अजून

Submitted by -शाम on 6 March, 2013 - 02:27

अजून नाही श्वासांवरती
वार्‍याने कर लागू केला
अजून नाही आभाळाने
पाउस निर्यातीला नेला

अजून पृथ्वी फिरते आहे
सूर्यसुधा नियमाने येतो
अजून छाती धडधड करते
अजून आत्मा ग्वाही देतो

अजून उठते एखादी कळ
अजून रक्त सळाळुन येते
अजून खपलीमागे कोणी
घाव आठवुन जखमी होते

अजून पुरते गुलाम कोठे?
इतकी नाही जुलमी सत्ता
अजून आशा स्वातंत्र्याची
येइल! येइल! येता येता

..............................................शाम

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अजून उठते एखादी कळ
अजून रक्त सळाळुन येते
अजून खपलीमागे कोणी
घाव आठवुन जखमी होते

आह! विदिर्ण करुन गेल्या या ओळी

सगळी कविताच मनाचा तळ गाठणारी.

धन्यवाद!

अतीशय सुरेख
खूप खूप आवडली

मी शेवटची ओळ वैयक्तिक वाचनाकरिता अशी बदलून वाचली ............

येईल !...येईल!!. ..अत्ता !.. अत्ता !!

(बदलाची गरज/सूचना /विनती /आग्रह इत्यादी काहीही म्हणत नाहीये कृ गै न शामजी :))

अजून पृथ्वी फिरते आहे
सूर्यसुधा नियमाने येतो
अजून छाती धडधड करते
अजून आत्मा ग्वाही देतो

व्वा. सहजता भावली.

सुंदर !!