला हवी होती हे वै.म. Happy

तुम्ही जनरल हॉस्पिटलमध्ये कार्यरत असल्यामुळे अश्या प्रसंगांना नेहमीच सामोरं जावं लागत असेल. पण डॉक्टरही माणूसच असतो त्यामुळे ह्या घटना मनामध्ये रेंगाळतच असतील.

थेट भिडलीये
जे सांगायचय अगदी परफेक्ट कळतय
कवितेला दाद देतेय मस्त
त्यातल्या विचार मांडण्याच्या पद्धतीला दाद देतेय मस्त!
पण कविता वाचुन सुन्न होईला झालच Sad
इथेच कविता जिंकली म्हणायचं का?

ती चिट्ठी हि कदाचित
तिला लिहता आली नसेल
पण ज्या तुच्छतेने
ती गेली जीवन फेकून
या जगाच्या तोंडावर
त्याची एक जखम
माझ्या आत
खोलवर जावून
मला आहे सतत रुतत
अस्वस्थ करत.....

.
.
.
व्वा... अस्वस्थता नेमकी व्यक्त झालिय.

इतकी वैश्विक पातळीवरची जाणीव स्वत:त सामावून राहिलेली मराठी कविता किती साधेपणाने सहजपणाने लिहिलीत विक्रांतजी ...............

खूप आवडली

एक शेर आठवला ...........बेफीजींचाय

पोकळी आहे म्हणे हे विश्व सारे
ही अवस्था एकट्या माझीच नाही
...................~बेफिकीर

<<<पण थोडी आटोपशीर असायला हवी होती>>>विस्मयाजी ,खर आहे ,पण कवितेला कथेची पार्श्वभूमी असेल तर ते खूप अवघड होते .धन्यवाद .
<<<जनरल हॉस्पिटलमध्ये कार्यरत>>>> अश्विनीजी ,काय सांगु,,काल हि कविता पूर्ण केली आणि आज १० वर्षाच्या चिमुरडी hanginig ची ..प्रचंड सुन्न झालो. पेपर वर्क करतांना चुकत होतो .असो.............ही अवस्था एकट्या माझीच नाही ...................~बेफिकीर

शशांक,अमेय,वैभव,शोभाजी,रियाजी,जयाश्रीजी,कैलासजी,उमेशजी,राजीवजी,साऱ्यांना धन्यवाद .