SOLO IMPOTENCE

Submitted by हरवलेल्या जहाजा... on 2 March, 2013 - 15:18

कॅफेटेरियात
वारुळ ढोसत
बसलेली नागडी माणसं
कसल्याशा कुंपणांनी,
गोंदवत बसलीयत
आपली उघडी शरीरं.

'तु अजुन कपडे काढ.
मी माझेही काढतो.
त्वचा उतरवुन ठेव
मी माझीही ठेवतोच.
तुझा कोथळा उतरव
आणि मला दे.
माझा तुझ्या हातात घे.
आपल्या,
पेशीपेशींमधल्या मरणफुलांचा
गुच्छ बनवु आणि
सात जणात
सुखासमाधानाने
गिळुन खाऊ.
रक्त पचवु.
धागे उपसु.

नाहीतरी,
जगुन झालेल्या पारदर्शक रक्ताने,
प्रत्येक पेशींमधले मेंदु सैरभैर आहेत,
होणारी प्रत्येक नवी मांडणी
विटाळत नाहीये एकसंधपणे.
शरीरविरहीत जग बनुन,
चिडिचुप वखवखलेपण घेऊन,
केवळ मनं का सडत नाहीत??
भग्नतेची शिल्प होऊन,
भोगलेले सगळे अनिर्णित प्रश्न
कुठल्या शहरात निघुन जातायत??'

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हरवलेल्या जहाजा... | 2 March, 2013 - 15:18 >>>>> खूप दिवसांनी इकडे येणे केलेत ............पाहुन बरे वाटले
जाम भारीये कविता खूप आवडली

अवांतर : मर्ढेकरांची पुढची पिढी...................

खूप दिवसांनी मेंदूला झिणझिण्या आणणारं, वाचकाची परीक्षा पाहणारं, दर्जेदार असं काहीसं पहायला मिळालं त्याबद्दल हरवलेल्या जहाजाच्या कप्तानाचे आभार. प्रोफाईल चाळली तेव्हां केवळ दोनच कविता पोस्टल्याचे आढळले. खरं तर या प्रकारचं आणखी लिखाण वाचायला आवडेल. (कवीबद्दल उत्सुकता देखील आहेच).

सलाम !

जबरी...