माझाही सरप्राईज बॉक्स

Submitted by पियू on 4 March, 2013 - 08:42

याची प्रेरणा, कल्पनाश्रेय इत्यादी : http://www.maayboli.com/node/35668

हे खरे तर १४ फेब (व्हॅ डे) साठी नवर्‍याला देण्यासाठी बनवत होते. पण नवर्‍यापासून लपून-छपून बनवतांना ते १४च्या आत पूर्ण झालेच नाही. मग काल ३ मार्च ला त्याच्या वाढदिवसानिमित्त दिले. फक्त निवडलेले फोटो बदलावे लागले. आधी व्हॅ डे ला आमच्या दोघांचे फोटो लावून देणार होते, पण वादि निमित्त दिल्याने फक्त त्याचे फोटो लावावे लागले Uhoh

बंद असतांना..

उघडल्यावर..

नवर्‍याचे लहानपणीचे फोटो एकत्र करुन अल्बम बनवला होता..

दुसरा लेयरः

तिसरा लेयरः

अल्टिमेटली हे असे दिसत होते..

मूळ पाकृ Happy मध्ये केलेले बदल..

१. ३ १/२ X ३ १/२ हा आकार मला फोटोंसाठी खुप लहान वाटत होता.. म्हणुन मी ३ इंच, ४ इंच आणि ५ इंचाचे लेयर्स केले.

२. मूळ अल्बम फारच छान सजवला आहे. पण मी एवढा सजवला असता तर फोटो दिसले नसते. म्हणून फ्रेम आणि त्यावरचे डिझाईन याखेरीज अजुन सजावट (फ्रेम ला) केली नाही.

३. बॉक्सचे झाकण अर्धवट न बनवता पूर्ण बॉक्ससाठी बनवले जेणेकरुन वरुन बघतांना आत काय असेल याचा अजिबात अंदाज येणार नाही.

त.टी. हे फोटो मूळ लेखाखाली दिले असते तरी चालले असते याची कल्पना आहे पण मी आयुष्यात पहील्यांदाच असे काही बनवले असल्याने नवीन धागा उघडायचा मोह आवरला नाही.

लेखात प्रचि टाकण्यासाठी मार्गदर्शन केल्याबद्दल विशेष आभारः उदयन

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खुप मस्त. असे स्वतःच्या हाताने बनवून दिलेल्या गिफ्ट्ची मजा काही वेगळीच असते. नाही का?

सगळ्यांचे खुप खुप आभार...

सस्मित, सामी आणि झंपी: कसा केला/ मूळ पा़कृ लेखाच्या पहिल्याच ओळीत दिलीये.

सृष्टी आणि झंपी: हो.. खूप आवडला नवर्‍याला.. न आवडून सांगतो कोणाला Lol

के. सुचित्रा: हो ना.. आयुष्यात पहिल्यांदाच हा आनंद मला मिळाला..

पियू... खूप सुंदर सरप्राईज... कल्पना नक्की चोरणार... Happy
खुप मस्त. असे स्वतःच्या हाताने बनवून दिलेल्या गिफ्ट्ची मजा काही वेगळीच असते. नाही का?>> अगदी अगदी....

अवांतरः नेल आर्ट पण झक्कास!! Happy

Pages