तुह्या धर्म कोंचा?

Submitted by माध्यम_प्रायोजक on 3 March, 2013 - 22:20

या जगात प्रत्येकजण आपापल्या दृष्टिकोनातून या जगातल्या घडामोडींचा अर्थ लावतो. मग तो जहाल हिंदू असो, किंवा नक्षलवादी. प्रत्येकाची नजर वेगळी.

पण त्यांच्या कल्पनेपलीकडेही एक सत्य अस्तित्वात असतं.

'तुह्या धर्म कोंचा?' हा नवा चित्रपट धार्मिक संकल्पना आणि सांस्कृतिक अस्तित्वांवर आधारित आहे. आदिवाशांच्या निसर्गाशी असलेल्या नात्यातून धर्माविषयी असलेल्या संकल्पना उलगडणार्‍या या चित्रपटात विविध आदर्शवादांची टोकाची मतं आपल्यापुढे येतात.

TDK.jpg

'गाभ्रीचा पाऊस'नंतर सतीश मनवर यांनी 'तुह्या धर्म कोंचा' या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.

मायबोली.कॉम माध्यम प्रायोजक असलेला हा चित्रपट १५ मार्च रोजी महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होत आहे.

निर्माते - आय. एम. ई. मोशन पिक्चर्स व स्प्रिंग आर्ट क्रिएशन्स प्रा. लि
लेखन - दिग्दर्शन - सतीश मनवर
गीते - दासू, सखाराम पाटील
संगीत - दत्तप्रसाद रानडे

कलाकार - उपेन्द्र लिमये, विभावरी देशपांडे, सुहास पळशीकर, किशोर कदम, शशांक शेंडे, पद्मनाभ बींड

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नायकाचं कुटुंब खानदेशातल्या आदिवासी भागातलं दाखवलं असल्याने काही संवाद त्या (अहिराणी) भाषेतले असावेत. सबटायटल्स अर्थातच असतील. जाती-धर्माच्या नावाखाली एखाद्या सामान्य आयुष्याची होणारी फरफट रेखाटणारा हा चित्रपट सार्‍यांना भिडेल, आवडेल. Happy

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची आज घोषणा झाली.

मायबोली.कॉम माध्यम प्रायोजक असलेल्या 'तुह्या धर्म कोंचा?' या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट सामाजिक चित्रपटाचा पुरस्कार मिळाला.
तसंच बेला शेंडे यांना याच चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट गायिकेचा पुरस्कार जाहीर झाला आहे.

याशिवाय 'अस्तु', 'आजचा दिवस माझा', 'फॅण्ड्री', 'यलो' या चित्रपटांनीही बाजी मारली आहे.

सर्वोत्कृष्ट संवाद - सुमित्रा भावे (अस्तु)
सर्वोत्कृष्ट साहाय्यक अभिनेत्री - अमृता सुभाष (अस्तु)
सर्वोत्कृष्ट बालकलाकार - सोमनाथ अवघडे (फॅण्ड्री)
पदार्पणातील सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन - नागराज मंजुळे (फॅण्ड्री)
सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट - आजचा दिवस माझा
परीक्षकांचा खास पुरस्कार - गौरी गाडगीळ (यलो)
परीक्षकांचा खास पुरस्कार - यलो

या सर्व चित्रपटांशी संबंधित तंत्रज्ञ व कलाकार यांचं हार्दिक अभिनंदन.