अनुप्रासातील एक प्रयत्न : कसे

Submitted by अनिल आठलेकर on 4 March, 2013 - 16:38

कशास कपटी कारस्थाने
कुणी करावी..?
काळानेही कुरघोडीची
कृती करावी....?

काट्यांनी का काट्यांची
कळ काढावी....?
कशास कुजकी काळोखाची
कीड काढावी...?

कुरकुर करती कोण करंटे
कसे कळावे?
कोण कुणाला कसे कोसते
कसे कळावे...?

कपोलकल्पित कविकल्पना
कशा कळाव्या.....?
काव्यामधल्या कथा कुणाच्या
कशा कळाव्या....?

__अनिल आठलेकर...

१४ फेब्रुवारी २०१३ , पुणे

Group content visibility: 
Public - accessible to all site users