Help on Dubai tour

Submitted by यक्ष on 6 March, 2013 - 07:34

सुप्रभातम

कुणी दुबईमधिल मायबोलिकर बंधु आहे का इथे?

मला माझ्या आई-वडिलन्नां फिरावयास घेवून जायचे आहे. त्यांच्या वयोमानानुसार शांतपणे करावयाची इच्छा आहे.
बजेट हॉटेल, सोयिचे ठिकाण, शुद्ध शाकाहारी जेवण ह्याबद्दल कुणी माहिती देउ शकेल काय?

त्यांची पहिलीच विदेश वारि, म्हणुन काहि सुचना असल्यास खूपच मदत होइल.

सुमारे ५ दिवसाचे प्लान करावयाचे योजत आहे.

आपल्या अमुल्य सूचनांच्या प्रति़क्षेत आहे.

यक्ष

Group content visibility: 
Public - accessible to all site users

यक्ष, कृपया धागा सार्वजनिक करा. माहिती देऊ शकणारे लोक जर ह्या ग्रूपचे सदस्य नसतील तर तुमचा प्रश्न त्यांच्यापर्यंत पोचणार नाही Happy

टुर प्लानर असतात त्यांच्या कडून प्याकेज टुर प्लान करून घ्या. सगळ्यात बेस्ट. तुमच्या बजेट नुसार प्लान करून देतील

धन्यवाद अगो!
केला!!

सुजा
टूर प्लानरचे डोक्यात आहे, पण मला वाटते कि इथेच मला ज्यास्त चांग्ली माहिती मिळेल.
ट्रव्हल कंपनी मुद्दाम बाजूला ठेवली कारण पळापळ होइल असे वाट्ते
धन्यवाद!

एअरलाईन कंपन्यांचे पण पॅकेजेस चांगले मिळू शकतील, दुबईची टूर अगदी निवांतपणे करता येईल, सगळीकडे चांगल्या सोई आहेत. शाकाहारी जेवणदेखील सहज आणि उत्तम मिळते. तिकिट आणि विसा आपण केलं आणि तिथे आल्यावर लोकल टूर ऑपरेटर कडून व्यवस्था करुन घेतली/ किंवा ज्या हॉटेलमधे उतरला आहात त्या हॉटेलमधूनही ही सोय करुन दिली जाईल.

जून, जुलै, ऑगस्ट हे तीन महिने सोडले तर वर्षभर दुबईला टूरिस्ट सिजन चालूच असतो. कायम कुठले न कुठले फेस्टिवल चालू असतोच.

दुबई हे एक अतिशय उत्तम आदरातिथ्य करणारे महानगर आहे. निर्धास्त मनानी जा. सध्या मी दुबईत नाही तरिही काही मदत हवी असेल तर मला निरोप टाका, मी जरुर शक्य ती मदत करेन.

दुबई टूर मधे बहुतेक सिटी टुर ( दुबै मॉल, बुर्ज अल अरब, बुर्ज खलिफा, दुबई मॉस्क, दुबै म्युझिअम पाल्म बिच आयलन्ड ई.) इ, दुबई क्रिक वर बोट राईड (क्रुझ राईड म्हटले तरी ती तशी बोट राईडच) आणि डेझर्ट सफारी/ बेली डांस इन्क्लुडेड असते. याशिवाय अबुधाबीला गेलात तर ग्रँड मॉस्क, फेरारी पार्क, मरिना बिच बघता येईल.
टुर प्लॅनर कडे गेलात तर तुमच्या बजेट आणि गरजे नुसार टुर प्लॅन करता येईल. उदा. आईवडीलांचे वय बघता डेझर्ट सफारी कमी करता येईल त्या ऐवजी दुबई मॉल मधे स्नो वर्ल्ड अनुभवता येइल, बजेट असेल तर बुर्ज अल अरब मधे ब्रेकफास्ट/लंच्/डीनर यापैकी काही अनुभवता येईल,
दुबई तसे सगळे आर्टिफिशिअली बिल्ड केले असल्याने शॉपींग मॉल आणि मोठाल्या सुंदर बिल्डीग्ज यापलिकडे खास काही नाही. मात्र गोल्ड सुक च्या बाजुला स्पाईस सुक सारख्या काही जागा चांगल्या आहेत.
बर दुबईत शकाहरी भारतीय रेस्टोरंट्स असावीत.

यक्ष,
दुबईचा व्हीसा भारतात सहज होतो, पण एअरपोर्ट्वर आयरीस स्कॅन ( डोळ्यांचा फोटो ) द्यावा लागतो. तेच काढतात. बाकी भाषेचा वगैरे प्रश्न येत नाही.
पण कधी जाणार आहात ? आता तिथला उन्हाळा सुरु होईल. त्यावेळी बाहेर फिरणे सुखाचे होत नाही.
दिवाळी दरम्यान हवामान सुखद असते.
तिथे गेल्यावर हॉटेल्स टुअर अरेंज करुन देतात. दुबई सिटी टुअर, डेझर्ट सफारी ( यासाठी फिटनेस हवा ) वादी बॅशिंग, मॉल्स वगैरे बघता येतात. बसेस स्वस्त आहेत. मेट्रो पण आहे. टॅक्सीज थोड्या महाग आहेत. देवळाचा परीसर वगैरे पायी पायी देखील फिरता येईल. साड्या / कपडे / सुका मेवा वगैरेंची दुकाने तिथेच आहेत. जेवण्याचा प्रश्न येत नाही. शाकाहारी हॉटेल्स सर्वत्र आहेत.
त्यांचे शोपिंग फेस्टीव्हल्स वगैरे सुरु असतात त्यावेळी पॅकेजेस स्वस्त पडतात.

यक्ष येणार असलात तर मार्चपर्यंतच या, कारण नंतर उन्हाळा खुप वाढेल. प्लेजर ट्रिप डीसेंबर ते फेब्रुवारी पर्यंतच होते खरंतर. पण अजुन उशिर करु नका.

श्यामलीजी
आपल्या सल्ल्याप्रमाणे करावयाचे ठरवले आहे.स्पाइसजेट स्वस्त आहे तरीपण आरामदायक म्हणून एमिरेटस करतो आहे. ऑनलाइन टूरिस्ट व्हिसा काढण्याचा प्रयोग करून बघतो. एक मनीषाज किचन म्हणून छान धागाही मिळाला आहे. तिथे खास महाराष्ट्रीयन मेन्यू आहे.
इतरही बूकिन्ग साठी पण छान धागे सापड्ले आहेत.निवांतपणे करिन म्हणतो!बाकि एक ल़क्षात आले कि प्रवासी कंपन्या किती उरकण्याचा कार्यक्रम करतात ते!

पाटीलजी
आपल्या सल्ल्याप्रमाणे डेझर्ट सफारी कमी केली. धन्यवाद!बुर्ज अल अरब मधे ब्रेकफास्ट साधारणतः केवढ्यास पड्तो? (बघू ! हिम्मत करून पाहतो!!)
आपले .."....शॉपींग मॉल आणि मोठाल्या सुंदर बिल्डीग्ज यापलिकडे खास काही नाही.." हे वाक्य विचार करण्यास बाध्य करतात.(दुबैपेक्षा थायलंड बरे?!)

दिनेशदा
मार्चमध्येच जातो आहे!
दुबई सिटी टुअर की बीग बस? हॉप ऑन हॉप ऑफ?
'देवळाचा परीसर...'? कुठे आहे? जरा तपशिल द्याल का?

आपणा सर्वांन्ना धन्यवाद!

आपले .."....शॉपींग मॉल आणि मोठाल्या सुंदर बिल्डीग्ज यापलिकडे खास काही नाही.." हे वाक्य विचार करण्यास बाध्य करतात.(दुबैपेक्षा थायलंड बरे?!) > यक्ष, तुम्ही आई वडीलांना पहिल्यांदाच परदेशाची ट्रीप करत असाल तर सिंगापूर किंवा थायलंडलाच जा. दुबई छान आहे. पण पहिल्या परदेशी ट्रीप साठी नाही. सिंगापूर त्यांना खूप आवडेल आणि पहीला परदेश प्रवास मेमोरेबल होइल. मग नंतर कधीतरी दुबई दाखवा.

अर्रे याSSSSर!
आता पुन्हा विचारांन्ना खो बसला!
सिंगापूर किंवा थायलंडलाच जा.?? बरं पुन्हा रिसर्च करतो!
मला काळ्जी फक्त एवढीच आहे की माझी आई थायलंडला जेवण घेइन की नाही? तिथे रस्त्यावरचे पदार्थ बघून कसेसेंच होते. अर्थात आपण खात नाही पण नुस्ते बघूनच ....! असो ती त्यांची पद्ध्त आहे!
बघुया!

पाटील म्हणतात ते खरे आहे, दुबई मधे शॉपींग साठी जावे फक्त. डेझर्ट सफारी हा युनिक अनुभव आहे पण वय जास्त असेल तर नको.

थायलंड(बँकॉक), सिंगापूर मधे काही ठरावीक भागात भरपूर भारतीय उपहारगृहे आहेत. त्या भागात तुम्ही राहिलात तर अगदी रोज वेगळ्या ठिकाणी भारतीय जेवण जेऊ शकाल इतका चॉइस असतो.
(तिथे जायचे ठरल्यास सांगा मी माहिती देऊ शकीन.)

दुबई व मस्कतला भावा व बहिणीकडे ३ व ८ अनुक्रमे जायचं आहे. व्हिसासाठी काय करावं लागत?

आमचा टुरिष्ट व्हिसा होता.

मि 'स्पाइस ' ने गेलो होतो त्यामुळे 'कुओनि' कंपनीतर्फे काढ्ला होता.

'ऐमिरेट्स ने गेल्यास तेच काढून देतात. २ दिवसात मिळतो.

त्यामुळे पहिले 'एअरलाइन' ठरवा मग व्हिसा प्रोसेस करा. बाकी 'गूगल महाराज' झिंदाबाद!

ऐमिरेटस महाग आहे का? दुबईच्या व्हिसासाठी नाही पण मस्कतच्या विसासाठी प्रॉब्लेम आहे घरी उतरायच आहे ना म्हणून