Submitted by अनिल आठलेकर on 3 March, 2013 - 15:23
हरवली संवेदना अन भाव माझा हरवला,
मखमली सारे बिछाने, गाव माझा हरवला............!
कोण मी आहे कुठे? सोडून गेले का कुणी?
कोणता हा देश आहे,ठाव माझा हरवला...............!!
आजही तेथून आलो, वाट होती पोरकी
का कळेना ओळखीचा, वाव माझा हरवला.............!!!
देउनी पंखात बळ त्यांनीच केले वारही
सांग तू खेळू कसा मी ? डाव माझा हरवला...........!!!!
साकडे घालू कुणा? कोड्यात आहे देवही
आसुरी आनंद त्यांना, घाव माझा हरवला...........!!!!!
___अनिल आठलेकर....०८/११/१२...11.50 pm
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान
छान
सुरेख..
सुरेख..
Hi majhi pahilich gajhal
Hi majhi pahilich gajhal hoti.
barech dosh astilahi yat. Te samjavet mhanun post keliy.
#.... विरामचिंन्हे जास्त
#.... विरामचिंन्हे जास्त वाटली किंबहुना अनावश्यकच !!
# ....रदीफ सगळीकडेच चपखल बसत असल्यासारखी नाही वाटली
बाकी गझल आवडलीच
____________________________________
# = मते वैयक्तिक आहेत
अनिलजी, रचना आवडली.
अनिलजी, रचना आवडली.
Vaibhavji, manya. . Nantar
Vaibhavji,
manya. .
Nantar lakshat ale. . Viramchinhe jara jastch hot ahet. .
radeef baddal. . _Jast janun ghyayla awdel.