एक निरीक्षण!

Submitted by साती on 2 March, 2013 - 04:45

नुकताच आपण मभादि २०१३ साजरा केला. खूप मजा आली. यावेळचा मभादि अगदी मनापासून आवडला.
संयोजकांचे आभार मानावे आणि कौतुक करावे तितके कमीच.

यातही लहान मुलांचे कार्यक्रम फार सुरेख होते. पत्रलेखन , बडबडगीत गायन यात मुले आणि पालक अगदी रंगून गेलेले दिसत होते. पण मी पालक हा शब्द वापरू का? कारण एकही प्रवेशिका माबोवरच्या पुरूष आयडीच्या पाल्याची नव्हती. सगळ्या प्रवेशिकांचे पालक स्त्री आयडीच आहेत. (आता काही पालक जोडीने माबो सदस्य आहेत आणि पोस्ट करताना केवळ स्त्रीसदस्याने पोस्ट केली असे असू शकेल, पण असे प्रकार कमी. तसेच गाण्याचे ध्वनीचित्रमुद्रण ,संकलन करून इथे चढवायलाही बाबा लोकांनी मदत केलेली असू शकेल.)

याचा अर्थ मातृभाषा मुलांपर्यंत पोहोचवायची जबाबदारी फक्त मातेचीच आहे किंवा फक्त मातेलाच ती हौस आहे असे झालेय का? की पुरूष आयडीना मातृभाषेचे प्रेम तर आहे पण इथे उपक्रमात भाग घ्यायची तेवढी हौस नाही असे आहे का? Wink

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

?

साती, मला तरी असं नाही वाटत. य वर्षांपुर्वी मीही मराठी दिनाच्या संयोजनात होते. हो, आयांचा उत्साह ओसांडून वाहत असतो. पण बाबालोकांचाही वाटा असतो.
यावेळेस कदाचित असे दिसले असावे किंवा फक्त आईकंपनीलाच क्रेडिट मिळावं असंही असेल :inmydreams Happy

याचा अर्थ मातृभाषा मुलांपर्यंत पोहोचवायची जबाबदारी फक्त मातेचीच आहे किंवा फक्त मातेलाच ती हौस आहे असे झालेय का? की पुरूष आयडीना मातृभाषेचे प्रेम तर आहे पण इथे उपक्रमात भाग घ्यायची तेवढी हौस नाही असे आहे का? <<<

१. निष्कर्ष काढण्याची जरा घाई होत आहे असे वाटते.

२. संयोजकांमध्ये एक पराग हा आय डी सोडला तर बाकी सर्व स्त्रियाच का आहेत असा प्रश्न का पडू नये? स्त्रियांकडेच जबाबदारी देण्याचे ठरवण्यात आले होते काय, असा निष्कर्ष काढला तर आवडेल का?

३. किती जणींनी आपल्या पाल्याचा सहभाग मभादिच्या या उपक्रमात 'निव्वळ मातृभाषा पाल्यापर्यंत पोहोचावी' इतक्याच हेतूने करवून आणला? आपल्या मुलाचे चारजणांत कौतुक व्हावे, त्याला स्पर्धेत किंवा उपक्रमात सहभागी व्हायची सवय व्हावी हे फक्त 'मातृभाषेवरील प्रेम समजावणे' यापेक्षा वेगळे असलेले हेतू नसतीलच का?

-'बेफिकीर'!

हेलबॉय , चांगलं उत्तर आहे. तुम्हीच तपासून बघा.

बेफिकीर, मग मुलांचे कौतुक व्हावे ही इच्छाही फक्त आयांना असते का?

साती निरिक्षण मे दम है !
अजुन एक निरिक्षण , मायबोलीवर पोष्टींचा पाऊस पाडणारे , लेखावर लेख लिहिणारी कित्येक आयडी आहेत पण बच्चेकंपनीने लिहिलेल्या पत्रांचं कौतुक करण्यात मात्र बरीचशी मंडळी उदासीन दिसतेय.

साती, तुझ्या निरिक्षणात तथ्य आहे तसंच बेफिकीर यांनी मांडलेल्या दुसर्‍या मुद्द्यातही आहे.
मभादिवर सानविवि किंवा बोल बच्चनवर प्रतिसाद देणारे आयडीही मुख्यःत्वे स्त्रिया आहेत. (श्री हा अपवाद वगळता)
यापूर्वीच्या मभादिंमध्येही बहुतांशी हेच चित्र दिसून येईल.

साती,

आपलं निरीक्षण अगदी अचूक आहे. त्याबद्दल अभिनंदन! Happy

बायका पुलकिनी असतात. म्हणजे समोरच्याला पुलकित करून हवे ते फलित काढून घेणार्‍या! अर्थात manipulative, पण चांगल्या अर्थी. बायकांचे हे कौशल्य लहान मुलांच्या बाबतीत विशेषकरून प्रत्ययास येतं.

मराठी टिकवण्याची जबाबदारी केवळ बायकांची आहे असं मानणं चुकीचं आहे. पुरुषांवरही तितकीच जबाबदारी आहे. मात्र ती वरील ठराविक प्रकारे व्यक्त होईलच असं नाही.

आ.न.,
-गा.पै.

साती, आमच्याकडे मराठी खर्‍या अर्थाने 'मातृ'भाषा आहे. त्यामुळे मराठीचं घोडं मलाच दामटावं लागतं Wink

निव्वळ मातृभाषा पाल्यापर्यंत पोहोचावी >>>> यासाठी उपक्रम (हा किंवा असे इतर उपक्रम) फार अपुरा आहे त्यामुळे हा हेतू नसेल कुणाचाच. माझा तरी नव्हता. मायबोली आपलीशी वाटते आणि म्हणूनच इथल्या उपक्रमांमध्ये भाग घेण्याचा प्रयत्न केला जातो. यंदा अनायसे विंटर ब्रेक सुरु होता घोषणा यायला लागल्या तेव्हा. घेतला भाग.

शिवाय कंपुबाजी सिद्ध करायची होती Proud

साती, उत्तम निरीक्षण.

बेफिकीर,
३. किती जणींनी आपल्या पाल्याचा सहभाग मभादिच्या या उपक्रमात 'निव्वळ मातृभाषा पाल्यापर्यंत पोहोचावी' इतक्याच हेतूने करवून आणला? आपल्या मुलाचे चारजणांत कौतुक व्हावे, त्याला स्पर्धेत किंवा उपक्रमात सहभागी व्हायची सवय व्हावी हे फक्त 'मातृभाषेवरील प्रेम समजावणे' यापेक्षा वेगळे असलेले हेतू नसतीलच का?
>>>>>> हे असेलही पण चांगल्या अर्थानं. आपण मुलांना विविध क्लासेसना घालतो, छंद जोपासण्याकरता संधी देतो, अभ्यासाव्यतिरिक्तच्या परिक्षा देण्यास उद्युक्त करतो, स्टेजवर मुलांनी जाऊन गुणप्रदर्शन करावं याकरता सजग असतो तसंच. यामुळे मुलांचा आत्मविश्वास नक्की वाढतो, इतक्या लोकांचे प्रतिसाद बघून हुरुप मिळतो.

>>>>>> याच मुद्द्यांला धरून असं म्हणता येईल की स्त्रियांना आपल्या मुलांनाही पुढे आणण्याची आस असते. पुरुष आयड्यांना फक्त स्वतःलाच 'मिरवायची' आस असते. Wink Proud Light 1

जोक्स अपार्ट, लहान मुलांकडून एखाद्या उपक्रमाकरता काही पाठ करून बोलून घेणं, लिहून घेणं सोपं नाही. त्याकरता अतिशय चिकाटी लागते. ती स्त्रियांकडे असते असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही.

आईशप्पथ... मी टोटल बेशुद्धं होते ह्या उपक्रमाच्या बाबतीत.
माफी मागते... अनवधानाने का होईना पण चूक झालीये हातून. पुन्हा होणार नाही अशी काळजी घेईन.
मुलांच्यात मातॄभाषेचा नाळबंध टिकावा म्हणून आटापिटा करणार्‍या सगळ्याच पालकांचं मनापासून कौतुक वाटतं.
(माझा मुलगा एक दिवस... म्हणजे एका रात्री झोपेत इंग्रजीत बरळला... तेव्हा मी रडले होते. Happy ... त्याची विचार करण्याची साहजिक भाषा इंग्रजी असणारेय हे माहीत होतं. पण ते झालं तेव्हा ...).