स्वरांची गाडी(बालकविता)

Submitted by राजीव मासरूळकर on 6 March, 2013 - 07:11

स्वरांची गाडी

अ अ अजगर, आ आगगाडी
सहलीला नेऊया स्वरांची गाडी !

इ इ इजार , ई इडलिंबू
पिंपळाच्या झाडाखाली डबे खाण्या थांबू !

उ उ उखळ , ऊ ऊस गोड
बागेमध्ये खेळु, करु थोडी घोडदौड !

ए ए एडका, ऐ ऐरावत
पाखरांना दाणे टाकु, हरिणांना गवत !

ओ ओ ओठ, औ औ औषध
फुलांसंगे डोलु, फुलांतले वेचु मध !

अं आनंदाने अः गाऊ नाचू
स्वरांच्या या गाडीतुन सुखे घरी पोचू !

- राजीव मासरूळकर

Group content visibility: 
Public - accessible to all site users