आयटी कंपनी मधील कामाची माहिती हवी होती

Submitted by Prajakta C. Kulkarni on 5 March, 2013 - 00:24

मोठ्या आणि मध्यम software / IT कंपन्यांमधुन कोणत्या प्रकारची , लहान मोठ्या स्वरुपाची कामे बाहेर करण्यासाठी दिली जातात का? या बद्दल सखोल माहिती हवी होती.
माझे MCS झाले आहे , म्हणजे काही कामे मला देखिल करता येतील.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्राजक्ता, मोठ्या software / IT कंपन्यांमधुन शक्यतो कामे बाहेर दिली जात नाही. मुबलक मनुश्यबळ असल्या मुळे ती गरज कंपनीतच भागते. नवीन प्रकारच्या स्किल्स ची गरज भासल्यास त्याचे प्रशिक्षण उपलब्ध कर्मचार्यांना दिले जाते. अगदीच अपवादात्मक परीस्थीत ते बाहेर दिले जाते (खुप निश स्किल्स ची गरज असल्यास) पण त्यासाठी वयक्तीक पातळीवर न देता दुसर्या रजिस्टर्ड कंपनीलाच दिले जाते.

पण जर कमी किमतीत तेच काम होत असेल तर ,तरीसुद्धा हे काम मिळु शकत नाही का?
मोठ्या कंपन्यांचे ठीक आहे ,पण लहान / मध्यम कंपन्यामधुन काही कामे बाहेर दिली जात असतील ना ,किंवा mechanical कंपन्यांमधुन ज्याप्रकारे job बाहेर करायला दिले जातात तसे software कंपन्यामधुन काही कामे बाहेर दिली जातात का? का देतच नाहीत ? एखाद्या फ्रेशर संगणक अभियंत्याला कोणत्या प्रकारची कामे लहान कंपन्यामधुन मिळु शकतील?

मी पुण्यात मोठ्या कंपनीत असल्याने माझा अनुभव सांगितला. लहान, मध्यम कंपनीचे मला नेमके माहीत नाही. माझा सल्ला: १) स्वतःची एखाधी कंपनी रजिस्टर्ड करावी आणि त्या कंपनी द्वारे इतर कंपन्यांना अ‍ॅप्रोच करावे किंवा २) आजकाल फ्री-लान्स चे काम देउ करणार्या बर्याच वेब्-साइट्स आहेत त्याद्वारे काम मिळु शकेल

सॉफ्टवेअरचे माहित नाही, पण "मेकॅनिकल" कंपन्या म्हणजे प्रॉडक्शन्/मॅन्युगॅक्चरिंग अभिप्रेत असेल तर तेही असे कुठलेच काम वैयक्तिक स्वरूपामधे शक्यतो बाहेर देत नाहीत. त्यांना लागणार्‍या सेवासुविधांसाठी ते दुसरी रजिस्टर्ड कंपनीच निवडतात, त्यासाठी अर्थात टेंडर अथवा दुसरी कुठली पद्धत वापरली जाते. जेव्हा एखाद्यावेळेला अनुभवी आणि ठराविक कौशल्य असलेल्या व्यक्तीच हव्या असतात तेव्हा त्यांना कन्सल्टंट म्हणून काम दिले जाते. अर्थात त्यासाठी तितका अनुभव आणि कौशल्ये असावी लागतात.

फ्रीलान्सिंग करायचे असल्यास, तुमचे जे कुठले क्षेत्र आहे त्यासंदर्भामधे गूगल करून बघा, काही फ्रीलान्सिंग वेबसाईट्स आणि कंपन्या असतात तिथे तुम्हाला काम मिळू शकेल.

धन्यवाद . माझ्या शंकांचे निरसन केल्याबद्दल
मला अनुभव काहीच नाही. मी फ्रेशर आहे. .मी आता freelancing चे बघते, तरीपण माझा एक प्रश्न आहे
एखाद्या फ्रेशर संगणक अभियंत्याला कोणत्या प्रकारची कामे लहान कंपन्यामधुन मिळु शकतील?

धन्यवाद ..
free lancing म्हणजे नक्की काय ? कामाची काय पद्ध्त आहे,
मला थोडीफार माहिति आहे.पण अजुन माहिती हवी आहे
त्याचा अनुभव पुढे धरतात का?

www.guru.com वर जगभरची फ्रीलान्सिंगची कामे मिळतील पण लोक काम देताना अनुभव बघतील त्यामुळे कुठेतरी काही दिवस काम करण्याचा अनुभव घेणे चांगले.

नोकरी करुन आधी थोडा अनुभव गाठीशी बांधावा आणि मगच स्वतंत्र काम वगैरे करायचा विचार करावा.... असा माझा आपला फुकटचा सल्ला!